Agripedia

मक्याची लागवड महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. जर आपण मका पिकाचा विचार केला तर कुक्कुटपालन तसेच बऱ्याच औद्योगिक उत्पादनांमध्ये मक्याचा वापर होत असल्याकारणाने शेतकऱ्यांना देखील चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न मका पिकाच्या माध्यमातून येऊ शकते. परंतु आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहोत की,मका या पिकावर सातत्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे.

Updated on 20 August, 2022 1:03 PM IST

मक्याची लागवड महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. जर आपण मका पिकाचा विचार केला तर कुक्कुटपालन तसेच बऱ्याच औद्योगिक उत्पादनांमध्ये मक्याचा वापर होत असल्याकारणाने शेतकऱ्यांना देखील चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न मका पिकाच्या माध्यमातून येऊ शकते. परंतु आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहोत की,मका या पिकावर सातत्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे.

याचाच परिणाम की काय, एक ते दीड वर्षापासून मक्याच्या लागवड क्षेत्रात घट झालेली पाहायला मिळत आहे. या लेखात आपण मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रण कोणत्या पद्धतीने करावे? बद्दल थोडक्यात माहिती घेऊ.

नक्की वाचा:खर्च एकदाच आणि आठमाही पैसाच पैसा! एकदा लागवड करा आणि 8 महिने वांग्याच्या शेतीतून मिळवा नफा

 मका पिकावरील लष्करी अळीची ओळख

 शेतकरी बंधूंना माहिती आहे की, लष्करी अळी ही उपजीविका मकाच्या पानांवर करते. अगदी आपण सुरुवातीच्या अवस्थेचा विचार केला तर मका पिकाच्या कोवळ्या पानांवर या अळीचा प्रादुर्भाव जाणवतो नंतर ती पिकाच्या पोंग्यात प्रवेश करून त्याला छिद्र पाडते, ही झाली पहिली अवस्थेची नुकसानीची पातळी.

परंतु दुसऱ्या व दुसऱ्या अवस्थेमध्ये असलेली लष्करी आळी मका पिकाची पाने त्यांच्या कडेपासून तर आतल्या भागापर्यंत खाऊन टाकते. पुढे काही दिवसांनी पिकाचा शेंडा वगैरे खाल्ल्याने पीक वाढीचा जो काही भाग असतो तोच खाऊन टाकल्यामुळे पिकाची वाढ प्रभावित होते व झाडाची वाढ खुंटते. पिकाला लागणारे मक्याची कोवळी कणसे देखील ही अळी खाऊन टाकते.

नक्की वाचा:Flower Cultivation: पॉलीहाउसमधील 'या' फुलाची लागवड शेतकऱ्यांना देईल लाखात नफा होईल आर्थिक प्रगती

 लष्करीअळीचे एकात्मिक नियंत्रण

1- जर आपण प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला तर काही पिके किंवा इतर बांधाला या किडीला पोषक असणारे झाडे असतील तर ते नष्ट करून टाकावेत.तसेच सुप्तावस्थेत अळी असलेल्या झाडाचे खोड देखील छाटून टाकावे.

2- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मका पिकाच्या पोंगामध्ये जर या अळीचा प्रादुर्भाव दिसला तर वेळ न घालवता पटकन पोंग्यामध्ये वाळू टाकावी, असे केल्याने मका पिकाच्या वाढीच्या अवस्थेतील जो काही भाग असतो तो अळीला खाता येत नाही. जर सुरुवातीच्या 30-35 दिवसांपर्यंत पोंग्यात वाळू आणि चुना 9:1 त्या प्रमाणात टाकला जर खूप मोठा फायदा होऊ शकतो.

3- जर एक एकर मका असेल तर आठ किंवा दहा पक्षी थांबे तयार करावेत, याचा देखील चांगला फायदा होतो.

4- जर एकरी दहा ते पंधरा कामगंध सापळा वापरले तर निश्चित फायदा होतो.

जैविक नियंत्रण

1- या अळीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी पन्नास हजार अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडावेत. कारण हे अंडयावर उपजीविका करणारे असल्यामुळे फायदा होतो. किंवा नोमुरिया रायली तीन ग्रॅम या बुरशीजन्य कीटकनाशकाचा ची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नक्की वाचा:Crop Management: कापूस आणि सोयाबीन पिकांतील तणनियंत्रण वेळीच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: integrated management of fall army worm in maize crop
Published on: 20 August 2022, 01:02 IST