Agripedia

पाण्याची उपलब्धता आणि जमीन यांचा योग्य समन्वय साधून फायदेशीर पीक पद्धतीचा वापर ही कोरडवाहू शेतीतील महत्वाचे सूत्र आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातून पीक उत्पादनासह जमिनीची सुपीकता तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते.

Updated on 25 February, 2022 3:21 PM IST

 पाण्याची उपलब्धता आणि जमीन यांचा योग्य समन्वय साधून फायदेशीर पीक पद्धतीचा वापर ही कोरडवाहू शेतीतील महत्वाचे सूत्र आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातून पीक उत्पादनासह जमिनीची सुपीकता तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते.

 कोरडवाहू शेतीतील हेक्टरी उत्पादन वाढविणे, प्रतिकूल वातावरणात चांगले उत्पादन मिळवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. कोरडवाहू शेती उत्पादन वाढीसाठी उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांचा ( जमीन, हवामान, पाणी )शास्त्रीयदृष्ट्या पुरेपूर उपयोग करून सुधारित तंत्रज्ञानाचा द्वारे विकास करता येईल.

  • खत व्यवस्थापन:-
  • रब्बी ज्वारी :-
  • ज्वारीची कडधान्यासोबत फेरपालट फायदेशीर ठरते.
  • कोरडवाहू पेरणीसाठी हेक्‍टरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश द्यावे.
  • पेरणीवेळी नत्र स्फुरद पालाश ची संपूर्ण मात्रा द्यावी.
  • अझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • घरगुती बियाणे असल्यास 300 मेश गंधकाची भुकटी चोळूनबियाण्यांचा वापर करावा.
  • हरभरा :-

कोरडवाहू स्थितीत पेरणीसाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश द्यावे.

 पेरणीवेळी नत्र, स्फुरद व पालाश ची संपूर्ण मात्रा द्यावी.

पेरणीपूर्वी रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे आणि ट्रायकोडर्माची प्रक्रिया फायदेशीर ठरते.

 घाटे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी.

  • राजमा :-

 पेरणीसाठी हेक्‍टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश द्यावे.

 पेरणी वेळी नत्राची अर्धी मात्रा तसेच सुरत व पालाश यांची संपूर्ण मात्रा द्यावी. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी.

रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करावी.

  • सूर्यफूल :-

 हेक्‍टरी 60 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे. पेरणी वेळी नत्राची अर्धी मात्रा व स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी.

 नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी.

 पेरणीपूर्वी अझोटोबॅक्टर  250  ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.

  • करडई :-

 पेरणीसाठी हेक्‍टरी 20 किलो नत्र व 20 किलो स्फुरद द्यावे.

 पेरणी वेळी संपूर्ण खतांची मात्रा द्यावी. खरिपात कडधान्य पीक घेतले असल्यास करडई पिकास नत्राच्या शिफारशीची 50 टक्के मात्रा द्यावी.

 पेरणीपूर्वी अझोस्पिरिलमव स्फुरद विद्राव्य जिवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रति 10किलोयाप्रमाणे प्रक्रिया कराव.

 

  • जवस :-

 पेरणीसाठी हेक्‍टरी 25 किलो नत्र व 25 किलो स्फुरद द्यावे.

 पेरणी वेळी संपूर्ण खतांची मात्रा द्यावी.

  • मोहरी :-

 पेरणीसाठी हेक्‍टरी 40 किलो नत्र, व 20 किलो स्फुरद द्यावे.

 पेरणी वेळी पूर्ण खतांची मात्रा द्यावी.

English Summary: intigreated fertilizer management of some crop in drought area
Published on: 25 February 2022, 03:21 IST