Agripedia

अलीकडे शेतकरी पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देत नवनवीन पिकांची लागवड करत आहेत आणि चांगली कमाई देखील करत आहेत. अनेक शेतकरी औषधी वनस्पतीची लागवड करतात, तर काही शेतकरी शोभेच्या वनस्पतीची लागवड करतात आणि चांगला बक्कळ पैसा कमवतात. आज अशाच एका शोभेच्या झाडाची लागवड पद्धत आपण जाणुन घेणार आहोत. आम्ही ज्या झाडाविषयीं बोलत आहोत ते प्लांट आहे, बोनसाई प्लांट. बोनसाई प्लांटला अलीकडे गुडलक म्हणून ओळखले जाते त्यामुळे अनेक लोक बोनसाई प्लांटला आपल्या घरात लावतात. त्यामुळे या झाडाची मागणी खूप वाढली आहे. आपण या झाडाची लागवड करून बक्कळ पैसा कमवू शकता.

Updated on 21 December, 2021 11:47 AM IST

अलीकडे शेतकरी पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देत नवनवीन पिकांची लागवड करत आहेत आणि चांगली कमाई देखील करत आहेत. अनेक शेतकरी औषधी वनस्पतीची लागवड करतात, तर काही शेतकरी शोभेच्या वनस्पतीची लागवड करतात आणि चांगला बक्कळ पैसा कमवतात. आज अशाच एका शोभेच्या झाडाची लागवड पद्धत आपण जाणुन घेणार आहोत. आम्ही ज्या झाडाविषयीं बोलत आहोत ते प्लांट आहे, बोनसाई प्लांट. बोनसाई प्लांटला अलीकडे गुडलक म्हणून ओळखले जाते त्यामुळे अनेक लोक बोनसाई  प्लांटला आपल्या घरात लावतात. त्यामुळे या झाडाची मागणी खूप वाढली आहे. आपण या झाडाची लागवड करून बक्कळ पैसा कमवू शकता.

आज आम्ही आपणास सांगणार आहोत की या झाडाची लागवड आपण कशी करू शकता तसेच यातून आपण कसे उत्पन्न कमवू शकता, या झाडाच्या लागवडीसाठी एकंदरीत किती खर्च येतो याविषयी देखील आज आपण जाणुन घेणार आहोत. या झाडाची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्य देखील दिले जाते.

किती असते या झाडाची किंमत

अलीकडे बोंसाई प्लांट ला एक लकी प्लांट म्हणून ओळखले जाते, म्हणून अनेक लोक याला आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये सजावटीसाठी ठेवतात. त्यामुळे त्याची मागणी गेल्या काही दिवसापासून लक्षणीय वाढली आहे. अलीकडे या झाडाची किंमत बाजारात 200 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या झाडाचे शौकीन लोक यांची चांगली किंमत मोजून जातात.

आपण दोन पद्धतीने कमाई करू शकता

आपण खुपच कमी खर्चात या झाडाची लागवड करू शकता आणि यांच्या विक्रीतून चांगली कमाई करू शकता. असे असले तरी हे झाड विकसित होण्याला थोडा उशिर लागतो, अंदाजित 2 ते 5 वर्ष हे झाड विकसित होण्याला वेळ लागतो. याव्यतिरिक्त आपण डायरेक्ट नर्सरी मधून या झाडाची खरेदी करून ते चढ्या दामावर विकु शकता आणि कमाई करू शकता.

ह्या गोष्टींची गरज भासेल

ह्या झाडाची शेती सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी, वालुयुक्त माती किंवा वाळू, मातीची भांडी आणि काचेची भांडी, आपण या झाडाची लागवड शेतात, परसबागेत किंवा गच्चीवर सुद्धा करू शकता, 100 ते 150 चौरस फूट जागा असेल तर आपण याची लागवड करू शकता. शेड बनवण्यासाठी स्वच्छ खडे किंवा काचेच्या गोळ्या, पातळ वायर लागेल. झाडांवर पाणी शिंपडण्यासाठी स्प्रे बाटली, जाळी आवश्यक आहे.  आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुम्ही ह्या झाडाची लागवड छोट्या स्तरावर सुरू केली तर सुमारे 5 हजार रुपयांची गुंतवणूक आपणांस करावी लागेल.  त्याच वेळी, जर तुम्ही लागवड थोडी अधिक केली ​​तर 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल.

किती होणार कमाई

बोन्सायच्या झाडाच्या जातीनुसार आणि आपण आपल्या आवश्यकतेनुसार एक हेक्टरमध्ये 1500 ते 2500 झाडे लावू शकता. जर तुम्ही 3 x 2.5 मीटरवर एक रोप लावले तर एक हेक्टरमध्ये सुमारे 1500 रोपे आपणांस लागवडीसाठी लागतील. इतकंच नाही तर आपण खाली पडलेल्या जागेत आंतरपीक देखील घेऊ शकता. या झाडाच्या लागवडीतून तुम्हाला 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये मिळू लागतील.  विशेष बाब म्हणजे तुम्हाला दरवर्षी प्रत्यारोपण करण्याची गरज भासणार नाही कारण बोनसाईचे रोप 40 वर्षे पर्यंत चालते.

English Summary: invest two thousand rupees and earn in lakhs do farming of bonsai plant
Published on: 21 December 2021, 11:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)