जरबेरा हे एक महत्त्वाचे फुलझाडे असून त्यांची विविध प्रकारच्या हवामानात लागवड केली जाते. जरबेरा मध्ये सिंगल, डबल असे प्रकार असून त्या विविध रंगाचे असतात. या लेखात आपण हरितगृहामधील जरबेरा लागवड कशी करतात व त्याचे तंत्रज्ञान समजून घेणार आहोत.
- जरबेरा साठी आवश्यक जमीन:
जरबेराची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते. जमीन तयार करताना ती भुसभुशीत व पाण्याचा निचरा होणारी असावी तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेणखत अथवा पीट जमिनीच्या मगदुराप्रमाणे मिसळावे. तसेच जमीन मध्यम खोलीची म्हणजेच अशा जमिनीत मुळांची वाढ व्यवस्थित होईल. जमिनीची खोली साधारणतः एक मीटर असावी. चल पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तर 70 ते 100 सेंटीमीटर खोलीवर ड्रेनेज लाईन टाकावी. ड्रेनेजच्या दोन लाईन मध्ये तीन मीटर अंतर असावे. तसेच जमिनीचा सामू सहा ते सातच्या दरम्यान असावा.
- जरबेरा साठी आवश्यक हवामान:
जरबेरा साठी दिवसाचे तापमान 270 सेंटीग्रेड पेक्षा जास्त नसावे. रात्रीचे तापमान 180 सेंटिग्रेड पेक्षा कमी असावे. कमीत कमी तापमानात 100 सेंटीग्रेड पेक्षा कमी होऊ नये. स्वच्छ सूर्यप्रकाश या पिकास मानवतो. पण उन्हाळ्याच्या दिवसात पिकास सावली देण्याकरिता 50 टक्के शेडनेटचा वापर करावा. हिवाळ्याच्या दिवसातील कमी सूर्यप्रकाश पिकाच्या वाढीस हानीकारक ठरतो.
- जरबेरा साठी पाणी व्यवस्थापन:
पाण्याची प्रत चांगली असावी तसेच पिकाला देण्यात येणाऱ्या पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण सहाशे ते आठशे च्या दरम्यान असावे.
- जमिनीचे निर्जंतुकीकरण:
जरबेरा हे पीक विविध बुरशीजन्य रोगांना फारच संवेदनक्षम असल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे ठरते. निर्जंतुकीकरणासाठी 0.2 फॉर्मल डिहाइड चे द्रावण जमिनीवर शिंपडावे व त्यावर पॉलिथिन पेपर लगोलग अंथरावा 48 तास तसाच ठेवावा. 48 तासानंतर पॉलिथिन काढून घ्यावे व एका आठवड्यात जमीन तशीच उघडी ठेवावी म्हणजे विषारी वायू निघून जाईल. जमिनीत उरलेला आयुष्य मग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. त्यासाठी 100 लिटर पाणी/ चौ. मी. वापरावे. वाफेचा हि वापर निर्जंतुकीकरणासाठी केला जातो पण ती फार खर्च पद्धत आहे.
- जमिनीची मशागत:
जमिनीची नांगरट व कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर 30 सेंटिमीटर उंचीचे गादी वाफे करावेत. व त्यांची रुंदी 60 ते 100 सेंटीमीटर असावी तर लांबी 30 मीटरपर्यंत असावी. दोन वाफ्यामध्ये 30 ते 40 सेंटिमीटर अंतर असावे.
- लागवड:
गादी वाक्यावर तीन ते चार ओळीत रोपे लावावीत. दोन रूपात 30 बाय 30 सेंटिमीटर अंतर ठेवावे. सात ते नऊ झाडे प्रति चौ मी बसतील अशा प्रकारे लावावे. 28 ते 30 हजार झाडे प्रतिएकरी लावावीत. उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे लावावीत. तसेच उत्पन्न अधिक देतात आणि गुणवत्तेने सारखे वाढतात झाडे जास्त खोलवर लावू नयेत तसेच जूनमध्ये लागवड केल्यास झाडांची चांगली वाढ होते. तर ऑगस्टमध्ये लागवड केल्यास हिवाळ्यात व वसंत ऋतूत भरपूर फुले मिळतात. वाळलेली पाने व जुनाट पाने वेळच्यावेळी काढून टाकावीत.
पाणी व्यवस्थापन सकाळच्या वेळेस पिकास पाणी द्यावे. जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल व पाण्याची प्रत चांगली असावी. जमीन दहा सेंटिमीटर खोलीपर्यंत ओल राहील अशा तऱ्हेने पाणी द्यावे. जेणेकरून आवश्यक तेवढेच पाणी देता येईल. लागवड झाल्यास हरितगृहात जर 22 ते 250 तापमान राहिले तर मुलांच्या झाडांची चांगली वाढ होते. रात्रीचे तापमान 12 ते दीडशे सेंटिमीटर असावे. वरील प्रमाणे तापमान तीन ते चार आठवडे ठेवावे. सुरुवातीच्या काळात झाडांना भरपूर पाणी देऊ नये अन्यथा झाडांच्या मध्यभागी पाणी जाऊन खोडकुज हा रोग होतो. चांगली उत्पादन क्षमता असलेल्या झाडात पाणी व फुलांचे गुणोत्तर 2:4 असते.
- खत व्यवस्थापन:
चांगले कुजलेले शेणखत दहा किलो प्रति चौरस मीटर या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे. मातीचे परीक्षण करून मग खतांची मात्रा ठरवावी. सर्वसाधारणपणे 290 ग्रॅम नायट्रोजन, 130 ग्रॅम फॉस्फरस व 400 ग्रॅम पोटॅशिअम प्रतिचौरस मीटर वापरावे. जरबेरा पिकास ठराविक दिवसांच्या अंतराने खते द्यावी लागतात. त्या खताची मात्रा ठरविण्यासाठी दर महिन्याला माती परीक्षण करून घ्यावे.
- फुलांची काढणी:
लागवडीनंतर सात ते नऊ आठवड्यांनी फुले येण्यास सुरुवात होते. फुलांची काढणी सकाळच्यावेळी करावी. फुलांचे दांडे कापून काढण्याऐवजी दांडे तळाशी धरून आजूबाजूस वाकवल्यास बुडातून तुटून येतात. हे काढण्याची योग्य पद्धत आहे. अर्धवट स्थितीत उमललेली फुले काढणीनंतर उमलत नाहीत म्हणून पूर्णतः उमललेली फुले काढावे. फुले काढणीनंतर तळाकडील दांड्याचा थोडा भाग कापून ती पाण्यात ठेवावीत.
- साठवण: फुले शीतगृहात जास्त काळ ठेवता येत नाहीत कारण एका आठवड्याच्या साठवणुकीत फुलांच्या जवळ चाळीस टक्क्यांनी वजन घटते. अगदी थोड्या कालावधीसाठी फुले शीतगृहात 10.50 ते 20.00 सेंटीग्रेड तापमान ठेवावीत.
Published on: 22 July 2021, 02:36 IST