जिरेनियम ही एक औषधी व सुगंधी वनस्पती आहे. जर याची लागवड करायची असेल तर ती मध्यम प्रतीच्या जमिनीवर तसेच माळरानावर करता येते. साधारण 20 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते.
जर लागणारे आद्रतेचा विचार केला तर ते 75 टक्के ते 80 टक्के लागते. या पिकाची एकदा लागवड केली तर हे पीक तीन वर्ष शेतात राहते. लागवड करताना शेताची चांगली नांगरट व मशागत करून व्यवस्थित बेड तयार करून त्यावर ठिबक अंथरावे. लागवड करताना चार बाय दीड फुटावर करतात. जर एका एकर साठी रोपांचा विचार केला तर जिरेनियम ची दहा हजार रोपे लागतात. लागवड केल्यानंतर तीन महिन्यात कापणीला येते व वर्षातून तीनदा याची कापणी होते. जर खर्चाचा विचार केला तर इतर पिकांच्या तुलनेत 75 टक्के खर्च कमी लागतो. एकराचा विचार केला तर सत्तर ते ऐंशी हजार खर्च येतो. या एकरातून 30 ते 40 लिटर जिरेनियम ओईल मिळू शकते. या जिरॅनियम ऑइलच्याकिमतीचा बाजारपेठेतील विचार केला एक लिटरऑइललाजागेवर बारा हजार ते साडेबारा हजार रुपये दर मिळू शकतो. या हिशोबाने जर एका एकरातील उत्पन्नाचा विचार केला तर वर्षात चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
भारतात असलेली मागणी
जिरेनियम च्या तेला आपल्याकडे खूप मागणी आहे. जर एकूण वार्षिक मागणीचा विचार केला तर ते 200 ते 300 टनांची आहे. परंतु सध्या हे प्रमाण अवघे दहा ते वीस टन आहे. त्यामुळे भविष्यात जिरेनियम लागवडीच्या माध्यमातून अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे कितीही प्रमाणात लागवड क्षेत्रात वाढ झाली तरी कमीच पडेल.
या पिकाचे महत्वाचे वैशिष्टे
इतर पिकांपेक्षा याच्या उत्पादन खर्चामध्ये फारच बचत होते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचे जनावर याचा पाला खात नाही.त्यासोबतच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शंभर टक्के निरोगी उत्पन्न देणारे हे पीक आहे.
तसेच जिरेनियम तेलाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध आहे आणि इतकेच नाही तर या पिकाला हमीभाव देखील मिळतो. जिरेनियम तेलापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात. त्यामुळे सौंदर्यप्रसाधने निर्मिती, औषध निर्मिती, साबण तसेच डिटर्जंट आणि शाम्पू निर्मिती, विविध प्रकारच्या अत्तर व अगरबत्ती पावडर या वस्तू तयार करण्यासाठी जिरेनियम त्याची आवश्यकता असते. त्यामुळे जिरेनियम तेलाला खूप मागणी आहे. तसेच जिरेनियम पिकाची कापणी केल्यानंतर उरलेल्या अवशेषांपासून खत निर्मिती करता येते.
Published on: 05 March 2022, 10:23 IST