अवर्षण परिस्थिती,पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये मागील दहा ते बारा वर्षात ऊस पिकामध्ये हुमनी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.भारतात हुमणीच्या साधारणपणे तीनशे प्रजातींची नोंद आहे.
महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रकारचे हुमणी आढळतात.त्यामध्ये एकनदीकाठावरील आणि एक माळावरील असे संबोधले जाते.यामध्ये माळावरील या प्रजाती पासून फार मोठे नुकसान होत आहे.कारण ही जात कमी पाण्याच्या प्रदेशात आणि हलक्या जमिनीत जास्त आढळते. या आळ्या उसाच्या मुळ्या कुरतडतात त्यामुळे ऊस सुकतो. प्रचंड प्रमाणात उसाचे नुकसान करते. या लेखात आपण उसावरील हुमणी किडे एकात्मिक नियंत्रण कसे करावे याची माहिती घेऊ.
उसावरील हुमणी किडे एकात्मिक नियंत्रण..
हुमणीच्या नियंत्रणासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक असते.हुमनी नियंत्रणाचे उपाय योग्य वेळी योजनेअत्यंत महत्त्वाचे आहे.
मशागत
- नांगरणी- ऊस लागवडीअगोदर एप्रिल- मी किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेत दोन ते तीन वेळा उभी-आडवी खोलवर नांगरटकरावी. त्यामुळे पक्षी व प्राणी मातीच्या वर आलेल्या अळ्याव अंडी खातात.
- ढेकळे फोडणे-शेतातील ढेकळे फोडावीत.मातीचे ढेकुळ मोठे राहिल्यास त्यात हुमणीच्या निरनिराळ्या अवस्थाजसे की अंडी, कोश राहण्याची शक्यता असते त्यासाठी तव्याचा कुळव किंवा रोटावेटर वापरून ढेकळे फोडावीत.
- पीक फेरपालट- उसाच्या तोडणीनंतर आधी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात उसाचा खोडवा न घेतासूर्यफुलाचे पीक घ्यावे व सूर्यफूल काढणीनंतर शेताचे तीन-चार वेळा नांगरट करावी.
- सापळा पीक-भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणी ग्रस्त शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकाणी भुईमुग किंवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमुग अथवा तागा खालील आळ्या माराव्या.
- अळ्या मारणे- शेतात कुठेही मशागतीचे काम करताना बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात.
- प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे-वळवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतातआणि बाभूळ व कडू लिंबाच्या झाडावर जमा होतात.फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात.प्रकाश सापळ्यांचा वापर करून भुंगेरे गोळा करून मारावेत. भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाची आहे. सतत तीन वर्षे चार वर्ष भुंगेरे गोळा करून मारावेत.सामुदायिक रीत्या भुंगेरे गोळा केल्यासहूमनी किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास चांगली मदत होते.
- अती प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये.
- पीक निघाल्यानंतर हूमनी ग्रस्त शेताची मशागत रोटावेटर ने करावी.
Published on: 17 December 2021, 04:57 IST