Agripedia

ग्रामीण भागात राहून जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती किंवा त्याला पूरक व्यवसाय सुद्धा करू शकता.आताच्या काळात बाजारामध्ये किंवा शहरामध्ये पारंपरिक शेतमालाला जास्त महत्व नसून आरोग्याच्या दृष्टीने जी चांगली पिके आहेत त्या पिकांना महत्व दिले जात आहे आणि बाजारपेठेत नागरिकांची जास्तीत जास्त मागणी वाढलेली आहे.अळंबी किंवा मशरुमची शेती हा एक उत्तम व्यवसाय तुम्ही करू शकता. मशरूम हे पीक फक्त आपल्या आरोग्यासाठी, पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म मधून नाही तर निर्यातीसाठी सुद्धा खूप महत्वाचे पीक आहे.

Updated on 19 September, 2021 4:15 PM IST

ग्रामीण भागात राहून जर तुम्हाला व्यवसाय  चालू करायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती(farming)  किंवा त्याला पूरक व्यवसाय सुद्धा  करू शकता.आताच्या  काळात  बाजारामध्ये किंवा शहरामध्ये पारंपरिक शेतमालाला  जास्त महत्व नसून आरोग्याच्या दृष्टीने जी चांगली पिके(crop) आहेत त्या  पिकांना महत्व दिले जात आहे  आणि बाजारपेठेत  नागरिकांची जास्तीत जास्त मागणी वाढलेली आहे.अळंबी किंवा मशरुमची शेती हा एक उत्तम व्यवसाय तुम्ही करू शकता. मशरूम हे पीक फक्त आपल्या आरोग्यासाठी, पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म मधून नाही तर निर्यातीसाठी सुद्धा खूप महत्वाचे पीक आहे.

मशरूम च्या शेतीमधून अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचे उत्पादन काढलेले आहे. शहरात मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये मोठ्या प्रमाणात मशरूम ची मागणी आहे.

कशी कराल मशरुमची शेती?

तुम्हाला जर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जर मशरूम शेतीमधून जर कमाई करायची असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मशरूम च्या लागवडीसाठी कोणती कोणती तंत्रे वापरली जातात त्याकडे लक्ष दिले पाहिजे.१० किलो मशरूम चे उत्पादन तुम्ही प्रति चौरस मीटर काढू शकत. ४० × ३० फूट जागेवर तीन तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम ची शेती वाढवायला येते. तुम्ही हा व्यवसाय सरकारचे अनुदान घेऊन चालू करू शकता.


हेही वाचा:हिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र

बटन, ऑईस्टर, दुधी तसेच अळंबी चे उत्पादन व्यापारी तत्वावर घेतले जाते. शेतातील भात कापणी झाल्यानंतर जो पेंढा राहतो तो अळंबी (mushroom)तयार करण्यासाठी वापरला जातो आणि जेव्हा अळंबी चे उत्पन्न घेतल्यानंतर उरलेला जो चोथा असतो तो पुन्हा शेतात खत म्हणून वापरला येतो त्यामुळे च शेतीसाठी अळंबी हा पूरक व्यवसाय म्हणून म्हटले जाते.कृषी संशोधन केंद्रामध्ये आणि कृषी विद्यापीठ मध्ये कशा प्रकारे मशरूम पिकाची लागवड करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात मशरूम ची लागवड करायची असेल तर त्यास तुम्हाला लक्ष देऊन आणि योग्यरीत्या मशरूम लागवड प्रशिक्षण घेतले पाहिजे.

किती कमाई होईल?

तुम्ही जर आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करायला सुरू केले तर सुरुवातीस तुम्ही लाखो रुपये कमवू शकता तसेच जर तुम्ही १०० चौ. फूट क्षेत्रावर अळंबीची लागवड केली तर वर्षाकाठी १ लाख ते ५ लाख रुपयांचा नफा मिळेल.

English Summary: Invest Rs 50,000 in farming and earn Rs 5 lakh
Published on: 19 September 2021, 04:13 IST