गहू हे रबी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. गव्हाचे उत्पादन भारतात बहुतांशी ठिकाणी घेतले जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर रब्बी हंगामात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गव्हाच्या पिकाचे अचूक व्यवस्थापन केले तर भरघोस उत्पादन मिळते. या व्यवस्थापनामध्ये कीड व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. या लेखात आपण गहू पिकावर पडणारे काही कीड व त्यांची व्यवस्थापन कसे करायचे? याबद्दल माहिती घेणार आहोत.
गहू पिकावरील कीड व्यवस्थापन
अ)मावा- गहू पिकावरील मावा रोगाची लक्षणे
1-मावा ही कीड फिक्कट पिवळसर, काळपट व हिरवट रंगाची साधारणपणे दोन ते तीन मीमीलांबीचे असते. मावा किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिका सारख्या अवयव असतात.
2-मावा किडीचे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस कोवळी शेंडे तसेच खोडावरील पेशी रस शोषून घेतात. गहू पिकाची पाने पिवळसर व रोगट होतात.
3- ही कीड मताप्रमाणे गोड चिकट द्रव व विष्टे द्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यावर टाकते. त्यावर बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्लेषण क्रिया बंद होते. परिणामी गव्हाचे रोपे व झाडे मरतात व पीक उत्पादनात मोठी घट येते.
मावा किडीवर नियंत्रण
आर्थिक नुकसान संकेत पातळी – दहा मावा कीड प्रतिरोप. वरील मर्यादा ओलांडल्यानंतर फवारणी प्रति लिटर पाणी व्हर्टीसिलियम लेकॅनी 500 ग्रॅम किंवा मेटारायझियम पाच ग्रॅम 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. किंवा थायमेथॉक्झाम(25 डब्ल्यू जी) 0.1 ग्रॅम किंवा एसीटॅम्परीड 0.5 ग्रॅम
आ) तुडतुडे: लक्षणे-
1-तुडतुडे हे कीटक तीन ते चार मीमी लांब पाचरीच्या आकाराचे हिरवट राखाडी रंगाचे असतात. हे पान वर दोन्ही बाजूस तिरकस चालताना आढळून येतात.
2- तुडतुडे पानातील अन्नरस शोषून घेतात.
3- पानाची शेंडे पिवळे पडतात व रोपाची वाढ खुंटते.
तुडतुडे किडीचे नियंत्रण
- फवारणी प्रति लिटर पाणी डायमिथोएट (30ईसी)1.5 मिली
- पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा.
इ) कोळी: लक्षणे –
1- ही कीड लांब वर्तुळाकार,लाल पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाचे असून ते पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील रस शोषण करते.
कोळी किडा चे नियंत्रण
- गंधक(80 डब्ल्यू पी पाण्यात मिसळणारे) दोन ग्रॅम किंवा डायकोफॉल 1 मिली किंवा डायमिथोएट 1.5 मिली किंवा अबामेक्टीन 0.3 मिली.
- पुढील फवारणी 10 ते 12 दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून घ्यावी.
Published on: 13 October 2021, 10:50 IST