मित्रांनो जसं की आपणांस ठाऊक आहे लिंबूचे भाव गगनाला भिडले आहेत, यामुळे लिंबूची शेती (Lemon Farming) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. असे असले तरी लिंबा व्यतिरिक्त देखील अशी अनेक पिके आहेत जी वर्षभर महागड्या दराने विकली जातात. विशेष म्हणजे त्यांची लागवड करणेही तुलनेने सोपे आहे. आज आपण अशाच पिकाविषयी जाणुन घेणार आहोतं. शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे मात्र या व्यवसायाला फायदेशीर बनवण्यासाठी शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडावी लागेल आणि नगदी पिकांची निवड करावी लागेल.
पारंपारिक शेती व्यतिरिक्त फळबाग व इतर पिकांच्या लागवडीतून शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे लिंबाची लागवड, लिंबाचे भाव गगनाला भिडत आहेत, यामुळे लिंबू ची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगली फायदेशीर ठरत आहे. लिंबू व्यतिरिक्त देखील असे काही पिके आहेत ज्याची लागवड करून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकतात आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
मिरची लागवड:- मिरची हा एक मसाल्याच्या प्रमुख भाग आहे. हे एक मसाला पिक आहे. याची लागवड (Chilly Farming) प्रामुख्याने भारतातच केली जाते. भारतातील अनेक राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. हे पीक राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात लावले जाते. राजस्थानमध्ये देशातील एकूण मिरची उत्पादनापैकी सुमारे 80% उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात देखील याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मिरचीची लागवड पावसाळी, शरद ऋतू, उन्हाळी हंगाम या तीनही हंगामात केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधव मिरचीच्या सुधारित वाणाची लागवड करून वर्षभर कमाई करू शकतात.
अश्वगंधा लागवड:- औषधी पिकांच्या लागवडीत अश्वगंधाला महत्त्वाचे स्थान आहे. सध्या औषधी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. औषधी पिकांची लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात नक्कीच वाढ होईल. औषधी पिकांची विशेष बाब म्हणजे इतर पिकांच्या तुलनेत त्यांच्यावर नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी असतो आणि कदाचित हेच एक कारण आहे की याची लागवड आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.
पेरूची लागवड:- पेरू हे भारतातील एक लोकप्रिय फळ आहे. क्षेत्रफळ आणि उत्पादनाच्या बाबतीत पेरूचा देशात पिकणाऱ्या एकूण फळांमध्ये चौथा क्रमांक लागतो. त्याची अष्टपैलुत्व आणि पौष्टिकता लक्षात घेऊन लोक त्याला गरिबांचे सफरचंद म्हणुन संबोधत असतात. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. पेरूची लागवड करून देखील शेतकरी बांधव साहजिकच चांगला नफा मिळवू शकतात.
सूर्यफूल लागवड:- सूर्यफूल तेलाची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे बाजारात त्याची किंमत चांगली आहे. त्याचबरोबर या पिकाचे एकरी उत्पादन देखील चांगले मिळते, तसेच देखभाल व पाणी कमी लागत असल्याने शेतकरी त्याच्या लागवडीकडे आकर्षित होत आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या काही वर्षांत सूर्यफूल तेलाची मागणी वाढली आहे आणि यामुळे सूर्यफुलाची लागवड देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत नगदी पिकांची लागवड करू लागले आहेत. यामुळे सूर्यफूलाची शेती शेतकरी बांधवांसाठी चांगली फायदेशीर ठरू शकते.
Published on: 18 April 2022, 09:27 IST