Agripedia

तूर पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे हे पाहुयात पेरणीपूर्वी:- पारंपरिक पद्धती:- 1.पेरणी वेळेवर करावी. 2.मागील पिकाचे अवशेष एकत्रित करून शेताबाहेर नष्ट करावेत.

Updated on 30 September, 2021 9:36 AM IST

3.जमिनीस विश्रांती देण्यासाठी,किडीच्या जमिनीतील विविध अवस्था जसे,कोष नष्ट करण्यासाठी,बुरशी,सूत्रकृमी यांचे अवशेष नष्ट करण्यासाठी उन्हाळ्यात नांगरट करावी.जमीन किमान एक ते दीड महिना तापू द्यावी.

4.सापळा पीक,बॉर्डर क्रॉप म्हणून ज्वारी,बाजरी,झेंडू किंवा मक्का मुख्य पिकाच्या बाजूने चार ओळीत घ्यावा.

5.तुरीमधील किडी ज्या पिकामध्ये येत नाहीत त्या पीका सोबत फेरपालटणी करावी.

6.पिकाच्या योग्य वाढीसाठी तसेच पीक निरोगी रहावे यासाठी शेणखते 4 टन एकरी/व्हर्मीकंपोस्ट 2 टन एकरी टाकावीत.व्हर्मीकंपोस्ट टाकताना त्यामध्ये ट्रायकोडर्मा ही मिञबुरशी मिसळावी.

7.कीड व रोगांना सहनशील किंवा प्रतिरोधक असणाऱ्या प्रमाणित,रोगमुक्त वाणाची लागवडीसाठी निवड करावी.

8.रासायनिक खतांचा समंजस वापर करावा.अतिवापर टाळावा.

पीक वाढीदरम्यान

 यांत्रिक पद्धती:-

1.रोगग्रस्त/कीडग्रस्त भाग वेळीच कट करून पिकाबाहेर नष्ट करावेत.

2.लहान अळी व अंडीपुंज दिसताच नष्ट करावेत.

3.रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी व पिकामधीन प्रमाण तपासण्यासाठी सुरवातीपासून एकरी किमान 40 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत.

4.शेंगा पोखरणाऱ्या(Marucca vitrata) अळीसाठी व शेंगा खाणाऱ्या अळी(Helicovorpa armigera) साठी किमान एकरी 10 फेरोमोन ट्रॅप लावून घ्यावेत.जेणे करून पिकातील किडीचे प्रमाण समजेल व पुढे होणाऱ्या किडीस अटकाव होईल.

5.सापळ्यांसोबत एकरी 10 पक्षी थांबे उभे करावेत.त्यामुळे किडीच्या विविध अवस्था पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष बनतील.

पीक वाढी दरम्यान अळी अवस्था निदर्शनास आल्यास

जैविक पध्दती:-

1.बी टी युक्त कीटकनाशकांची 5% wp 400-500gm/एकर 

2.शेंगा खाणाऱ्या अळीसाठी NPV हे विषाणू जनीत कीटकनाशक 2%AS 100-200 ml /एकरी

जेव्हा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातेय अस जाणवल्यासच

रासायनिक पद्धती:-

खालीलपैकी एका कीटकनाशकाचा उपयोग करावा.

बेंफ्युराकार्ब 40% EC@1000 ml in 200 l of water/acre 

 क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% SC@60 ml in 200-300 I of water/acre 

डायमिथोएट 30% EC @ 494.8 ml in 200-400 I of water/acre 

 इमामेकटीन बेन्झोएट 5% SG @88 g in 200-300 1 of water/acre 

  लॅमडा-सायहेलोत्रिन 5% EC @160-200 ml in 160-240 I of water/ acre  

रासायनिक कीटकनाशके वापरण्याआधी घ्यावयाची काळजी:- 

रासायनिक फवारणी घेणे खरंच गरजेची असेल तरच फवारणीचा निर्णय घ्यावा.

किटकनाशक खरेदी केल्यानंतर लेबल क्लेम नीट वाचावे.

अपुऱ्या माहितीनुसार रसायने एकमेकांत मिसळणे टाळावे.

दर वेळी एकच कीटकनाशक न फवारता आलटून पालटून फवारणी करावी म्हणजेच किडीमध्ये प्रतिरोधक क्षमता तयार होणार नाही.

फवारणी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावी.

 

संदर्भ:- राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंदन संस्था, राजेंद्रनगर,हैदराबाद

 संकलन - IPM SCHOOL

 

English Summary: intergrated pest management in red gram
Published on: 30 September 2021, 09:36 IST