मागील काही वर्षापासून पिकाच्या विविध अवस्थेत जसे की वाढ, फुले व शेंगा किंवा बोंडे लागण्याच्या काळात पावसाचा खंड अथवा पाऊस अनियमित पडत असल्याने उत्पादनात घट येत आहे .पावसाच्या लहरीपणाचा परिणाम कमी करण्यासाठी एक पीक पद्धतीपेक्षा आंतर पीक पद्धतीचा निश्चित फायदा होतो. यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. पीक नुकसानीची जोखीम कमी करता येते.आंतरपीक पद्धत - आंतरपीक पद्धत म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पिके एकाच जमिनीत एकाच वेळी योग्य अंतरावर पेरली अथवा लावली जातात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकाची आखणी व निवड तसेच उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.
मुख्य पिकासोबत आंतरपीक म्हणून इतर पिके घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच परंतु त्याच बरोबर एखादे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे गेल्यास आंतर पिकापासून उत्पादनाची हमी राहते. आंतरपीक पद्धतीचे फायदे - कोरडवाहू शेतीसाठी ही शाश्वत पीक पद्धती आहे.आंतर पिकामुळे मातीची धूप थांबते. पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरतेद्विदलवर्गीय आंतरपीक घेतल्यास नत्र स्थिरीकरण होतेजमिनीची सुपीकता वाढते. एक पीकाचे नुकसान झाले तरी आंतरपिकामळे उत्पन्न मिळतेकीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.- म्हणून उत्पादन वाढविण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.विविध आंतरपीक पद्धतीअ) मध्यम ते भारी जमिनीसाठी ज्वारी + तूर (3:3 किंवा 4:2) - यात ज्वारी पिकाच्या 3 किंवा 4 ओळीनंतर तूर पिकाच्या 3 किंवा 2 ओळीची पेरणी करावी.
कापूस + सोयाबीन (1:1) - यात कापूस पिकाच्या 1 ओळीनंतर सोयाबीन पिकाच्या 1 ओळीची पेरणी करावी यात सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जातीची (एमएयुएस 71) निवड करावी.कापूस + उडीद किंवा मूग (1:1) - यात कापूस पिकाच्या 1 ओळीनंतर उडीद किंवा मुग पिकाच्या ओळीची पेरणी करावी. सोयाबीन + तूर (3:1 किंवा 4:2) - यात सोयाबीन पिकाच्या 3 किंवा 4 ओळीनंतर तूर पिकाच्या 1 किंवा 2 ओळीची पेरणी करावी. मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्यवर्गीय असून, हमखास उत्पन्न देणारी आंतरपीक पद्धती आहेब) हलकी जमीन बाजरी + तूर (6:2) - यात बाजरी पिकाच्या 6 ओळीनंतर तूर पिकाच्या 2 ओळीची पेरणी करावी. आंतरपीक पद्धतीने पीक निवडताना घ्यावयाची काळजी.
- मुख्य पीक आणि आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणाऱ्या, पसरणाऱ्या असाव्यात. मुख्य पीक आणि आंतरपिक एकमेकांशी जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी व अन्नद्रव्य इत्यादी विविध नैसर्गिक घटकासाठी स्पर्धा करणारे नसावे.मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक निवडल्यास जास्त उत्पादन व नफा देणारे ठरतेआंतरपीक म्हणून शक्यतो सूर्यफूल व मका यांचा समावेश टाळावा, कारण ही पिके अन्नद्रव्यासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात.कोरडवाहू शेतीला चांगले दिवस येण्यासाठी सर्व शाश्वत आंतरपीक पद्धतीचा सामुहिकरित्या गाव पातळीवर अवलंब करून आर्थिक नफा मिळवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रेणापूरर हरिराम नागरगोजे यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी रेणापूर जिल्हा लातूर
Published on: 23 June 2022, 08:51 IST