रब्बी हंगामामध्ये ज्वारीची पेरणी ही भरपूर प्रमाणात करण्यात येते.जर आपण ज्वारी पिकाचा विचार केला तर ज्वारी पिकावर पोंग्यातील ढेकूण, मावा, खोडकिडा आणि खोडमाशी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.या किडींच्या प्रादुर्भावामुळे 25 ते 30 टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
साठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे खूप महत्वाचे आहे. या लेखात आपण ज्वारी पिकाचे एकात्मिक कीड नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.
ज्वारी पिकाचे एकात्मिक कीड नियंत्रण
या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पिकाची काढणी झाल्यावर लगेच पालापाचोळा, ज्वारीचे राहिलेले अवशेष व बांधावरील इतर झाडे ज्यावर कीटक ज्वारी नसताना उपजीविका करतात ती उपटून जाळून नष्ट करावीत. तसेच ज्वारी या पिकाबरोबर मुग, उडीद, सोयाबीन आणि कापूस सारख्या पिकांची फेरपालट केली तर या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते. वाण निवडताना नेट कमीतकमी कालावधीत देणारे व 80 टक्क्यांपेक्षा जास्त उगवण शक्ती असणारे निवडावेत.
मित्र किडींचे जतन करणे
ज्वारी पिकावर प्रामुख्याने ढालकिडा व क्रायसोपा हे परभक्षी कीटक आढळून येतात. या कीटकांच्या प्रौढ व अळ्या मावा व पुण्यातील ढेकुन यांच्यावर उपजीविका करतात. ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक पतंग वर्ग किडींच्या अंड्यात स्वतःच्या अंडे घालून एचडी यांच्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिका निभावतात. अशा कीटकांची जतन करून त्यांची संख्या वाढविल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्वारी पिकाच्या प्रत्येक दहा ओळींनंतर किंवा ज्वारी लागवड क्षेत्राच्या सभोवताली मका व चवळी च्या काही ओळी पेराव्यात.
कीटकनाशकांचा वापर
कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे माती व वातावरण प्रदूषित होते तसेच कीटकनाशकांच्या अतिवापराने अपाय मनुष्याला सुद्धा होऊ शकतो त्यामुळे कीटक नाशकांचा वापर अत्यंत आवश्यक असेल तरच करावा व कमीत कमी तीव्रतेचे द्रावण वापरून करावा.
शिफारशीत कीटकनाशके
- खोडमाशी- पाच टक्के निंबोळी अर्क त्व 25 टक्के प्रवाही क्विनॉलफॉस 300 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- खोडकिडा- पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ट्रायअझोफॉस 100 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- कणसातील आळ्या- कार्बरील 50% भुकटी, 40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात किंवा किंवा क्विनालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
Published on: 28 December 2021, 05:31 IST