कोरडवाहू क्षेत्रांमध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्र मध्ये हरभरा या पिकाखाली तीन लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन अडीच लाख टन होते.हे राज्याच्या एकूण हरभरा पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे 27 टक्के इतकी आहे.
हरभरा पिकातील प्रमुख कीड म्हणजे घाटेअळी. या अळीमुळे हरभरा पिकाचे 30 ते 40 टक्के नुकसान होते.या लेखात आपण हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन विषयी माहिती घेऊ.
घाटे अळीचे नुकसान करण्याची पद्धत
- पीक तीन आठवड्यांचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात.
- पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात.
- पूर्ण विकसित घाटेअळी पोपटी रंगाची व शरीराच्या बाजुवर तुटक करड्या रेषा आढळतात.
- लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खरडून खातात.
पुर्ण वाढ झालेली अळी तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते.एकअळी साधारण दहा तीस चाळीस घाट्यांचे नुकसान करते. विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यापासून या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
घाटी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
सुरुवातीच्या काळात निंबोळी अर्क पाच टक्के द्रावणाची फवारणी घ्यावी. त्यामुळे अळीची भूक मंदावते आणि त्या मरतात.याकिडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी तुमच्या ग्राम ज्वारी किंवा सरी वर मका टोपावी. या पिकांच्या मित्र किडीच्या आकर्षण यासाठी उपयोग होतो त्यामुळे घाटे आळी चे नियंत्रण होते. पक्ष्यांना बसायला जागोजागी पक्षी थांबे लावावेत. त्यावर कोळसा, चिमण्या आणि साळुंक्याअसे पक्षी येतात आणिअळ्या वेचतात. तसेच हेक्टरी पाच फेरोमेन सापळे लावावेत.
घाटी अळीचे जैविक नियंत्रण
घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता प्रतिहेक्टर एचएनपीव्ही 250 रोगग्रस्त अळ्यांचाअर्क (2:10:9 तीव्रता) किंवा पाचशे रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (1:10:9 तीव्रता) फवारा वा. विषाणूच्या फवारा याची कार्यक्षमता अतिनील किरणात टिकवण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणीपॉलटाकून हे द्रावण एक मिली प्रति लिटर याप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम व व्दितीय व्यवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
रासायनिक कीटकनाशके
- घाटे अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्यास अळीचे व्यवस्थापन करता येईल.
- पहिली फवारणी 40 ते 50 टक्के फुले धरल्यावर व दुसरी फवारणी 15 दिवसांनी करावी.
- हरभऱ्यावरील घाटे अळीचा व्यवस्थापनासाठी व आर्थिक मिळकती साठी पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना डेल्टामेथ्रीनएक टक्का प्रवाही- ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही या मिश्र कीटकनाशकाची 25 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- त्यानंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेंजोएट पाचटक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार तीन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी.
Published on: 28 January 2022, 05:55 IST