Agripedia

दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाण्यांची उत्पादनक्षमता स्थानिक वाना पेक्षा जास्त असते. तसेच अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही महत्वाची ठरते. त्याकरिता ज्वारीच्या योग्य वाणांची निवड करणे हे अत्यंत आवश्यक आहे. या लेखात आपण ज्वारीच्या कोरडवाहू आणि बागायती वाणांची माहिती घेणार आहोत.

Updated on 11 October, 2021 9:38 AM IST

 दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाण्यांची उत्पादनक्षमता स्थानिक वाना  पेक्षा जास्त असते. तसेच अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही महत्वाची ठरते. त्याकरिता ई ज्वारीच्या योग्य वाणांची निवड करणे हे अत्यंत  आवश्यक आहे. या लेखात आपण ज्वारीच्या कोरडवाहू आणि बागायती वाणांचीमाहिती घेणार आहोत.

 ज्वारीचे कोरडवाहू आणि बागायती वाण

  • फुलेअनुराधा:
  • कोरडवाहूक्षेत्रासाठीव हलक्‍या जमिनीसाठी लागवडीस योग्य.
  • पक्व  होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस
  • अवर्षण परिस्थितीत प्रतिकारक्षम
  • भाकरी उत्कृष्ट व चवदार लागते.
  • कडबा अधिक पौष्टिक व पाचक.
  • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
  • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटल व कडबा 30 ते 35 क्विंटल.
  • फुलेमाऊली:
    • हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीसयोग्य
    • पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस
    • भाकरीचीचव उत्तम
    • कडबा पोस्टीक व चवदार
    • धान्याचे उत्पादन हलक्‍या जमिनीत हेक्‍टरी सात ते आठ क्विंटल कडबा वीस ते तीस क्विंटल
    • धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत हेक्‍टरी 15 ते 20 क्विंटल व कडबा उत्पादन 40 ते 50 क्विंटल
  • फुले सुचित्रा:
    • मध्यम जमिनीसाठी शिफारस
    • पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस
    • उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत
    • धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल व कडबा 60 ते 65 किंटल
  • फुलेवसुधा:
    • भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती वान
    • पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस
    • दाणे मोत्यासारखे व पांढराशुभ्र व चमकदार
    • भाकरीची चव उत्तम
    • ताटे भरीव, रसदार व गोड
    • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
    • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी 24 ते 28 क्विंटल वकडबा 65 ते 70 क्विंटल
    • बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी 30 ते 35 क्विंटल व कडबा 70 ते 75क्विंटल
    • कोरडवाहू धन्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी 24 ते 28 क्विंटल व कडबा 65 ते 70 क्विंटल
  • फुले यशोदा:
    • भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित
    • पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस
    • दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र व चमकदार असतात.भाकरीची चव उत्तम
    • कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी 25 ते 28 क्विंटल व कडबा 60 ते 65 क्विंटल
    • बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी 30 ते 35 क्विंटल व कडबा 70 ते 80 क्विंटल
  • फुले रेवती:
    • भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस
    • पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस
    • दाणे मोत्यासारखे व पांढरे चमकदार
    • भाकरीची चव उत्कृष्ट
    • कडबा पौष्टिक व अधिक पाचक
    • धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी 40 ते 45 क्विंटल व कडबा उत्पादन 90 ते 100 क्विंटल
  • मालदांडी 35-1:
    • मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी शिफारस
    • पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस
    • दाणे चमकदार व पांढरे
    • भाकरीची चव चांगली
    • खोडमाशी प्रतिकारक्षम
    • धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी 15 ते 18 क्विंटल व कडबा 60 क्विंटल
  • फुले उत्तरा:
    • हुरड्यासाठी शिफारस
    • हुरड्याची अवस्था येण्यास नव्वद ते शंभर दिवस
    • भोंडातुन दाने सहज बाहेर पडतात.
    • सरासरी 70 ते 90 ग्रॅम इतकाहुरडा मिळतो.
    • हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
English Summary: jwaar veriety in horticculture area and drought area for cultivation
Published on: 11 October 2021, 09:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)