Agripedia

शेती म्हटली म्हणजे आता टेक्निकल हब म्हणून उदयास येत आहे. अनेक नवनवीन प्रकारचे तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरले जात आहे.

Updated on 02 April, 2022 8:07 AM IST

शेती म्हटली म्हणजे आता टेक्निकल हब म्हणून उदयास येत आहे. अनेक नवनवीन प्रकारचे तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरले जात आहे.

शेती एक इंडस्ट्रीज म्हणून उदयास येत आहेत. शेतकऱ्यांना फायदेशीर तंत्रज्ञान शेतात  येऊ घातल्याने शेतकऱ्यांच्या हातात पण हे देखील चांगल्या पद्धतीने येत आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये कृषी विद्यापीठ यांचा मोलाचा सहभाग आहे. कृषी विद्यापीठे शेतीक्षेत्राच्या संबंधित विविध संशोधनाच्या माध्यमातून एक बळकटीकरण आणत आहेत. असंच एक तंत्रज्ञान  म्हणजेच जवाहर मॉडेल अंतर्गत पीक लागवडीची पद्धत जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ, जबलपूर मध्यप्रदेश शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या  तंत्रज्ञानात हळदीचे पीक देखील सावलीत घेणे शक्य झाले आहे. यामध्ये मातीऐवजी गोण्यांमध्ये शेती केली जाते. एका गोणीत सुमारे 50 ग्रॅम हळदीच्या बिया वापरल्या जातात आणि सहा महिन्यांमध्ये दोन ते अडीच किलो हळद  यातून मिळू शकते.

नक्की वाचा:येणारा हंगाम फार कठीण फार कठीण त्यामूळे शेतकऱ्यांना सल्लागाराची व मार्गदर्शकाची नितांत गरज आहे

नेमके काय आहे जवाहर मॉडेल?

 ज्या शेतकऱ्यांकडे अगदी एक ते दीड एकर जमीन असते अशा शेतकऱ्यांना या मॉडेलचा फायदा जास्त होण्याची शक्यता आहे. यामध्ये एका गोणीत 65 किलो माती आणि खत यांचे मिश्रण भरून त्यामध्ये पीक उत्पादन घेतले जाते. या गोणीत पिकाचे उत्पादन घेतल्याने उत्पादनामध्ये 20 पट वाढ झाल्याचा दावा केला जातो. एका अंदाजानुसार मध्यप्रदेश राज्यातील जवळजवळ 70 टक्के शेतकरी जवाहर मोडेल चा वापर शेतीत करत असून त्याचा फायदा घेऊन उत्पन्न वाढत आहे. या मॉडेलमुळे शेतीत होणारा खर्च देखील बर्‍यापैकी वाचतो. जसं की नांगरणी ची गरज राहत नाही तसेच सिंचन आणि खतांसोबत कीटकनाशकांवर होणारा खर्च देखील वाचतो.

तुम्ही जमीनच नाही तर तुमच्या पडीक जमिनीवर देखील तसेच अंगणात, तुम्ही राहता त्या घराच्या सभोवती आणि गच्चीवर देखील पिके घेऊ शकतात. ज्यांच्याकडे एक एकर किंवा त्यापेक्षा थोडी जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्यांसाठी हे मॉडेल हे उत्पन्न वाढविण्यासाठी उत्तम मार्ग आहे. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही तुमच्या गरजे नुसार पिक काढून विकू शकतात.  जेवाय शेतकऱ्यांना गरज असते तेव्हा ते पीक तयार करतात आणि विकतात जर गरज नसेल तर ते आणखी काही दिवस शेतात  राहू देतात. या मॉडेलचा वापर करून शेतकरी कडधान्य तसेच तेलबिया तसेच भाजीपाला देखील उत्पादित करू शकतो. या मॉडेलचा वापर करून हे पिके ओसाड जमिनीत देखील घेता येतात.

नक्की वाचा:आता जगाचे लक्ष सेंद्रिय शेतीच! १५ देशांच्या शास्त्रज्ञांचे मंथन

 जवाहर मॉडेल या पिकांसाठी ठरतेय उपयुक्त

 या मॉडेलचा वापर करून शेतकरी तेलबिया, भाजीपाला तसेच फुलशेती, कोथिंबीर तसेच मिरची, मेथी यासारखी हिरव्या भाज्यांची लागवड करू शकतात. 

या माध्यमातून शेतकऱ्यांना सतत उत्पन्न मिळत राहते. जवाहर मॉडेल फार्मिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये बियाणे कमी लागते आणि प्रत्येक गोणी योग्य अंतरावर ठेवली जाते ज्यामुळे रोपाला वाढण्यासाठी पुरेशी मोकळी जागा मिळते. यामध्ये एका एकर जागेत बाराशे पोती ठेवता येतात व एका गोणीत 500 ग्रॅमपर्यंत हिरवीकोथिंबीर काढता येते.( स्त्रोत-मराठी बातम्या)

English Summary: jawahar model farming is most benificial for taking crop production
Published on: 02 April 2022, 08:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)