Agripedia

देशी गाईच्या १ ग्राम शेणात ३०० कोटी जिवाणू असतात तर याचा अर्थ आपण १० किलो शेण वापरतो त्यावेळी ३० लाख कोटी जिवाणू वापरात आणतो,

Updated on 30 January, 2022 6:14 PM IST

देशी गाईच्या १ ग्राम शेणात ३०० कोटी जिवाणू असतात तर याचा अर्थ आपण १० किलो शेण वापरतो त्यावेळी ३० लाख कोटी जिवाणू वापरात आणतो, यामुळे परिणाम मिळतो पण चमत्कारी परिणाम नाही मिळत, आणिजर तो चमत्कारी परिणाम मिळवायचा असेल तर जिवाणूंची संख्या वाढली पाहिजे.

    जिवाणूंची संख्या ही पेशी विभाजणाने होते या साठी किन्वन क्रिया करणे गरजेचे आहे व ते गोड पदार्थ वापराने साध्य होते. 

        गोड पदार्थ वापरा साठी आपण १ किलो गूळ ( गूळ काळा सरवोत्तम, लाल मध्यम, व पिवळा किंवा पांढरट कनिष्ठ असतो, साखर आजिबात वापराची नाही) किंवा ४ लिटर ऊसाचा रस, किंवा १० किलो ऊसाचे लहाण-लहाण तुकडे, किंवा १ किलो गोड फळांचा गर वापरू शकतो. यामुळे वैद्न्यानिक पध्दतिने किण्वन क्रियेचा वेग दुप्पट वेगाने वाढत जाते. परंतु जिवाणूंच्या अगणिक संख्येला त्यांच्या हालचालीसाठी उर्जेची आवश्यकता असते ती प्रथिनाने पुर्ण होते, व कडधान्यात भरपूर प्रमाणात ही प्रथिने असतात, त्यास्तव १ किलो कोणत्याही कडधान्याचे पिठ ( सोयाबिन वगळून कारण ते गळित धान्य आहे) त्यात टाकावे.

आता थोडं शेण व मुत्राच्या वापरा संबंधी, मित्रहो, सर्वांकडे देशी गाय हवी पण कांहींना ते शक्य होत नसेल तर ज्यांचे कडब्याच्या गाय असेल व साठवणूक होत असेल त्यांचेकडून शेण मुत्र घ्यावे व मोबदला रूपी तुमच्या शेतातील वैरण गाईसाठी द्यावे. ५ ते १० लिटर गोमुत्र वापरावे, गाय रात्रभर विश्रांती घेऊन पहाटेचे पहिले मुत्र देते ते सर्वात चांगले, यास्तव काँक्रिटचा गोठा उत्तम, संपुर्ण गायीचे मुत्र शक्य नसेल तर गायीचे २ व बैलाचे ३ लिटर या प्रमाणात घेतले तरी चालेल, किंवा ३ लिटर गायीचे व ३ लिटर मानवी मुत्रही चालते, मुत्र जितके जुने तितके ते चांगले, गाय जर काळी "कपिला" असेल व ती बाहेर फिरून (बधिस्त किंवा मुक्त गोठा नव्हे) चरत असेल तर अशा गायीचे शेण-मुत्र १ नंबरचे असते, कारण तिच्या बंधनमुक्त वातावरणातील हरेक वनस्पती खाण्यात येते जी तिला आवडेल व अनेक विविधतायुक्त वैरण खाल्लेने त्याचे गुणधर्म शेणा-मुतात येतात, जी दुध कमी देते जशी की खिलार गाय, अशा गायीचे शेण मुत्र प्रभावी असते, या ही पेक्षा भाकड गायीचे शेणमुत्र चांगले असते.

