Agripedia

टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामधील सगळ्यात महत्त्वाची कीड आहे ती फळ पोखरणारी अळी. या लेखात आपण या अळी विषयी माहिती घेऊ व त्याचे नियंत्रण कसे करावे हे जाणून घेऊ.

Updated on 17 November, 2021 12:27 PM IST

 टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामधील सगळ्यात महत्त्वाची कीड आहे ती फळ पोखरणारी अळी. या लेखात आपण या अळी विषयी माहिती घेऊ व त्याचे नियंत्रण कसे करावे हे जाणून घेऊ.

टोमॅटो पिकातील फळ पोखरणारी आळी

 टोमॅटो पिकातील ही किड अतिशय उपद्रवी असते. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे 30 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. ही कीड वर्षभर आढळणारी आहे. ही कीड टोमॅटो पिका शिवाय हरभरा पिकात असल्यास तिला घाटेअळी म्हणतात. ही अळी कापूस पिकात बोंडाचे नुकसान करते. या अळीचा उद्रेक पाने, फुले, फळे इत्यादी पिकांच्या भागावर होतो.

या अळीचा जीवनक्रम

 या अळीचा रंग हिरवट असून बाजूला तुटक करड्या रंगाच्या रेषा असतात. या किडीचा मादी पतंगझाडाच्या पानावर, खोडावर अंडी घालतो. अंडी पिवळसर व आकाराने गोल 0.5 मिमि व्यासाची असतात. अंडी उबण्यापूर्वी अंड्यांचा रंग फिक्कट लाल होतो आणि अंड्यातून अळी बाहेर पडते.

सुरुवातीला अळ्या समूहाने असतात व टोमॅटोची कोळी पानेकिंवा रोपाचा  पडाशा पाडतात.अळ्या सहा वेळा कात टाकतात.हा कालावधी 18 ते 25 दिवसांचा असतो. या ओळींची पूर्ण वाढ झाल्यावर टोमॅटो फळ पोखरतात एकानंतर अनेक फळे पोखरत असतात.

 एक अळी आठ ते दहा टोमॅटो फळांना पोखरते. ही अळी टोमॅटो झाडांच्या खोडाजवळ कोशात जात कोषावस्था आठ ते एकवीस दिवस असते. कोशांचा रंग पांढुरका चकित असतो. प्रौढ अवस्थेतील अळीची लांबी 35 ते 45 मी मी पर्यंत  असते.रंग हिरवा व बाजूने काळसर तुटक रेषा असतात. डोके मजबूत व कडकअसते कोशातून बाहेर पडणारा पतंग काटक शरीराचा असतो. मादी पतंग गर्द तपकिरी रंगाचे असते.नर पतंगाच्या पंखाच्या कडा करड्या रंगाच्या असतात व पंखांची लांबी 40 मिनी पर्यंत असते. या किडींची पतंग अवस्था 10 ते 20 दिवसांचे असते. या किडीचा जीवनक्रम अंदाजे 28 दिवसांचा असतो.

 नुकसानीचा प्रकार

 टोमॅटो पिकात अळी अवस्थेतील किड शेंड्यांची किंवा रोपांची पाने खाते. नंतर टोमॅटो अपरिपक्व अथवा पक्व किंवा लहान फळांना बीळपाडते. टोमॅटो फळात विष्ठा टाकतात त्यामुळे टोमॅटो फळे खराब होतात. सडतात व त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ होऊन पिकात रोगाची लागण होते.

 फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

  • टोमॅटो पिकातनुकसान पातळीपर्यंत प्रादुर्भाव दिसतात मॅलॅथिऑन 35 टक्‍के प्रवाही 40 मिली
  • पुनर्लागवड मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी लागवड करावी. तसेच झेंडूची लागवड केली तर फायद्याचे ठरते.
  • लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चीलोनिस हे मित्रकीटक एक लाख प्रती हेक्टरीया प्रमाणात सात दिवसांच्या अंतराने दोन तीन वेळा सोडावेत. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होतात.
  • फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी त्यांना रोगकारक ठरणार्‍या विषाणूंचा वापर करता येतो. हेलिकोवर्पान्यूक्लियर पॉली हायड्रो सीस व्हायरस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी.
  • पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडुनिंब आधारित एझाडिरेक्टिन(3000 पी पी एम ) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • बीटी जिवाणूजन्य कीटकनाशक 20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • शेतात एकरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे लावावे.
  • वेळोवेळी किडलेली फळे काढून खोल खड्ड्यात गाडून टाकावे.
  • रासायनिक कीडनियंत्रण ( फवारणी प्रति लिटर पाणी) किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी जवळ असल्यास क्विनॉलफॉस25इसीएक मिली किंवाइंडोक्साकार्ब (14.5 इसी ) 8 मिली किंवा फ्लूबेडीआमाइड (20 डब्ल्यू जी ) पाच ग्रॅम
  • या आळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी च्या वर गेल्यास नॉव्हल्युरोन (10 इ सी ) 75 मिली किंवा कलोरएन्ट्रानीलिप्रोल(18.5 एसी ) तीन मिली
English Summary: insect management in tommato crop and save crop from insect
Published on: 17 November 2021, 12:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)