Agripedia

पिकांच्या शेंगा व फळे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी घरच्या घरी बनवणारे द्रावण अग्नी अस्त्र

Updated on 15 February, 2022 5:05 PM IST

पिकांच्या शेंगा व फळे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी घरच्या घरी बनवणारे द्रावण अग्नी अस्त्र

मित्रानो निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यानंतर महत्वाचे म्हणजे अग्नी अस्त्र त्याबद्दल आज आपण समजून घेऊ त्यामध्ये तो कसा बनवायचा कशा पद्धतीने वापरायचा हे आपण पाहणार आहोत.

शेती आधुनिकतेकडे जाताना रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा वापर करत असताना जनावरांचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतीला सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी होत आहे.

परिणामी जमिनीची सुपीकता व जमिनीतील सूक्ष्म जीवांची जिवाणूंची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

याचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. त्यामूळे आता आपल्याला या रासायनीक शेतीमधून स्वतःला माघे यावे लागेल.

घराच्या घरी आपण अनेक कीटकनाशके बनउ शकतो जसे की अग्नी अस्त्र , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांची जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपण शेतीचा खर्च कमी करून जास्त उत्पादन घेऊ शकतो. त्यातीलच एक महत्वाचे कीटकनाशक म्हणजे अग्नी अस्त्र.

 

साहित्य

२० लिटर देशी गायीचे गोमुत्र

५०० ग्रॅम हिरव्या मिरचीची चटणी

५०० ग्रॅम गावराण लसूणाची चटणी

५ किलो कडुलिंबाच्या पानांचा लगदा

१ किलो तंबाखू बारीक करून ( तंबाखू विक्रेत्यांकडे तंबाखूचा उरलेला चुरा किंवा दात घासण्यासाठी बनविण्यात येणारी मशेरी किंवा मिसरी बनविण्यासाठी लागणारी भुकटीसारखी तंबाखू जिला आकोट असेही संबोधतात, ती तंबाखूपेक्षा स्वस्त दरात मिळू शकते).

 

कसे बनवावे

वरील सर्व साहित्य एका पात्रात घेऊन त्यास आचेवर ठेवून उकळा. चार ते पाच उकळ्या येउ द्या. त्यानंतर हे द्रावण आचेवरून उतरवुन थंड होऊ द्या. साधारण दोन दिवसानंतर (४८ तास) हे द्रावण फडक्याने गाळून घ्या. लगेच वापर करणार नसल्यास प्लास्टिक किंवा काचेच्या पात्रात साठवून ठेवा. बनविल्यापासून ३ महिन्यांपर्यंत या द्रावणाचा प्रभाव उत्तम आहे. या काळानंतर द्रावणाची कीटनाशक शक्ती कमी होत जाते.

कशासाठी वापरावे

पिकांच्या शेंगा व फळे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी हे द्रावण उपयुक्त आहे.

वापराचे प्रमाण

१०० लिटर पाण्यात ३ ते ५ लिटर अग्नीअस्त्र या प्रमाणात मिसळून पिकांवर फवारावे.

वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या थोड्या फार फरकाने देशभरात विविध नावाने हे द्रावण प्रचलित आहे. काही भागात यास “लमित” अर्क म्हणजेच लसूण+मिरची+तंबाखू अर्क या नावाने तर उत्तरे कडील भागात लहसून मिर्च अदरक का अर्क या नावाने हे द्रावण प्रचलित आहे. यात केवळ लसूण, मिरची व आले (अद्रक) एकत्र वाटून त्याचा अर्क पाण्यात मिसळून वापरले जाते.

बहुतांशी कीटक व अळ्यांचे श्वसन हे त्वचे मार्फत होत असते. द्रावणातील तिखट अर्क फवारणीद्वारे त्यांच्या त्वचेवर पडताच श्वसनावरोध (श्वसनास अडथळा) होऊन त्या मरतात किंवा निष्प्रभ होतात.

English Summary: Insect management in home making agniashra
Published on: 15 February 2022, 05:05 IST