कोरडवाहू ही शेती पद्धती पारंपरिक असून त्यात मुख्यतः खरीप व रब्बी पिके घेतली जातात हे पावसाच्या पाण्यावरची असल्यामुळे ती शाश्वत नसून शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात येतात. कारण कोरडवाहू पिकाचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात मिळते.
वाढत्या लोकसंख्यामुळे लागवडी खालील क्षेत्र घटत चालले आहे दरडोई जमीन धारणा ही कमी होत चालली आहे. बदलत्या वविसंगत हवामानामुळे शेती उत्पादन कमी होत चालले आहे. व त्याची अनेक कारणे खालील प्रमाणे आहेत.
– कोरडवाहू शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान जास्त काळ न टिकणे.
– पाऊस कमी झाल्यास शिफारस केलेल्या खताच्या मात्रा सुद्धा अंमलात येत नाहीत.
– कृषी पूरक व्यवसायाचे अपुरे ज्ञान.
– अपूर्ण शिक्षण झालेले तरुण व ज्यांनी शिक्षण घेतलेले आहे. स्वतःच्या जवळच्या उपलब्ध साधन सामग्री विकसित करून उत्पादित करण्याच्या दृष्टीने सयुंक्तिक शिक्षण घेतलेल्या तरुणाच्या समस्या या कारणामुळे मर्यादित जमिनीवर भर वादात असल्याने, अशा परिस्थितीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब या व्ययसायाला पुनर्जीवन व संजीवनी देणारा ठरू शकतो.
काय असते एकात्मिक शेती पद्धती?
या शेती पद्धतीमध्ये शेतीशी निगडित विविध व्यवसाय व पिक पद्धती यांची योग्य सांगड घालून उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा पुनर्वापर दुसऱ्या व्यवसायासाठी करून खर्चात कपात करणे आणि अधिक उतपादन वाढविणे याला एकात्मिक शेती पद्धती म्हणतात.
एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पिक पद्धती बरोबर फळे, भाजीपाला, फुले, गाई, म्हशी, शेळी पालन, कुक्कुटपालन, वनशेती, मत्स्य व्यवसाय मधमाशी पालन, धिंगरी उत्पादन आणि शेतकऱ्याजवळ उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा योग्य वापर करून अधिक उत्पादन व नफा मिळवणे होय. या पद्धतीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाची कोणतीही हानी न होता संताळून साधने आणि देशाचे उत्पादन वाढविणे होय.
एकात्मिक शेती पद्धती चे फायदे:-
उत्पादकता वाढते, उत्पन्न फायदेशीर होते, शाश्वत व आर्थिक उत्पादकता, संतुलित अन्न, प्रदूषण विरहित वातावरण, वर्षभरात सतत मिळणार पैसा नवीन तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जेच्या समस्या निवारण, चार प्रश्न निवारण, वनाचे स्वरंक्षण करणे व व्यवसाय मिळणे.
एकात्मिक शेती पद्धतीद्वारे पिकपद्धती व विविध शेतीशी निगडित उद्योग यांची खालीलप्रमाणे सांगड घालावी.
१) पिक पद्धती + गाई / म्हशी + गांडूळखत उत्पादन + बांधावरील फळझाडे + भाजीपाला.
२) पिक पद्धती + रेशीम शेती + शेत तळ्यातील मत्स्यपालन.
३) पिक पद्धती + गाई / म्हशी किंवा कुक्कुटपालन + फळझाडे
४) पिक पद्धती + शेळी / मेंढी / वराह पालन + भाजीपाला अशाप्रकारे शेतीला पूरक असलेल्या पिकपद्धती आणि जोडधंदा निवडला पाहिजे.
सौजन्य:- कृषि सम्राट
Published on: 13 February 2022, 01:37 IST