Agripedia

आंतरमशागत म्हणजे पीक पेरणीपासून तर थेट पीक काढणीपर्यंत पिकांमध्ये जी मशागत केली जाते त्याच आंतरमशागत असे म्हणतात.आंतर मशागत केल्यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो,हवा खेळती राहते.दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे पीक जोमदार वाढ होऊन अधिक उत्पादन मिळते

Updated on 03 December, 2021 4:39 PM IST

आंतरमशागत म्हणजे पीक पेरणीपासून तर थेट पीक काढणीपर्यंत पिकांमध्ये जी मशागत केली जाते त्याच आंतरमशागत असे म्हणतात.आंतर मशागत केल्यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो,हवा खेळती राहते.दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे पीक जोमदार वाढ होऊन अधिक उत्पादन मिळते

म्हणून सर्व मशागती इतकेच किंबहुना त्याहून अधिक मशागतीसमहत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.म्हणून आंतर मशागत तिकडे दुर्लक्ष केल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन हेक्टरी उत्पादन घटते.रब्बी हंगामामध्ये उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी खाली दिलेल्या काही पिकांची आंतरमशागत कशी करावी याबद्दल माहिती घेऊ.

 रब्बी हंगामातील पिकांची आंतरमशागत

 रब्बी ज्वारी- पेरणीनंतर दहा दिवसांनी पहिली व 12 ते 15 दिवसांनी दुसरी विरळणी करावी. ज्वारी मध्ये पोंगे मर झालेली रोपे काढून टाकूनआवश्यक तेथे नांगे भरावेत. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ज्वारीच्या पिकाला तीन कोळपण्या द्याव्यात.यासाठी पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली, पाचव्या आठवड्यात दुसरी तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी.

  • त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे. दुसरी व तिसरी विशेषता शेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने केल्यास शेतात चांगले फुटून पडणाऱ्या भेगा बुजतात तसेच बाष्पीभवन थांबते.हीकोळपणी अत्यंत महत्त्वाचे आहे.तणांच्या उपद्रव नुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी.जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हेक्‍टरी पाच टन काडीकचरा,धसकटे,सरमाड पिकाच्या दोन ओळींत पसरावा.या आच्छादनामुळे जमिनीत ओल चांगले टिकून राहण्यास मदत होते.

 हरभरा- हरभरा पेरणीनंतर 15 दिवसांच्या आत आवश्यकते नांगे भरावे आणि विरळणी करून दोन रोपातील अंतर दहा सेंटिमीटर ठेवावे. पेरणीपासून चार आठवड्याच्या आत  एक खुरपणी आणि कोळपणीदेणे आवश्यक आहे.परिणामी तणांचा नायनाट होऊन उत्पादनात 25 टक्के वाढ होते.

  • तणनियंत्रणासाठी तननाशक वापरावयाचे असल्यास पेरणी करतांना वाप अशावरकर पेंडीमेथिलिन हे तणनाशक अडीच लिटर प्रति हेक्‍टर प्रमाणे 500 लिटर पाण्यातून फवारावे.फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.
  • करडई- या पिकाची विरळणी उगवणीनंतर दहा दिवसांनी किंवा पेरणीपासून 20 दिवसांनी करावी.मध्यम जमिनीत दोन रोपात साधारण दहा वीस सेंटीमीटर,भारी जमिनीत 30 सेंटिमीटर अंतर ठेवावे.गरजेप्रमाणे एखादी निंदणी करावी.दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. पहिली कोळपणी तिसऱ्या आठवड्यात फटीच्या अखंड पासच्या कोळप्याने व दुसरी कोळपणी आठवी आठवड्यात दातेरी कोळप्याने करावे.
  • सूर्यफूल- सूर्यफूल पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. आधी दोन व अखेरीस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. विरळणी करताना मध्यम जमिनीत 20 सेंटिमीटर तर भारी जमिनीत 30 सेंटिमीटर अंतर ठेवावे.पिकास 15 दिवसांच्या अंतराने एक दोन कोळपण्यातसेच एक खुरपणी देऊन शेत तणविरहित ठेवावे. दोन ओळींमध्ये गव्हाचे भुस्कट अथवा उसाच्या पाचटाचे तुकडे करून आच्छादन केल्यासहेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
English Summary: inter cultivate in rubby session crop like as jwaar,gram crop etc.
Published on: 03 December 2021, 04:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)