Agripedia

एकात्मिक कीड व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. पण या प्रश्नाचे उत्तर देनाऱ्यांची संख्या पाहता,या संकल्पनेचे महत्व तर दूरच नेमकं एकात्मिक कीड व्यवस्थापन काय आहे हेच अनेकांना ठाऊक नाही असं दिसतंय.

Updated on 30 December, 2021 12:40 PM IST

काही हरकत नाही. या महत्त्वाच्या संकल्पनेचा शेतकरी बंधूंना भरपूर फायदा व्हावा यासाठीच आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यशाळा(IPM SCHOOL) चालू केलेली आहे.

      एकात्मिक कीड व्यवस्थापन ही संकल्पना 80-90 दशकांच्या दरम्यान उदयास आली. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीमध्ये चालू झालेला रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आपले रंग दाखवत होता. परिणामस्वरूप कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ,हाताळणी दरम्यान शेतकऱ्यांचे होणारे मृत्यु,पाण्यामध्ये तसेचअन्नामध्ये आढळणारे किटनाशकांचा अवशेष,त्यामुळे जन्मजात अपंगत्व, जन्मताच बालकांमध्ये कॅन्सरचे निदान,किडीमध्ये तयार होणारा प्रतिरोध व अवघड झालेला त्यांच्या बंदोबस्ताचा प्रश्न हे भयाण वास्तव दार ठोठवत होते आणि आहे. आणि म्हणूनच पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन,रसायनांचा समंजस वापर, 

 अवशेष रहित विषमुक्त शेती यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापण अत्यंत महत्वाचे आहे.

        एकात्मिक कीड व्यवस्थापण ही काही डोईजड न समजन्यासारखी किचकट पद्धत मुळीच नाही. तर आपला वेळ,पैसा व श्रम वाचवणाऱ्या प्रभावी कीड व्यवस्थापन पद्धतीचे मिश्रण आहे. किडींचे पिक लागवडीपासून पीक कापणी पर्यंत एकात्मिक पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच पर्यावरणपूरक,कमीतकमी खर्चात,श्रमाची बचत करत कीड व्यवस्थापन होते. 

        एकात्मिक कीड व्यवस्थापणाची सुरवात होते पारंपरिक कीड व्यवस्थापनापासून ज्यामध्ये नांगरणी,पीक फेरपालटणी, शेताची स्वच्छता,बीजप्रक्रिया, तण नियंत्रण, किडीचा उद्रेक टाळण्यासाठी मिश्र पीक घेणे. यानंतर किडींची ओळख,मित्रकीटक कोणते-शत्रु कीटक कोणते? त्यांचे संवर्धन त्यासोबत यांत्रिक पध्दतीची अंमलबजावणी म्हणजेच पक्षिथांबे उभे करणे, 

योग्य सापळा पीक घेणे, पिकातील मुख्य कीड ओळखून योग्य कामगंध सापळे लावून किडीचे सर्वेक्षण व नियंत्रन करणे. यापुढे सापळ्यामध्ये सापडणाऱ्या पतंगाच्या संख्येवरून योग्यवेळी जैविक कीटकनाशक फवारणी नियोजन जसे निम तेल निंबोळी अर्क,दशपर्णी अर्क,जिवाणू,विषानूजनीत किटनाशके, मित्रकीटक पिकामध्ये वावर वाढवणे. या पारंपरिक-यांत्रिक-जैविक पद्धती वापरल्यानंतर सुद्धा एखाद्या वेळी वातावरणातील बदलामुळे किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्यावर जातेय असं जानवल्यासच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. हे आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन सांगते. सुरवातीपासून टप्प्याटप्प्याने पारंपरिक-यांत्रिक-जैविक पद्धती वापरल्यास क्वचितच किंवा खुप कमी प्रमाणात रसायनाचा वापर होतो. 

त्यामुळे खर्चात बचत,वेळेमध्ये बचत होते, अवशेष रहित शेतीमाल उत्पादन झाल्यामुळे मालाचा दर्जा उंचावतो. परिणामी बाजारभाव चांगला मिळतो. म्हणूनच एकात्मिक कीड व्यवस्थापण महत्वाचे आहे.

 

- टीम IPM

English Summary: Integrated pest management important subject
Published on: 30 December 2021, 12:40 IST