पीक लागवडीनंतर पिकांच्या योग्य व्यवस्थापनावर येणारे उत्पादन अवलंबून असते. तुम्ही कुठल्याही पिकाचे उत्पादन घ्याल तर त्यासाठी कीड व्यवस्थापन आणि खत आणि पाणी व्यवस्थापनावर जवळजवळ 70 ते 80 टक्के उत्पादनाची स्थिती अवलंबून असते. जर आपण पिकांवरील कीड व्यवस्थापनाचा विचार केला तर हा भाग खूप महत्वपूर्ण असून किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्या अनुषंगाने येणारे विविध रोग आणि पिकांवर होणारा विपरीत परिणाम यामुळे उत्पादनात घट येते.
नक्की वाचा:शेतकरी बांधवांना कमी खर्चात जास्त उत्पादन, शेतकऱ्यांना "मल्टिप्लायर तंत्रज्ञान वरदान"
त्यामुळे कीड व्यवस्थापनावर व्यवस्थित लक्ष देणे खूप गरजेचे आहे. यासंदर्भात जर आपण मिरची पिकाचा विचार केला तर हे पीक कीड आणि रोगांना खूप संवेदनशील असून या पिकांवरील किडींचे व्यवस्थापन म्हणजेच बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.
त्यामुळे मिरची पिकावर येणारी किडीमध्ये फुलकिडे हे खूप धोकादायक असून यामुळे उत्पादनात फार मोठी घट येते.जर आपण मिरची पिकाचा विचार केला तर मिरची पिकावरील जो काही चुरडा मुरडा हा गंभीर रोग आहे तो जास्त करून फुलकिडीचा प्रादुर्भाव मुळेच येतो. त्यामुळे फुल किडींचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
मिरची पिकावरील फुल किड्यांची ओळख
फुलकिडे रसशोषक कीटक असून मिरची पिकांच्या पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पिकाची खूप मोठी हानी होते. या किडीचा जास्त प्रादुर्भावामुळे मिरचीच्या पानाच्या कडा वरील बाजूस वळतात.
या किडीचा प्रादुर्भाव झाडाच्या शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे संपुर्ण मिरचीचे झाड चूरडल्यासारखे दिसते व त्यालाच आपण चुरडा मुरडा किंवा बोकड्या रोग असे म्हणतो.
नक्की वाचा:या पद्धतीने हरभरा पिकातील तणनियंत्रण खर्च होईल कमी
या पद्धतीने करा नियंत्रण
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फुल किडीच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रणाचा वापर करणे गरजेचे असून त्यासाठी निळे चिकट सापळ्यांचा एका एकर मध्ये बारा सापळे याप्रमाणे वापर करणे गरजेचे आहे.
2- जैविक नियंत्रण सोबतच रासायनिक नियंत्रणाचा अवलंब करणे गरजेचे आहे यासाठी ॲसिटाप्रीड(20% एस पी) एक ग्रॅम याप्रमाणे फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.
3- यासोबतच फेनपायरॉक्सिमेट ( पाच टक्के इसी) 1 मिली किंवा सायॲन्ट्रानीलिप्रोल (10.26 टक्के ओडी) दोन मिलि या औषधांची फवारणी करून मिरची पिकातील फुलकिडे यांवर नियंत्रण मिळवता येते.
शेतकरी बंधूंनो कोणत्या पिकावर औषधांची फवारणी करण्या अगोदर या क्षेत्रातील जाणकार लोकांचा सल्ला घेणे किंवा कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कुठलीही उपाययोजना करणे अगोदर तज्ञांचा सल्ला घ्या.
Published on: 07 October 2022, 10:42 IST