Agripedia

भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. भारतात आता शेती बदलत चालली आहे, शेतकरी आता पारंपरिक पिक लागवडीकडे न वळता औषधी पिकांच्या तसेच नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत आणि त्यातून जबरदस्त कमाई देखील करत आहेत. आज आपण अशाच एका पिकाविषयीं जाणुन घेणार आहोत, आम्ही ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते आहे तुळशीचे पिक.आपल्याकडे सनातन धर्मात तुळशीला देवीचे रूप मानले जाते आणि तिची पूजा केली जाते, भारतात जवळपास सर्व हिंदु बांधवांच्या घरात तुळशी लावली जाते आणि तिची पूजा हि केली जाते.

Updated on 26 November, 2021 8:29 PM IST

भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. भारतात आता शेती बदलत चालली आहे, शेतकरी आता पारंपरिक पिक लागवडीकडे न वळता औषधी पिकांच्या तसेच नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत आणि त्यातून जबरदस्त कमाई देखील करत आहेत. आज आपण अशाच एका पिकाविषयीं जाणुन घेणार आहोत, आम्ही ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते आहे तुळशीचे पिक.आपल्याकडे सनातन धर्मात तुळशीला देवीचे रूप मानले जाते आणि तिची पूजा केली जाते, भारतात जवळपास सर्व हिंदु बांधवांच्या घरात तुळशी लावली जाते आणि तिची पूजा हि केली जाते.

तुळशीला धार्मिकदृष्टीने खुप महत्व प्राप्त आहे शिवाय तिच्या औषधी गुणामुळे तिला आयुर्वेदात देखील महत्वपूर्ण स्थान लाभले आहे. तिला आयुर्वेदवर विश्वास ठेवणारे लोक औषधंची राणी म्हणून ओळखतात.

 तुळशीची संपूर्ण जगात शेती केली जाते, आपल्या भारतात देखील पूर्वीपासून तुळशीची शेती केली जाते. तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे याची शेती प्रामुख्याने केली जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात त्यामुळे याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. जर आपणही शेतकरी असाल आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीचा विचार करत असाल तर तुळशीची लागवड करून आपण चांगले उत्पन्न अर्जित करू शकता. तुळशीची लागवड करायला खर्च फार कमी येतो आणि त्यातून उत्पन्न हे जास्त प्राप्त केले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केवळ 15000 रुपये खर्च करून आपण तुळशी वनस्पतीची लागवड करू शकता.

तुळशी शेतीचे एकंदरीत गणित जाणुन घ्या

तुळशी एक औषधीय वनस्पती आहे आणि यापासून आपण पाने आणि बिया अशा दोन गोष्टी प्राप्त करू शकतो. मार्केटमध्ये तुळशीच्या बिया ह्या विकल्या जातात तर तुळशीच्या पानापासून हे तेल काढले जाते. बाजारभावाचा विचार केला तर तुळशीच्या बिया ह्या बाजारात 200 रुपये किलोपर्यंत विकले जातात. तर तुळशीचे तेल हे 800 रुपये किलोपर्यंत विकले जाते. यावरून आपले लक्षात आले असेल की तुळशीच्या शेतीतुन आपण 3 लाखापर्यंत कमाई करू शकतो. एक एकर तुळशीच्या लागवडीसाठी 5000 रुपय अंदाजे खर्च येतो, आणि यातून 40000 रुपयाची कमाई होते. 

म्हणजे 35000 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट होऊ शकतो. तुळशीचे पिक वर्षातून तीनदा घेतले जाते म्हणजे एका एकरात 1 लाख रुपयापर्यंत वर्षाकाठी नेट प्रॉफिट होतो. जर आपण एक हेक्टर क्षेत्रात याची लागवड केली तर आपल्याला 300000 रुपयांची कमाई होते आणि नेट प्रॉफिट 2,60,000 पर्यंत राहू शकतो. यावरून आपल्या लक्षात आले असेल की कमी खर्चमध्ये आणि कमी वेळात तुळशी लागवड करून चांगली कमाई हि केली जाऊ शकते.

English Summary: investment of 15000 rupees cultivate basil crop for more profit
Published on: 26 November 2021, 08:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)