कारण तिच्या बंधनमुक्त वातावरणातील हरेक वनस्पती खाण्यात येते जी तिला आवडेल व अनेक विविधतायुक्त वैरण खाल्लेने त्याचे गुणधर्म शेणा-मुतात येतात, जी दुध कमी देते जशी की खिलार गाय, अशा गायीचे शेण मुत्र प्रभावी असते, या ही पेक्षा भाकड गायीचे शेणमुत्र चांगले असते ताण तिने चाऱ्यातून मिळवलेली उर्जा ही दुध निर्मिती साठी न वापरता शेण मुत्राच्या उत्कृष्ठ दर्जेकडे वापरते म्हणून तिचे शेण मुत्र उत्तम होय. शेण १० किलो हे ताजेच असावे ते उत्तम असते, भाकड गायीस मोजून घातलेला चारा तेव्हढेच शेण मुत्र बाहेर पडते त्यात सर्वोत्तम जिवाणूंचे भांडर असते. संपुर्ण पणे गायीचे शेण उपलब्ध नसेल तर निम्मे गायीचे व निम्मे देशी बैलाचे चालते.

         यात आता गरज असते ती जिवाणू युक्त मातीची, त्या साठी बांधावरची अथवा वडाच्या झाडाखालील सालीतील माती किंवा जंगलातील माती विरजण म्हणून एक मुठभर टाकावी. खरेतर जिवाणू माती म्हणजे ही पिकांची किंवा झाडांची सख्खी "आई" असते व तिचे वास्तव्य हे त्या-त्या पिकांच्या व झाडाच्या मुळीला बिलगलेल्या मातीत असते यास्तव ज्या पिकास जिवामृत द्यायचे असेल तेथीलच माती केंव्हाही श्रेष्ठच.

       एक बॅरेल घेऊन ते नैसर्गिक सावलीत अथवा कृत्रिम सावलीत ठेवावे, त्यात २०० लिटर पाणी ( विहीर अथवा बोअरचे ) घ्यावे, वरील सर्व निविष्ठा बॅरेलमधे घालण्या पुर्वी एका बादलीत अथवा प्लास्टिक बुट्टीत पाणी घालून निविष्ठा एकजीव करून मगच बॅरेलात घालाव्यात, लाकडी काठीच्या सहाय्याने घड्याळातील काटे ज्या दिशेने फिरतात (डावीकडून उजवीकडे) तद्वत चांगले ढवळून घ्यावे, गोणपाटाने अथवा कडब्याच्या धाटापासून बनवलेल्या झाकरणाने झाकून ठेवावे, दिवसातून सकाळ संध्याकाळ चांगले ढवळावे.

 ही किण्वन क्रिया तो पर्यंत वाढत असते जो पर्यंत त्याचा आंबट-गोड वास येत असतो, तद्नंतर त्याची कुजण्याच्या क्रियेस सुरवात होते व जिवामृताचा रंग काळपट होऊ लागतो.

 आदरणिय गुरूजींच्या मते सर्व निविष्ठा बॅरेल मधे घातल्या नंतर ४८ तासा पासून ते ७ व्या दिवसा पर्यंत वापरता येते, (कांही "महाज्ञानींच्या" मते १० ते ११ दिवसा पर्यंत वापर करता येऊ शकते, पण त्यांना किण्वन क्रिया ही वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळ्या गतीने होत असते याच्या अज्ञाना मुळे वैज्ञानिक दाखला देऊन आपले "महाज्ञानीत्व" दाखवून दिले ) वेळेच्या गरजे नुसार २ ते ७ दिवसापर्यंत कधी ही वापरावे, यातील ७ व्या दिवसाचे सर्वोत्तमच, कारण त्यातील जिवाणूंची ग्रोथ (वाढ) पुर्ण क्षमतेने झालेली असते.

      वापर ३ पध्दतीने करता येतो,

१) सिंचनाच्या पाण्यातून,

२) दोन झाडामधे जमिनीत पुरेशी ओल असताना जमिनी वरील आच्छादनावर,

३) उभ्या पिकावर फवारणीच्या शेड्युल व प्रमाणानुसार.

        एकरी कमीतकमी २०० लिटर जिवामृत महिन्यातून दोन वेळाजमिनीस मिळावे.

English Summary: Jivamrut about some tips and discuss
Published on: 30 January 2022, 06:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)