Agripedia

निमॅटोड हे सूक्ष्म आणि धाग्यासारखे लांबट असतात व सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मि.मी. इतकी असते. निमॅटोड उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, त्यांच्या निरीक्षणासाठी कमी क्षमतेच्या सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला जातो. निमॅटोड ची मादी सरासरी 90 ते 100 अंडी पुंजक्यानने घालते.

Updated on 22 December, 2021 3:12 PM IST

यांच्यामध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार आढळतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या आखूड, जाड अवस्था नर बनतात; तर लांबट, पातळ अवस्था माद्या बनतात. नर आणि मादी पिल्लाची वाढ चार अवस्थांमध्ये पूर्ण होते.

निमॅटोडच्या वाढीसाठी 13 ते 34 डिग्रि तापमान योग्य ठरते, जास्त योग्य 29 डिग्री आहे. उन्हाळ्याच्या उबदार वातावरणात निमॅटोडच्या कित्येक जाती अंडी अवस्थेतुन परिपक्व अवस्थेत 21 ते 28 दिवसांत पोहचतात.

 

प्रकार

वनस्पतींवरील म्हणजेच वनस्पतीवर जगणारे सुत्रकृमी

पिकांवर मुख्यत्वे दोन प्रकारचे आढळतात.

1) पहिल्या गटातील सुत्रकृमी हे पिकांच्या मुळांमध्ये राहतात आणि मुळांवर जगतात.

2) दुसर्या गटातील सुत्रकृमी हे पिकांच्या मुळांवर जगतात मात्र जमिनीत राहतात.

 

पिकांवरील निमॅटोड प्रमुख प्रजाती :

1) रुट -नॉट निमॅटोड

2) सिस्ट निमॅटोड

3) लेजन निमॅटोड

4) रोनिफॉर्म निमॅटोड 

5) सायटस निमॅटोड

6) बरोवींग निमॅटोड

1) भाजीपाला वर्गातील पिकांमध्ये -टोमॅटो, वांगी, भेंडी, मिर्ची, वाटाणा, काकडी,

कलिंगड, खरबूज, कारली इ. वेलवर्गीय 

2) फळ पिकांमध्ये - :केळी, डाळिंब, पेरू, 

3)नगदी पिकांमध्ये - 

ऊस,भुईमूग, 

4) अन्नधान्य पिकांमध्ये- तांदुळ, गहू, तूर, भुईमूग, इत्यादी पिकांमध्ये सुत्रकृमींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो.

पिकांवरील परिणाम

निमॅटोड जमिनीत अंड्यांच्या स्वरुपात सुप्तवस्थेत राहतात . सहसा मादी हि मुळांतुन बाहेर निघत नाही, मुळांवरिल नरम पडलेल्या गाठीत ती अंडी देवुन राहते. मात्र नर मुळे सोडुन बाहेर पडतो. ज्यावेळेस वातावरण पोषक असते त्यावेळेस प्रामुख्याने मुळांच्या टोकाद्वारे प्रादुर्भाव होतो.

 कधी कधी या गाठी 1 इंच इतक्या जाडीच्या बनतात.

पिकाची वाढ कमी होते वाढ खुंटते,अन्नद्रव्यांची कमतरता दिसु लागते अन्नद्रव्ये पूर्णपणे लागू होत नाहीत.पिक पोषणास अन्नद्रव्ये व पाणी मिळत नाही. 

फुले कळी निघण्याचा कालावधी लांबतो, सेटिंग होत नाही, कळी गळ होते. उबदार बागायती परिसरात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येतो 

प्रामुख्याने डाळिंब पिकामध्ये

कांदा पिकामध्ये पिवळे पडणे , पात वाकडी होणे व अचानक उन्मळून पडणे.

पिक निस्तेज होत,पानांचा आकार लहान होतो, पाने पिवळी पडून वाळतात. प्रादुर्भाव जास्त असेल तर बरेचदा पिक वाळून जाते.

उत्पादनात घट होते. 

निमॅटोड प्रथम विकर स्त्रवतात. हे विकरं पेशींचे विघटन करतात.निमॅटोड या विघटीत पदार्थांचे आपल्या सुईसारख्या तीक्ष्ण अवयवांद्वारे रस शोषण करतात. प्रादुर्भाव मुळे पिकाची किड व रोग प्रतीकारक्षमता कमी होते. बुरशी व जीवाणु जन्य रोगांना लवकर बळी पडते.

 निमेटोड साठी आपण जी केमिकल औषधे जमीनीमध्ये देत असतो त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू मारले जातात. पर्यायाने पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो. उत्पन्नामध्ये घट होते. 

बऱ्याचदा केमिकल औषधांचा प्रभाव फक्त ठराविकच जागेत असल्यामुळे निमेटोड तेथून लांब जाऊन राहतात व ज्यावेळी प्रभाव कमी होतो त्यावेळी परत येऊन पिकांच्या मुळांवर राहतात. 

त्यामुळे आपला खर्च वाढत जातो. त्यापेक्षा आपण जर YSB Agro technologies Pvt. Ltd कंपनीचे "Nemicron"औषधाचा वापर केला तर आपल्या जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढत राहून जमिनीतील निमेटोड कंट्रोल केला जाऊ शकतो. कारण या औषधांमध्ये निमेटोडवर जगणारे जिवाणू आहेत.

कृषि मार्गदर्शन

कु. योगेश एस. पाटील.

मो.9623257130,9561597130

(YSB ग्रुप चे संस्थापक उत्तर महाराष्ट्र)

English Summary: Introduction of nematode
Published on: 22 December 2021, 03:12 IST