Agripedia

भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी सिमेंट किंवा लोखंडी पत्र्याचे पसरट टाके वापरता येतात.

Updated on 24 August, 2022 9:07 PM IST

भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी सिमेंट किंवा लोखंडी पत्र्याचे पसरट टाके वापरता येतात. शेतामध्ये एक मीटर रुंद व दोन मीटर लांब आणि 25 सेंटीमीटर खोल वाफे तयार करावेत. त्यावर जाड पॉलिथिन कापड पसरवून त्यात चाळलेली माती दहा किलो, सिंगल सुपर फास्फेट 200 ग्राम,युरिया दहा ते 20 ग्रॅम आणि सोडियम मोलिबडेट दोन ग्रॅम

मिसळून पसरावे.नंतर वाफ्यात 10 ते 15 सेंटिमीटर पातळ पाणी भरून ढवळावे.Then fill the steamer with 10 to 15 cm of thin water and stir. आठ ते दहा तासाने पाणी संथ होऊन तळाशी बसल्यानंतर पाण्यावर 250 ग्रॅमशेवाळाचे मातृसंवर्धन पसरावे. त्या नंतर पाणी ढवळू नये.आवश्यकतेनुसार पाणी देऊन पातळी कायम राखावी.भरपूर सूर्यप्रकाशात दहा ते बारा दिवसातच पाण्यावर शेवाळ तरंगताना दिसेल. भरपूर वाढ झाल्यानंतर पाणी तसेच कमी होऊ द्यावे आणि

सुकल्यानंतर शेवाळा च्या पापड्या जमा कराव्यात व नंतर वाफ्यात पुन्हा पाणी भरून 250 ग्रॅम शेवाळ्याची भुकटी पसरावी. अशा पद्धतीने एका वाफ्यातून दोन ते तीन वेळा शेवाळाची वाढ केल्यास प्रत्येक वेळेस दीड ते दोन किलो प्रमाणे आठ ते दहा किलो शेवाळ मिळेल. त्यानंतर वाफ्यातील संपूर्ण माती शेवाळा सोबत खरडून मिसळून घ्यावी.

पाण्यामध्ये डास व यांची उत्पत्ती होऊ नये यासाठी मॅलॅथिऑन 1 मिली किंवा कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार 25 ग्रॅम वाफ्यात टाकावे.हे तयार झालेले शेवाळ खत धानाची रोवणी झाल्यानंतर मुख्य शेतात वापरता येते.शेतात तयार करायला सोपे व स्वस्त आहे. उन्हाळी हंगामात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा भरपूर लाभ घेता येतो.

 

श्री.विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: It will be beneficial to know the recipe and method of making blue-green algae fertilizer
Published on: 24 August 2022, 09:07 IST