सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला असून राज्यात बोगस हापूस आंब्याची चर्चा सुरु असतानाच आता शिवनेरी हापूसला भौगोलिक मानांकन देण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे शिवनेरी आंब्यालाही महत्व प्राप्त होणार असून जुन्नरच्या वैभवात भर पडणार आहे. याबाबत प्रक्रिया सुरु झाली आहे. सरकारकडूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुन्नरमधील हापूस आंबा चवीला गोड, रसाळ आहे. याचा वास, रंग या सर्वच बाबतीत तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच या आंब्याला ऐतिहासिक असे महत्व देखील आहे. अनेक ग्रंथांमधेही आंब्याचे उल्लेख आहेत. या सर्व बाबींमुळे शिवनेरीच्या आंब्याला भोगोलिक मानांकन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून आता याबाबतची प्रक्रिया ही सुरु झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
याबाबत हे मानांकन केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागातर्फे जारी करण्यात येते. याचा फायदा म्हणजे स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते. याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते. यामुळे याची ओळख जगभरात होते. यामुळे याचा फायदा पुढील काळात शेतकऱ्यांना होणार आहे.
हे मानांकन उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता पाहून दिले जाते. यामुळे त्या भौगोलिक ठिकाणला वेगळे महत्व प्राप्त होते. भारत सरकारच्या माध्यमातून हे मानांकन दिले जाते. आता शिवनेरी हापूसचे परिक्षण करण्याची जबाबदारी ही नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रावर सोपवण्यात आली आहे. यासाठी सध्या ३० लाखांची तरतूद करण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! देशी गाई संभाळा आणि लाखो कमवा, ३३ प्रकारची अन्नद्रव्ये होतात तयार, वाचा सविस्तर
आता गाव तिथे किसान मोर्चा, शेतकऱ्यांच्या समस्यांवर उठवणार आवाज...
अजब राज्याचे गजब सरकार! फक्त बळीराजाचे राज्य म्हणून जमणार नाही साहेब, विजेचे वास्तव एकदा वाचाच
Published on: 05 April 2022, 12:38 IST