Agripedia

अनेक शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळत असून भाजीपाला शेती रोजच्या चलन देणारी शेती आहे. या भाजीपाल्यांमध्ये शेतकरी कोबीवर्गीय पिके घेत असतात; पण या कोबीवर्गीय पिकांमध्ये म्हणजे पत्ता कोबी, फुलकोबी, मोहरी मुळा यासारख्या पिकावर प्रामुख्याने चौकोनी ठिपक्याचा पतंग (Diamond Back Moth), कोबीवरील फुलपाखरू (Cabbage butterfly), मावा, मोहरीवरील काळी माशी (Mustard sawfly), कोबीवरील गड्डे पोखरणारी अळी यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो.

Updated on 12 April, 2021 2:02 PM IST

अनेक शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळत असून भाजीपाला शेती रोजच्या चलन देणारी शेती आहे. या भाजीपाल्यांमध्ये शेतकरी  कोबीवर्गीय पिके घेत असतात; पण या कोबीवर्गीय पिकांमध्ये म्हणजे पत्ता कोबी, फुलकोबी, मोहरी मुळा यासारख्या पिकावर प्रामुख्याने चौकोनी ठिपक्याचा पतंग (Diamond Back Moth), कोबीवरील फुलपाखरू (Cabbage butterfly), मावा, मोहरीवरील काळी माशी (Mustard sawfly), कोबीवरील गड्डे पोखरणारी अळी यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो.

त्यामुळे  शेतकरी बंधूंनी या किडी संदर्भात संबंधित पिकात वेळोवेळी निरीक्षणे घेऊन योग्य निदान करून प्रादुर्भावानुसार अथवा गरजेनुसार तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन  खालील एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेचा कोबीवर्गीय पिकात अंगीकार करावा.

कोबीवर्गीय पिकातील महत्वाच्या किडी करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाची प्रमुख सूत्रे.

  • कोबी किंवा फुल कोबीची लागवड करण्यापूर्वी मुख्य पिकाच्या 25 ओळींनंतर एक ओळ मोहरी पिकाची लावावी.

  • कोबीवर्गीय पिकात प्रती एकर 8 ते 10 काठीचे पक्षी थांबे किंवा काठीचे मचान लावावे.

  • कोबीवर्गीय पिकांत चौकोनी ठिपक्याचे पतंग (Diamond Back Moth) या किडीकरिता प्रती एकर चार कामगंध सापळे लावावेत.

  • कोबीचे गड्डे धरण्यापूर्वी कोबीवरील चौकोनी ठिपक्याचे पतंग या किडीकरिता Bacillus thuringiensis (BT)बॅसिलस थुरिंगेनेसिस  4 rustaki रुस्टकी 5 % WP 10 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार फवारणी करावी.

  • सुरुवातीच्या अवस्थेत साधारणपणे पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी कोबीवर्गीय पिकात 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

  • कोबीवर्गीय पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.

  • Diemethoate(डायमेथोएट) 30 % EC 13 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.किंवा Cyantraniliprole(सायंट्रानिलीप्रोल) 10.26 % O.D. 12 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची कोबीवर्गीय पिकावरील मावा किडी करता गरजेनुसार फवारणी करावी.

 

  • कोबीवर्गीय पिकावरील चौकोनी ठीपपक्याचे पतंग (Diamond Back Moth) या किडीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनाकरिता खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.   

  • Chlorpyrifos क्लोरपायरीफॉस 20 % EC 40 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Novaluron (नोव्हालुरोन)  10 % EC 15 मिली अधिक दहा लिटर पाणी  किंवा Spinosad (स्पिनोसाड) 2.50 SC 12 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार निर्देशीत प्रमाणात घेऊन कोबीवर्गीय पिकातील चौकोनी ठिपक्याची पतंग (D B.M.) करिता  गरजेनुसार फवारणी करावी. 

  • कोबी पिकावरील गड्डे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर आढळून आल्यास गरजेनुसार योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली Ouinalphos ऑइनिलफॉस 25 % EC 40 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

 

तसेच मोहरी पिकावर काळ्या माशीचा  (Mustard sawfly ) चा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन Quinalphos (क्विनॉलफॉस)25 % EC 24 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.

कोबीवर्गीय पिकात चौकोनी ठिपक्याची पतंग (D.B.M.) व फळ पोखरणाऱ्या अळी   करिता योग्य निदान करून आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार Emamectin Benzoate (इमामेक्टिन बेंझोएट) 5 %  + Lufenuron लुफेन्यूरॉन 40 % WG या संयुक्त कीटकनाशकाची 1.2 ग्रॅम अधिकl दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

शेतकरी बंधूंनो निर्देशीत रसायने वापरण्यापूर्वी इतर एकात्मिक कीड व्यवस्थापन घटकाचा कोबीवर्गीय पिकातील कीड व्यवस्थापनासाठी सुसंगत वापर करावा तसेच रासायनिक कीडनाशके फवारणी पूर्वी लेबल क्‍लेम शिफारशीची शहानिशा करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार रसायने वापरावी.

English Summary: Integrated pest management on cabbage crop
Published on: 20 March 2021, 05:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)