Agripedia

शेतकरी बंधूंनो कीटक हे स्वजातीयांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडतात ही रसायने त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे कार्य करतात. यांना इंग्रजीत फेरोमोन असे म्हणतात.

Updated on 25 March, 2022 6:35 PM IST

शेतकरी बंधूंनो कीटक हे स्वजातीयांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडतात ही रसायने त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे कार्य करतात. यांना इंग्रजीत फेरोमोन असे म्हणतात.

सध्या काही कीटकांची कृत्रिम रीत्या तयार केलेले फेरोमोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या वासा द्वारे (कामा गंधाद्वारे) या पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन मिळण्यासाठी फेरोमोन चा मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर, हरभरा, सोयाबीन, वांगी, भेंडी यांसारख्या पिकात संबंधित पिकावरील संबंधित पतंग वर्गीय किडीची कामगंध गोळी सह वापर होत आहे.

नक्की वाचा:बाजार समित्या टिकवण्यासाठी शशिकांत शिंदे मैदानात, समस्यांचा वाचला पाढा, सहकारमंत्री म्हणाले..

 समागमासाठी कार्यक्षम सहचर शोधण्यासाठी काम गंधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यांच्या गंधाने विरुद्धलिंगी कीटक परस्पराकडे मिलनासाठी आकर्षित होतात. या तत्त्वाचा वापर प्रामुख्याने खालील तीन प्रकारे कीड व्यवस्थापनासाठी करता येतो.1) फेरोमोन सापळे वापरून किडींचे सर्वेक्षण करणे.2) मोठ्या प्रमाणात किडींचे पतंग सापळ्यात पकडून त्यांचा नाश करणे.3) कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करून त्यांच्या पुनरुत्पत्ती ला अटकाव करणे शेतकरी बंधूंनो किडींच्या सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रात सर्वसाधारणपणे पाच कामगंध सापळे पुरेसे आहेत. त्यांचा वापर सनियंत्रणासाठी करता येतो. सर्वसाधारणपणे पिक संरक्षण उपाय सुरू करण्यापूर्वी सापळ्यात कमीतकमी किती पतंग अडकले आहेत त्याची संख्या निश्चित केलेली असते.

 उदाहरणार्थ सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा या किडीचे 8 ते 10 नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाय त्वरित योजावे असा संकेत यातून घ्यावा. शेतकरी बंधूंनो सनियंत्रण व्यतिरिक्त मोठ्याप्रमाणात नर पतंगांना अडकवून किडींचे व्यवस्थापन मिळण्यासाठी सुद्धा कामगंध सापळ्यांचा वापर होऊ शकतो. उदाहरणार्थ कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह लावावे. कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्यातून लिंग प्रलोभन रसायनांचा सूक्ष्म गंध वातावरणात पसरतो. त्यामुळे मिलनासाठी सहचर शोधतांना किटकाची फसगत होते परिणामी त्यांचे मीलन न झाल्यामुळे प्रजोत्पादन होत नाही. त्यामुळे पुढील पिढीतील कीटकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते.

 हे काम गंध सापळे वापरताना पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1ते 1.5 फूट उंची ठेवून वापरावे तसेच या सापळ्यातील संबंधित पिकावरील संबंधित किडीकरिता वापरली जाणारी कामगंध गोळी साधारणपणे वीस दिवसानंतर बदलावी सध्या बाजारात घाटेअळी, सोयाबीन वरील स्पोडोप्टेरा अळी, वांगी पिकावरील शेंडा व फळपोखरणारी अळी,भेंडी पिकावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, व इतर काही पिकावरील किडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत.

नक्की वाचा:Breaking News: कृषी विभागात घोटाळा! काँग्रेस नेत्यांनी केली 'इडी'कडे तक्रार

 अर्थात या सापळे विकणाऱ्या विविध कंपन्या त्यांचे दर पुरवठा पद्धत याबद्दल माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती घ्या व शास्त्रोक्तरित्या कामगंध सापळ्यांचा वापर योग्य वेळी योग्य पद्धतीने शास्त्रज्ञांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून योग्य प्रमाणात गरजेनुसार करा 

English Summary: kaamgandh(feroman trap)is useful for saving crop from harmful insect
Published on: 25 March 2022, 06:35 IST