Agripedia

शेती क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग सुरु असतात. विशेषत: इस्राईलसारख्या देशात जिथे शेतजमिनीची कमतरता असते,

Updated on 04 February, 2022 7:51 PM IST

शेती क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग सुरु असतात. विशेषत: इस्राईलसारख्या देशात जिथे शेतजमिनीची कमतरता असते, तिथे शेतीसाठी विविध पर्याय अवलंबले जातात. आजच्या काळात संपूर्ण लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य पुरवठा करणे ही नेहमीच एक आव्हानात्मक समस्या राहिली आहे.

शेतीसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा काळात या नव्या तंत्रज्ञानाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या शेतीसाठी तुमच्याकडे जमीन असलीच पाहिजे अशी अट नाही. सध्या सगळीकडेच शेतजमिनींची कमतरता जाणवत आहे.

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घराच्या भिंतीवरही शेती केली जाऊ शकते. इस्राईलमध्ये हे तंत्रज्ञान सध्या जास्त लोकप्रिय झालेले आढळते. इस्राइलमधील अधिकाधिक लोक याप्रकारच्या शेतीचा अवलंब करत आहेत.

इस्राईलमध्ये शेती योग्य जमिनीची कमतरता असल्याने तिथे व्हर्टीकल फार्मिंगची पद्धती मोठ्या प्रमाणात अवलंबली जात आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि शेतजमिनीची कमतरता, यावर ही शेती पद्धती जास्त प्रभावकारी ठरू शकते. दाट लोकसंख्येच्या शहरात जिथे शेत जमीन खूप दूर असते किंवा कमी असते अशा ठिकाणी या पद्धतीने शेती केल्यास फायदा होऊ शकतो.

या पद्धतीच्या शेतीतून होणारे इतरही अनेक फायदे आहेत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही घराच्या भिंतीवरच छोटीशी शेती करू शकता. या पद्धतीतून तुम्ही तुमच्या कुटुंबापुरते तरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, गहू, तांदूळ अशा पिकांचे उत्पादन घेऊ शकता.

काही लोकांना या व्हर्टिकल फार्मिंगमधून घराच्या भिंतीची सजावट करण्याची हौस भागवता येते. शिवाय, भिंतीवर केल्या जाणाऱ्या या शेतीमुळे घरातील तापमानही मेंटेन राहते. हानिकारक केमिकल फवारून घेतलेली पिके आरोग्यासाठी किती हानिकारक ठरत आहेत हे तर आजच्या काळात आपण सर्वच जण अनुभवत आहोत. अशावेळी खतांचा अधिक वापर न करता घेतलेल्या या पिकांमुळे रासायनिक द्रव्यांच्या घातक परिणामांपासूनही मुक्ती मिळते.या तंत्रज्ञानात छोट्या छोट्या कुंड्यात आधी रोपे लावली जातात. नंतर या कुंड्या भिंतीवर अशा प्रकारे चिकटवल्या जातात जेणेकरून त्या खाली पडणार नाहीत. या कुंड्यांना वेळोवेळी पाणी घालण्यासाठी विशिष्ट पद्धतीची ड्रॉप इरिगेशन सिस्टीम लावली जाते.जी रोपांना विशिष्ट अंतराने पाणी देते. यामुळे पाण्याचीही भरपूर बचत होते. ही सिंचन व्यवस्था आपण आपल्या कंप्युटरवरूनही नियंत्रित करू शकतो. कुंड्यांमध्ये रोपांची पेरणी केल्यानंतर, रोपांची थोडी वाढ झाल्यानंतरच या कुंड्या भिंतीवर चिकटवल्या जातात.

ग्रामीण भागात शेती योग्य जमीन भरपूर असते. पण, शहरात शेतीची कमतरता असल्याने अशा पद्धतीची शेती शहरी लोकांसाठी फायद्याची ठरू शकते. ज्या लोकांना कमी जागेमुळे गार्डनिंगची हौस भागवता येत नाही ते, अशा प्रकारे आपली हौस पूर्ण करू शकतात. यामुळे शहरातील हरवत चाललेली हिरवळ परत येऊ शकते.

