Agripedia

भारतात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही करडई पिकविणारी महत्वाची राज्ये असून क्षेत्र आणि उत्पादन यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगलवेढा परिसरात करडईची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

Updated on 26 January, 2024 2:03 PM IST

डॉ.आदिनाथ ताकटे

महाराष्ट्र राज्याचे विशेषतः रब्बी हंगामातील करडई हे महत्वाचे तेलबिया पिक आहे. करडईच्या तेलात संयुक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलबियांपेक्षा बरेच कमी असल्याने ह्र्दय रोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते.शरीरामध्ये रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्र प्रमाणाबाहेर वाढू नये म्हणून इतर तेलांबरोबर या तेलाचा उपयोग करणे मानवाला फायदेशीर आहे.म्हणूनच करडईच्या तेलाची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.

भारतात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही करडई पिकविणारी महत्वाची राज्ये असून क्षेत्र आणि उत्पादन यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगलवेढा परिसरात करडईची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

करडईची काढणी:

सर्वसाधरणपणे १३० ते १३५ दिवसात करडईचे पीक पक्व होते. करडईची पाने व बोंडे पिवळी पडली कि समजावे पीक काढणीस तयार झाले.कापणी सकाळी करावी म्हणजे हवेत आर्द्रता जास्त असल्याने दाणे गळत नाही व हाताला बोचत नाहीत. कापणीनंतर झाडांची कड्पे रचुन पेठे करावेत ते पूर्ण वाळल्यानंतर काठीने बडवून काढावे नंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे.

करडईची काढणी आणि मळणी एकाचवेळी करण्यासाठी पंजाबवरून मागविलेले एकत्रित काढणी व मळणी (कंबाईन हार्वेस्टर) यंत्र अतिशय चांगले असल्याचे दिसून आले आहे. या यंत्रामुळे प्रतिदिनी १०० एकर करडईचे पीक काढले जाते यामध्ये तयार झालेली करडई बाजारात नेण्याइतपत स्वच्छ असते..तरी शेतकरी बांधवानी या यंत्राचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा.

उत्पादन:

मध्यम जमिनीत सुधारित तंत्राचा अवलंब करून लागवड केल्यास प्रतिहेक्टरी १२ ते १४ क्विंटल आणि खोल जमिनीत १४ ते १६क्विंटल उत्पन्न मिळते.

करडई फुल/ पाकळ्यांचा औषधी गुण:

करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलापेक्षा बरेच कमी असल्याने हृदय रोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या तेलाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरोलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढत नाही. वैद्यक शास्त्रात औषधोपचार म्हणुनु करडईच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाच्या कार्यक्षमतेवर करडईच्या पाकळ्यांचा इष्ट परिणाम होतो. रक्त वाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायूभिसरणाचे प्रमाण वाढुन रक्त वाहिन्यात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. हदयरोग्याच्या इलाजात करडई पाकळीयुक्त औषधांच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

मणक्याचे विकार, मानदुखी, पाठदुखी इत्यादीवर आयुर्वेदीक उपचारात करडई पाकळ्या इतर औषधासोबत वापरल्यास आराम मिळतो. करडई पाकळ्यांचा दररोज काढा काढुन पिल्यास वरील रोगांपासून ब-याच प्रमाणात फायदा होतो. करडईची फुले उमलण्यास सुरुवात होताच सायकोसिल या वाढ प्रतिरोधकाची 1000 पी.पी.एम. तिव्रतेच्या (1000 मिली 500 लिटर पाण्यात) या द्रावणाची फवारणी केल्यास उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे प्रयोगाअंती दिसुन आलेले आहे.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृदशास्रज्ञ,एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विदयापीठ राहुरी, मो.९४०४०३२३८९

English Summary: Kardai Management How to harvest Kardai properly
Published on: 26 January 2024, 02:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)