आता यामधील प्रत्येक पद्धतीचे वेगळे वैशिष्ट्य व प्रत्येकाचे विशिष्ट असे महत्व आहे. थोडक्यात प्रत्येक पद्धत पाहू...
कोणत्याही किडीसाठी नियंत्रणाचा पहिला सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रतिबंध होय.
पारंपरिक पद्धती(Cultural Method):-
कोणतीही कीड व्यवस्थापन पद्धत वापरण्याआधी त्यामधील प्रतिबंधक उपाय पहिल्यांदा निवडावे.
जसे
१.तणमुक्त बांध व शेत ठेवणे.
२.उन्हाळ्यात शेत नांगरून किमान 2 महिने तापवणे त्यामुळे किडीच्या विविध अवस्था (जसे-कोष) पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष्य बनतील.
३.सुरवातीस मागील पिकाचे अवशेष शेताबाहेर नष्ट करावे.
४.कमी प्रादुर्भाव असताना अळी किंवा इतर किडींच्या अवस्था दिसल्यास गोळा करून नष्ट करणे. खराब भाग काढून टाकणे.
५.सापळा पीक घेणे.
६.यानुसार पीक लागवडी आधी संपूर्ण शेत कीड मुक्त ठेवणे.
७.मित्रबुरशी वापरून बीजप्रक्रिया/रोपप्रक्रिया
यांत्रिक पद्धती(Mechanical Method):-
जेव्हा भौतिक साधनांचा वापर कीड व्यवस्थापनात होतो तेव्हा ते यांत्रिक पद्धतीने कीडव्यवस्थापन होते.या पद्धती प्रतिबंध उपायांमध्ये गणल्या जातात.
जसे:-
विशिष्ट किडीसाठी कामगंध सापळे लावणे.
पक्षी थांबे उभे करणे.
जैविक पध्दती(Biological Methods):-
जेव्हा पारंपरिक,यांत्रिक पद्धती वापरण्याची वेळ संपते किंवा वापरणे शक्य नसते तेव्हा जैविक पद्धतींचा आधार घेऊ शकतो.
आपण घरामध्ये उंदीर येऊ नये म्हणून मांजर पाळतो. उंदीर हे मांजराचे नैसर्गिक भक्ष्य. त्याच प्रमाणे वातावरणात प्रत्येक किडीचे नैसर्गिक शत्रू असतात आणि तेच नैसर्गिकरित्या किड व्यवस्थापन करतात. त्यामध्ये अनेक मित्रकीटक(लेडी बर्ड बिटल,ट्रायकोग्रार्मा,सिरफीड माशी,लेसविंग),जिवाणू(बॅसिलस,व्हर्टिसिलीअम),विषाणू (PNPV,Baculoviruses),मित्र बुरशी (ट्रायकोडर्मा, बवेरिया,मेटरझियम,) यांचा वापर होत असतो. जे नैसर्गिकरित्या किडींचे किडींचा बंदोबस्त करत असतात.
रासायनिक पद्धती:-पारंपरिक,जैविक,यांत्रिक,पद्धतींचा वापर करून सुद्धा जेव्हा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातेय असं जाणवल्यासच रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा.
कीटकनाशकांचा वापर आपण टाळू शकत नाही पण पारंपरिक,जैविक,यांत्रिक,पद्धतींवर भर देऊन 70 ते 80 टक्यांनी नक्की कमी करू शकतो. कीटकनाशके वापरताना शिफारशीत प्रमाण,लेबल क्लेम,काढणीपूर्व प्रतीक्षाकाळ(PHI) यावर कटाक्षाने लक्ष द्यावे तेव्हाच शेतीमालामध्ये मिळणारे त्यांचे अंश कमी होतील व नक्कीच आपला उत्पादन खर्च कमी होईल. पिकानुसार यापद्धतींच्या वापरात थोडेफार बदल होऊ शकतात.पण मुख्य गाभा हाच राहतो.सर्व व्यवस्थापन पद्धती थोडक्यात देतोय कारण सविस्तर देन्यास लेखन मर्यादा आहेत तरी प्रत्येक पद्धतीचा नंतर आपण सविस्तरपणे आढावा घेऊच.
सचिन इंगोले यवतमाळ
सचिन चौगुले रुकडी कोल्हापूर
Published on: 02 October 2021, 06:33 IST