Agripedia

"सत्य हे आहे की आजतागायत कोणालाही नांगरणी करण्याचे शास्त्रीय कारण मिळालेले नाही.”

Updated on 17 June, 2022 8:31 PM IST

"सत्य हे आहे की आजतागायत कोणालाही नांगरणी करण्याचे शास्त्रीय कारण मिळालेले नाही.”- हे एडवर्ड एच फॉकनरने त्याच्या 1943 मध्ये लिहिलेल्या महत्त्वपूर्ण अशा ‘प्लॉमॅन्स फॉली’ (शेतकऱ्याचा मूर्खपणा) या पुस्तकात म्हटले आहे.शेतकऱ्यांच्या समस्येवर एक उत्तर म्हणून नांगरणी न करणे हा एक पर्याय सुचविला जातो. कित्येक लोकांना नांगरणी न करण्याचा निर्णय हा शेतीच्या दृष्टीने खूपच पुढारलेला वाटतो. भारतात सेंद्रीय शेती करणाऱ्यांचे असे मानणे आहे की पूर्वीच्या काळात शेतकऱ्याने कधीही नांगर हाती घेतला नव्हता.एखाद्याचा नांगरणी करण्यावर विश्वास असो अथवा नसो, एक गोष्ट नाकारता येणार नाही की, वारा व टनाने केला जाणारा पाण्याचा वापर प्रति एकर प्रति वर्षी केल्याने झिजत असलेला मातीचा वरील सुपीक थर वाचविणे अत्यावश्यक आहे.नांगरणी न केल्यामुळे मातीचा वरील थर निश्चितपणे वाचवता येऊ शकतो. या पद्धतीचे काही फायदे आता पाहूया,1.पारंपारिक पद्धतीच्या नांगरणीमध्ये, नांगराच्या साहाय्याने 8 ते 12 इंच जमीन खणली जाते. नांगरणीचे समर्थन करणारे असे सांगतात की नांगरणी केल्यामुळे माती मोकळी होते व जेथे मुळे असतात तिथवर ऑक्सीजन व पाणी पोहोचू शकते. योग्य आहे, परंतू या प्रक्रियेमुळे मातीची रचना मोडली जाते व तिच्या सुपीकतेवर परिणाम होतो.

ज्यावेळी नांगरणी केली जात नाही, तेव्हा पूर्वी घेतलेल्या पिकांच्या उर्वरीत भागांत व तणांत लागवड केली जाते.2. नांगरणी केल्यामुळे खते व पिकांचा उर्वरीत भाग मिसळले जातात असा समज आहे, ज्यामुळे झाडाच्या मुळांपर्यंत पोषकघटक पोहोचू शकतात. यामुळे शेतकऱ्याचे आधी घेतलेल्या पिकाच्या उर्वरित भाग बाजूला करण्याचे (यांत्रिक व श्रमदानाचे) कष्टही कमी होतात.ज्यावेळी नांगरणी केली जात नाही, तेव्हा पिकाचे उर्वरित भाग पृष्ठभागावर राहू दिले जातात, त्यामुळे पदार्थ कुजून त्यांच्यातील पोषक घटक मातीमध्ये मिसळले जातात. शास्त्रीयदृष्ट्या हे सिध्द झाले आहे की, नांगरणी न केलेल्या जमिनीवर खतांचा (निर्जल अमोनिया, फॉस्फरस व पोटॅशियम) तेवढाच परिणाम होतो जेवढा नांगरणी केलेल्या जमिनीवर होतो.  3. नांगरणी करताना,संपूर्ण शेतजमिनीवर लागवड करण्यासाठी बी पेरली जाते. नांगरणी न करता, सध्या पद्धतीचा एक अरुंद व खोल खड्डा तयार केला जातो. अभ्यासावरून असे दिसून येते की, दोन्ही प्रकारच्या जमिनीत झाडांच्या मुळाची वाढ सारखीच होते. नांगरणी न केल्यामुळे असे दिसून येते की मातीच्या कमी भागाला हवा लागू शकते व मातीतून कमी प्रमाणात बाष्पीभवन होते.

4. मातीची झीज कशाप्रकारे होते हे समजून घेण्यासाठी पारंपारिक पद्धतीने नांगरणी केली जाते. परंतू नांगरणी न केलेल्या शेतजमिनीतून पावसाचे पाणी वाहून न जाणे यासारखे फायदे दिसून येतात. उतारावरील जी शेते नांगरलेली नसतात, त्यावर कायमच मातीचा वरचा थर कितीही जोराचा पाउस झाला किंवा वारा आला तरी टिकून राहिलेला दिसून येतो. पृष्ठभागावरील थर टिकून राहिल्यामुळे माती ओलसर राहते. पृष्ठभागावरील उर्वरीत भागांत पाणी साठविले जाते व त्यामुळे वाऱ्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनापासून पृथ्वीचे संरक्षण होते.5. पारंपारिक शेतीमध्ये, नायट्रोजनचा अंश असलेल्या खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे पृष्ठभागावरील संयुगे पाण्याबरोबर वाहून जातात. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यामुळे, नांगरणी न केलेल्या शेतजमीनीवर रसायने घातल्यास ती त्यांना योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते व त्यामुळे पिण्याचे पाणी दुषित होण्याची शक्यता कमी होऊ शकते.माती म्हणजे काय:?माती वनस्पतींच्या वाढीचे एक निसर्ग-निर्मीत माध्यम असून ते खनिजे, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायु (घन, द्रव व वायू) यांचे मिश्रण आहे.खनिज पदार्थ:हवामानाचे खडकांवरील हजारोवर्षे होत असलेल्या परिणामस्वरूप बनलेले असतात. उदा. वाळू, पोयटा व चिकण माती. या कणांचे प्रमाण व मांडणी, जमिनीची संरचना आणि पोत ठरवतात.

सेंद्रिय पदार्थ:वनस्पती व प्राणी अवशेषांचे अनेक वर्ष विघटन झाल्यामुळे बनलेले असतात. हे माती कणांना एकत्रित बांधून सूक्ष्मजिवांसाठी अन्न व ऊर्जा स्रोत म्हणून कार्य करतात.हवा:माती आणि वनस्पतींच्या मुळांमधील वायुरूपी ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे विनिमय करते.पाणी:एक वाहक म्हणून कार्य करते,ज्यावाटे वनस्पतींना पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.चांगली माती खालीलप्रमाणे असावी हवा आणि पाण्याचे वहन सुलभरीतीने होण्यासाठी मातीचा पोत पोयट्याचा असावा.सूक्ष्मजीवांची संख्या शाश्वत ठेवण्यासाठी मातीत पुरेशे सेंद्रिय पदार्थ असावेत.मातीची भौतिक स्थिती चांगली राखण्यासाठी तिचा पोत व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण चांगले असावे.मातीमधील वनस्पतींच्या मुळांची वाढ, पाण्याचा निचरा व वायू-विनिमय, या गोष्टींस पूरक अशी जडणघडण.अन्नद्रव्य व जलधारण क्षमता चांगली राखण्यास चिकण मातीचे व सेंद्रिय पदार्थांचे पुरेशे प्रमाण असावे.वनस्पतींची मुळे खोलवर जाण्यासाठी व पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी जमिनीची खोली व सच्छिद्रता चांगली असावी.वनस्पतींच्या मुळांच्या कक्षेतील मातीच्या थरांचा सामू व अन्नद्रव्यांचे प्रमाण मुळांच्या वाढीसाठी चांगले असावेत.

English Summary: It is essential to preserve the fertile topsoil
Published on: 17 June 2022, 08:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)