Agripedia

आज आपण रब्बी ज्वारीचे अतिउच्च उत्पादन मिळवण्याचे तंत्र जाणून घेऊया.

Updated on 30 October, 2022 1:34 PM IST

आज आपण रब्बी ज्वारीचे अतिउच्च उत्पादन मिळवण्याचे तंत्र जाणून घेऊया.पारंपरिक पद्धतीने रब्बी ज्वारीची पेरणी शक्यतो १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर ह्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये करावी अशी शिफारस आहे. जर पेरणी १५ सप्टेंबरच्या आधी झाली तर खोड माशी सारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात ४०% घट येते. त्याच ठिकाणी जर पेरणी १५ ऑक्टोबरच्या पुढे केल्यास ह्याच किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पण सध्याचे वातावरण बघता लांबलेला पावसाळ्याने रब्बी पेरण्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर ज्वारीची पेरणी उरकून घेणे महत्त्वाचे आहे. 

 रब्बी ज्वारीची पेरणी करतेवेळेस जमिनीचा प्रकारानुसार वाणाची निवड करणे खूप आवश्यक आहे.It is very important to select the variety according to the soil type. फुले अनुराधा हे वाण हलक्या जमिनीसाठी खूप चांगले उत्पादन देते.

वाटर सोल्युबल ला दानेदार खते पर्याय ठरू शकतात का ? त्याचे फायदे तोटे काय ?

कोरडवाहू पध्दतीने जवळपास ८-१०क्विंटल धान्याचे उत्पादन हाती येते व ३०-३५क्विंटल कडब्याचे उत्पादन येते. त्याच प्रमाणे मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा हे वाण खूप चांगले उत्पादन देते. भारी जमिनीसाठी फुले वसुधा हे खूप चांगले उत्पादन देते. फुले रेवती ही जात बागायती शेती साठी प्रसारित केली आहे. ह्या जातीचे धान्याचे उत्पादन एकरी १६ क्विंटल तर कडब्याचे उत्पादन एकरी ४० क्विंटल मिळते. 

वाणाची निवड केल्यानंतर पेरणीसाठी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रियेसाठी थायरम किंवा गंधक ४ग्राम/किलो बियाण्यास चोळावे. थायरम किंवा गंधक हे उत्तम बुरशीनाशक आहे. ज्वारीवर येणाऱ्या कानी रोगाचा प्रकोप होऊ नये ह्यासाठी थायरम किंवा गंधकाची बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. खोड किडा ही ज्वारीवर उपजीविका करणारी प्रमुख कीड आहे. ह्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रति किलो ५ मिली थायमिथोक्साम बियाण्यास चोळावे. थायरम किंवा गंधक + थायमिथोक्साम ह्या दोघांची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिये नंतर पेरणी साठी दोन ओळीतील

अंतर आणि दोन झाडांमधील अंतर खूप महत्त्वाचे आहे. दोन सरीतील अंतर कमीतकमी १.५फूट असावे आणि दोन झाडांमधील अंतर कमीतकमी ६ इंच असावे. थोडं जास्त दाट पेरणी केल्यास झाडांना सूर्यप्रकाश पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि पातळ पेरल्यास झाडांची संख्या कमी असल्यामुळे उत्पादन हाती लागत नाही. वर नमूद केलेले अंतर ठेवून पेरणी केल्यास एकरी ५९२०० झाडांची संख्या मिळते. एवढी संख्या धान्याचे आणि कडब्याचे चांगले उत्पादन देण्यास पुरेसा आहे.

कोणत्याही पिकाचा जीवनचक्रामध्ये एक असा कालावधी असतो की ज्यामुळे त्या पिकाचे भविष्य ठरत असते. जसे की द्राक्षा मध्ये खरड छाटणी आणि फळ छाटणी दरम्यानचा काळ किंवा उसा मध्ये उसाची लागण ते पक्की भरणी पर्यंतचा काळ. ह्या काळात शेतकरी जेवढी मेहनत घेतील तेवढा त्यांचे आगामी काळात उत्पादन येणार किंवा नाही येणार हे ठरत असते. अगदी तसेच ज्वारी ह्या पिकाचा बाबतीतही घडत असते. 

शेतकरी मित्रांनो आता शेती कडे आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहेत. ज्वारी सारख साधारण पीकही थोडीशी अधिक मेहनत आणि थोडीशी अधिक काळजी घेतल्यास खूप चांगले उत्पादन हाती लागते हा आमचा अनुभव आहे. ज्वारीचे पीक आहे नुसतं पेरलं की येतंय ही मानसिकता खूप धोकादायक आहे. ज्वारीसारख्या साध्या पिकांत मेहनत करून आपणास आर्थिक उन्नती साधता येते. हा माझा वयक्तिक अनुभव आहे.

 

विवेक पाटील,सांगली

०९३२५८९३३१९

English Summary: Jowar: First month is very important
Published on: 30 October 2022, 12:07 IST