घराचे तापमान नियंत्रित राहिल्याने एसी, कुलर यासारख्या यंत्रांचा वापरही कमी होईल. त्यामुळे वीज बचतही होऊ शकते. घराच्या आजूबाजूच्या वातावरणातील आर्द्रता टिकून राहते. ध्वनीप्रदूषणाची तीव्रता थोडी कमी होऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या शेतीमुळे पर्यावरणाच्या समस्यांचे प्रमाणही कमी होईल. या तंत्रज्ञानात पाण्याचा वापर, उर्जा बचत, जमिनीची रसायनीकरण अशा कितीतरी समस्यांपासून सुटका होऊ शकते.रासायनिक खतांचा मारा कमी झाल्यामुळे त्याचे दुष्परिणामही आटोक्यात येतील. जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास अन्नधान्याचे मुबलक उत्पादन मिळू शकते.आज उपलब्ध शेतीतून संपूर्ण लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवणे शक्य नाही. त्यामुळे असे जमिनीशिवाय शेती करण्याचे तंत्र फायद्याचे ठरू शकते.अन्नाची गरज भागवली जाऊन, भूकबळी, कुपोषण यासारख्या समस्यांवरही आपण निश्चितच मात करू शकू. जगातील मोठमोठ्या शहरात जिथे लोकसंख्या अधिक आहे, तिथे या तंत्राने केल्या जाणाऱ्या शेतीतून शहरवासियांना मुबलक प्रमाणात भाजीपाला मिळू शकेल.आपल्या देशातही काही मेट्रो सिटीज आहेत. जिथे शेतीची समस्या गंभीर आहे. अशा शहराच्या मोठमोठ्या इमारतींच्या भिंतीवर या तंत्राचा वापर करून केली गेलेली शेती निश्चितच उपयोगी ठरेल.

व्हर्टिकल फार्मिंगच्या तीन आधुनिक पद्धती आहेत. हायड्रोपोनिक्स, ऍक्वापोनिक्स, आणि एअरोपोनिक्स. आपल्या सोयीनुसार यातील एका पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये मातीचा वापर केला जात नाही. या तंत्रात मातीशिवायच रोपांची लागवड केली जाते. एका रासायनिक द्रावणात रोपांची उगवण केली जाते.

एअरोपोनिक्स तंत्रात तर हवेतच रोपांची लागवड करून पिक घेतले जाते. इस्राइलमध्ये मात्र, हायड्रोपोनिक्स किंवा ऍकक्वापोनिक्स याच तंत्राचा जास्त वापर होताना दिसत आहे. एअरोपोनिक्सबाबत अजूनही लोकांमध्ये बरीच संदिग्धता आहे.

भारतातील मोठमोठ्या शहरात या प्रकारच्या शेतीचा विचार केला जात आहे. इस्राइलसारख्या देशात तर या तंत्रज्ञानाचा भरपूर फायदा दिसून येत आहे. इस्राइल व्यतिरिक्त सध्या, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, कोरिया, जपानमध्येही या तंत्राचा वापर करून शेती केली जात आहे.

या तंत्राची एकमेव नकारात्मक बाजू म्हणजे सुरुवातीला या तंत्रात वापरली जाणारी ड्रॉप ईरीगेशन सिस्टम बसवण्यासाठी येणारा खर्च थोडा जास्त आहे. परंतु, तरीही या तंत्राचा वापर करून शेती करण्याची पद्धत अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

इस्राईल इस्राईल टेक्नोलॉजी इस्राईल तंत्रज्ञान उभी शेती भींती वरची शेती वॉल फार्मिंग vertical farming

English Summary: Insrile technology in minimum land production see this idea
Published on: 04 February 2022, 07:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)