Agripedia

सत्य हे आहे की आजतागायत कोणालाही नांगरणी करण्याचे शास्त्रीय कारण मिळालेले नाही. हे एडवर्ड एच फॉकनरने त्याच्या १९४३ मध्ये लिहिलेल्या महत्त्वपूर्ण अशा प्लॉमॅन्स फॉली (शेतकऱ्याचा मूर्खपणा) या पुस्तकात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या समस्येवर एक उत्तर म्हणून नांगरणी न करणे हा एक पर्याय सुचविला जातो कित्येक लोकांना नांगरणी न करण्याचा निर्णय हा शेतीच्या दृष्टीने खूपच पुढारलेला वाटतो.

Updated on 08 December, 2021 7:39 PM IST

भारतात सेंद्रीय शेती करणाऱ्यांचे असे मानणे आहे की पूर्वीच्या काळात शेतकऱ्याने कधीही नांगर हाती घेतला नव्हता.

     आज अवघ्या ७० वर्षानंतर दिसत असलेले हे विडंबन आहे की एडवर्ड एच फॉकनरने त्याच्या १९४३ मध्ये लिहिलेल्या एका प्रसिद्ध अशा प्लॉमॅन्स फॉली (शेतकऱ्याचा मूर्खपणा) या पुस्तकात म्हटले आहे की शेतकरी नांगर वापरीत आलेले आहे. या लेखात आम्ही नांगरणी न करण्याचे काही फायदे वर्णन करणार आहोत जमिनीची नांगरणी अजिबात न केल्यास आर्थिक दृष्ट्या कोणते फायदे होऊ शकतात हे सांगणार आहोत एखाद्याचा नांगरणी करण्यावर विश्वास असो वा नसो एक गोष्ट नाकारता येणार नाही की वारा व टनाने केला जाणारा पाण्याचा वापर प्रति एकर प्रतिवर्षी केल्याने झिजत असलेला मातीचा वरील सुपीकथर वाचविणे अत्यावश्यक आहे नांगरणी न केल्यामुळे मातीचा वरील थर निश्चितपणे वाचवता येऊ शकतो. या पद्धतीचे काही फायदे आता पाहूया.

पारंपारिक पद्धतीच्या नांगरणीमध्ये नांगराच्या साहाय्याने ८ ते १२ इंच जमीन खणली जाते. नांगरणीचे समर्थन करणारे असे सांगतात की नांगरणी केल्यामुळे माती मोकळी होते जेथे मुळे असतात तिथवर ऑक्सीजन, पाणी पोहोचू शकते योग्य आहे, परंतू या प्रक्रियेमुळे मातीची रचना मोडली जाते तिच्या सुपीकतेवर परिणाम होतो. ज्यावेळी नांगरणी केली जात नाही तेव्हा पूर्वी घेतलेल्या पिकांच्या उर्वरीत भागांत व तणांत लागवड केली जाते.

नांगरणी केल्यामुळे खते पिकांच्या उर्वरीत भागात मिसळली जातात असा समज आहे ज्यामुळे झाडाच्या मुळांपर्यंत पोषक घटक पोहोचू शकतात. यामुळे शेतकऱ्याचे आधी घेतलेल्या पिकाच्या उर्वरित भाग बाजूला करण्याचे (यांत्रिक व श्रमदानाचे) कष्टही कमी होतात. ज्यावेळी नांगरणी केली जात नाही, तेव्हा पिकाचे उर्वरित भाग पृष्ठभागावर राहू दिले जातात, त्यामुळे पदार्थ कुजून त्यांच्यातील पोषक घटक मातीमध्ये मिसळले जातात शास्त्रीयदृष्ट्या हे सिध्द झाले आहे की, नांगरणी न केलेल्या जमिनीवर खतांचा (निर्जल अमोनिया फॉस्फरस, पोटॅशियम) तेवढाच परिणाम होतो जेवढा नांगरणी केलेल्या जमिनीवर होतो

नांगरणी करताना, संपूर्ण शेतजमिनीवर लागवड करण्यासाठी बी पेरली जाते. नांगरणी न करता, साध्या पद्धतीचा एक अरुंद, खोल खड्डा तयार केला जातो.

अभ्यासावरून असे दिसून येते की, दोन्ही प्रकारच्या जमिनीत झाडांच्या मुळाची वाढ सारखीच होते. नांगरणी न केल्यामुळे असे दिसून येते की मातीच्या कमी भागाला हवा लागू शकते व मातीतून कमी प्रमाणात बाष्पीभवन होते.

मातीची झीज कशाप्रकारे होते हे समजून घेण्यासाठी पारंपारिक पद्धतीने नांगरणी केली जाते परंतू नांगरणी न केलेल्या शेतजमिनीतून पावसाचे पाणी वाहून न जाणे यासारखे फायदे दिसून येतात उतारावरील जी शेते नांगरलेली नसतात, त्यावर कायमच मातीचा वरचा थर कितीही जोराचा पाउस झाला किंवा वारा आला तरी टिकून राहिलेला दिसून येतो. पृष्ठभागावरील थर टिकून राहिल्यामुळे माती ओलसर राहते पृष्ठभागावरील उर्वरीत भागांत पाणी साठविले जाते व त्यामुळे वाऱ्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनापासून पृथ्वीचे संरक्षण होते.

पारंपारिक शेतीमध्ये, नायट्रोजनचा अंश असलेल्या खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे पृष्ठभागावरील संयुगे पाण्याबरोबर वाहून जातात. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यामुळे, नांगरणी न केलेल्या शेतजमीनीवर रसायने घातल्यास ती त्यांना योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते व त्यामुळे पिण्याचे पाणी दुषित होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

शेतकऱ्याला नांगरणी न केल्याचे अनेक फायदे मिळू शकतात त्याला कोणतीही मशीन जसे, नांगर, कल्टीव्हेटर किंवा डिस्क हॅरो ई. भाड्याने घ्यावे लागत नाही. नांगरणी न करता लागवड करण्यासाठी लहानसा ट्रॅक्टर पुरेसा असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होऊ शकते.

नांगरणी केलेल्या शेतात जितके उत्पादन मिळते तितकेच उत्पादन नांगरणी न केलेल्या जमिनीतून मिळू शकते. फेब्रुवारी नंतरही काही काळ माती थंड राहू शकते कारण हा उर्वरीत भाग संरक्षक थर असल्याप्रमाणे काम करतो तसेच, रात्रंदिवस दिसून येणारे मातीच्या तापमानातील बदल कमी असतात.

नांगरणी केल्यामुळे लागवड करण्यापूर्वी किंवा लागवडीनंतर तणाचे नियंत्रित निश्चित होऊ शकते.

संकलन : प्रविण सरवदे,कराड

English Summary: It is essential to preserve the fertile soil layer.
Published on: 08 December 2021, 07:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)