Agripedia

ही कीड सोयाबीन पिकात खोड पोखरून पिकांना नुकसान करणारी कीड आहे. साधारणता ही कीड पिकावर लागवडीपासून कायिक वाढीत दिसून येते.

Updated on 04 July, 2022 4:49 PM IST

ही कीड सोयाबीन पिकात खोड पोखरून पिकांना नुकसान करणारी कीड आहे. साधारणता ही कीड पिकावर लागवडीपासून कायिक वाढीत दिसून येते. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या प्राथमिक अवस्थेत झाल्यास सोयाबीन पिकाचे नुकसान 40 टक्के पर्यंत होऊ शकते. ही कीड जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आढळून येते.केवळ किटकनाशकाचा वापर कीड नियंत्रणात करता येतो असे नसून याशिवाय अनेक दुसऱ्या पद्धती देखील अवलंबता येतात. यासाठी या किडीचा जीवनक्रम,नुकसानीचा प्रकार, खाद्य पिके व या कीडीचे व्यवस्थापन याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे आणि सोयाबीन उगवल्या नंतर 15दिवसा पासून त्यांचे नियोजन करणे महत्त्वाचे असते नाहीतर चक्र भुंगा चे प्रमाण वाढते त्यासाठी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे जीवनक्रम - या किडीची जीवनसाखळी अंडी, अळी, कोष व प्रौढ (भुंगा) या चार अवस्थामधून पूर्ण होते.

अंडी अवस्था - पिकाच्या सुरुवातीच्या काळात मादी भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतात. अंडी लांबट तांदळाच्या आकाराचे व फिक्कट पिवळसर रंगाची असतात. एक मादी सरासरी 8 ते 72 अंडी घालते. अंड्यातून 3 ते 4 दिवसात अळी बाहेर पडते.अळी अवस्था - अळ्या पिवळ्या रंगाच्या असून त्याच्या खालील भागावर उभारट ग्रंथी असतात. शरीर गुळगुळीत असून मोत्याच्या माळेसारखे दिसते. अळीची लांबी 19 ते 22 मि.मी. असते. ही अवस्था 34 ते 38 दिवसात पुर्ण होते.कोष अवस्था - पूर्ण वाढ झालेली अळी झाडाच्या खोडाजवळ जाऊन खोडाचा दोन्ही बाजूने काप घेऊन कोषावस्थेत जाते. कोष साधारणपणे लालसर तांबूस रंगाचा असून, आकार लांबट असतो. ही अवस्था हवामानानुसार 8 ते 9 दिवस असते. तसेच सुप्तावस्था 233 ते 268 दिवस असते. म्हणजेच ऑक्टोबर पासून ते जून - जुलै पर्यंत कोषावस्था ही सुप्तावस्थेत राहते. ती झाडाच्या खोडामध्ये आढळते.प्रौढ भुंगा- प्रौढ भुंग्याचे पंख कळ्या भुरकट रंगाचे असतात. त्यामुळे ते सहज ओळखू येतात.

भुंग्याची स्पर्शिका (मिशा) ही शरीरापेक्षा मोठी असते. भुंग्याची लांबी 7 ते 10 मि.मी. असते.नुकसानीचा प्रकार - चक्री भुंगा व अळी या दोन अवस्था पिकास नुकसानकारक आहेत. सुरुवातीस मादी भुंगे खोड, देट किंवा फांदी यावर अंडी घालण्यासाठी समांतर दोन खापा घेऊन त्यामध्ये तीन छिद्र करून एका छिद्रात अंडी घालतात.अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या देठ, फांदी व खोड यातील गर खाऊन त्या पोकळ करतात. त्यामुळे चक्रावरचा वरील भाग पिवळा पडतो. तसेच वरील भागाचा अन्नपुरवठा बंद होऊन भाग वाळून जातो.आळ्या देट, फांदी व खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचतात, यामुळे शेंगा कमी लागतात व शेंगा पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.तर खाद्य पिके - सोयाबीन, तुर, मुग, उडीद, चवळी, भुईमूग, तीळ, अंबाडी व मिरची या पिकावर चक्री भुंगा उपजीविका करतो. प्रादुर्भावास कारणीभूत घटकएकच एक पीक पद्धती व दाठ पेरणीमुळे ही कीड आपला जीवनक्रम पूर्ण करू शकते

सलग रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ वातावरण या किडीस पोषक असते सतत अधिक आर्द्रता असलेल्या वातावरणात या किडीची वाढ झपाट्याने होते नत्रयुक्त खतांचा असमतोल व अतिवापरामुळे किडींची वाढ झपाट्याने होते एकात्मिक किड व्यवस्थापन - अळी व भुंग्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी खाली एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावामशागतीची पद्धत - वेळेवर पेरणी करावी ज्या भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो तेथे पेरणी जूनअखेरपर्यंत पूर्ण करावी दोन ओळीतील आणि झाडातील अंतर योग्य ठेवावे जेणेकरून पीक दाटणार नाहीमाती परीक्षणानुसार खताच्या मात्रा द्याव्यात व जास्त नत्राचा वापर टाळावा वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविहिरीत ठेवावे यांत्रिक पद्धत भुंग्याना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा (लाईट ट्रॅप) 1 प्रति हेक्‍टरी लावावा जैविक पद्धत - विविध मित्र कीटकांचे संवर्धन करावे निमार्क किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी

English Summary: Insects on Soybean Crops - Girl Beetle Chakri Bhunga
Published on: 04 July 2022, 04:49 IST