तर एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमधील महत्वाचा भाग म्हणजे जैविक कीटकनाशके होय.
जैविक किट व्यवस्थापणात मित्र किटकांसोबत जैविक कीटकनाशके सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात. "जिवो जीवस्य जीवनम"हे निसर्गाचे अबाधीत व अटळ चक्र आहे.
याच चक्राचा अभ्यास करून संशोधकांनी शत्रुकिडीस निसर्गतः नियंत्रित करणारे रोग जंतू(बुरशी,विषाणू,जिवाणू ई.)सूत्रकृमी व वनस्पतीजन्य घटकांची ओळख पटवली आहे.अशा गोष्टींचा वापर करून आपण पर्यावरण पूरक असे कीड नियंत्रण करू शकतो.
बुरशीजन्य जैविक किटनाशके:-
जसे आपल्याला एखादे जसे फ़ंगल इन्फेक्शन होते तसेच पिकावर येणाऱ्या किडीना सुद्धा बुरशीजन्य रोग होत असतात.अशाच विविध बुरशीचा वापर करून कीड नियंत्रण करण्यात येते.
मेटारायझियम एनीसोप्ली नावाची बुरशी वापरल्यास लेपीडोप्टेरन अळ्या तसेच हुमणी किडीस बुरशी रोग होऊन मरण पावतात.
त्यासोबत बिव्हेरिया बॅसियाना, न्यूमोरीया रिले, मेटारायझियम , व्हर्टीसीलियम लेकॅनी इत्यादी प्रमुख परोपजीवी बुरशी जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल जातात
परोपजीवी जिवाणू/जिवानूजन्य कीटकनाशके:-
बुरशी सोबतच वातावरणात अनेक असे जिवाणू आहेत जे शत्रूकिडीस रोगग्रस्त करून मारून टाकतात. त्यामध्ये बॅसीलस थुरिंजीएनसिस(बिटी)हा जिवाणू आघाडीवर आहे. बऱ्याच वेळा आपण याचा वापर देखील केला असेल. याच जिवाणूंची जनुके कापसामध्ये वापरून बीटी कॉटन तयार केला गेला.या जिवाणूची फवारणी करून बोंड अळीचे नैसर्गिकरित्या नियंत्रण करणे अगदी सोपे झाले आहे.जेव्हा बोंडअळीच्या शरीरात हा जिवाणू जातो तेव्हा पोटविष तयार होऊन अळी मरून जाते.
फोटोरॅबडस लुमिनेसन्ससारखे जिवाणू घाटे अळी, लष्करी अळी, फळभाज्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, कोबीवरील किडी व इतर पतंगवर्गीय किडींच्या अळी अवस्था प्रभावी व्यवस्थापनाकरिता मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
सूत्रकृमी जन्य कीटकनाशके:-
निसर्गतःच मातीमध्ये हेट्रोरॅबडीटीस इंडिका, स्टेनरनेमा कार्पोकाप्सीसारखे काही परोपजीवी सूत्रकृमी असतात. हे सूत्रकृमी घाटे अळी, लष्करी अळी, हुमणी अळी व इतर पतंगवर्गीय किडींवर जगतात. त्यामुळे या सूत्रकृमीची जैविक कीटकनाशके तयार करून त्यांचा वापर कीड नियंत्रणामध्ये केला जातो.
सूत्रकृमीनाशक परोपजीवी बुरशी - पॅसिलोमायसीस लीलॅसिनस ही जैविक सूत्रकृमिनाशक बुरशी असून, मुळावरील गाठी करणा-या सूत्रकृमीच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.सुत्रकृमीच्या नियंत्रनासाठी झेंडूचे आंतरपीक जरी घेतले,तरी खूप फायदा होतो. कारण झेंडूच्या मुळामध्ये सूत्रकृमी नाशक रसायने असतात.
परोपजीवी विषाणू/विषानुजन्य कीटकनाशके:-
निसर्गात काही विषाणू आहेत जे किडींवर उपजीविका करून त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात व किडींचे नियंत्रण करतात, अशा विषाणूला कीटकांवरील परोपजीवी विषाणू व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना विषाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. घाटेअळीचा विषाणू (HaNPV), लष्करी अळीचा विषाणू (SINPV), उसावरील खोडकिडीचा ग्रॅनूलिसीस विषाणूसारखे परोपजीवी विषाणू जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात असून, ते विशिष्ट किडींवरच जगतात.
संकलन - IPM school
- शरद केशवराव बोंडे
Published on: 06 October 2021, 08:20 IST