Agripedia

भारतात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात घेतले जाते. फक्त नाशिक जिल्ह्यातून सुमारे ७० टक्के उत्पादन घेतले जाते. दिवसेंदिवस द्राक्षाचे उत्पादन वाढतच निघालेले आहे. नाशिकला वाईन सिटी म्हणून ओळखले जात आहे. राज्यातील द्राक्षाची चव खूप गोड असल्याने दिवसेंदिवस याची मागणी वाढतच चालली आहे. महाराष्ट्र राज्य सोडले तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,पंजाब, हरियाणा, राजस्थान राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.

Updated on 23 October, 2021 1:08 PM IST

भारतात सर्वात जास्त द्राक्षाचे (grapes)उत्पादन महाराष्ट्र राज्यात घेतले जाते. फक्त नाशिक जिल्ह्यातून सुमारे ७० टक्के उत्पादन घेतले जाते. दिवसेंदिवस द्राक्षाचे उत्पादन वाढतच निघालेले आहे. नाशिकला वाईन(wine) सिटी म्हणून ओळखले जात आहे. राज्यातील द्राक्षाची चव खूप  गोड असल्याने दिवसेंदिवस याची मागणी वाढतच  चालली आहे. महाराष्ट्र  राज्य  सोडले  तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,पंजाब, हरियाणा, राजस्थान राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.

द्राक्षाची लागवड केली की शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थिती मध्ये भर पडतो मात्र त्यावर रोगाचा प्रादुर्भाव पडला तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान झेलावे लागते त्यामुळे वेळेवरच द्राक्षावरची कीड तसेच रोग नियंत्रण ठेवावे लागते. द्राक्ष फळाला सर्वात जास्त धोका असतो तो म्हणजे रोगाचा. आज आपण त्याचे नियंत्रण कसे करावे याबद्धल जाणून घेणार आहोत.

थ्रीप्स किडी:

थ्रीप्स किडी ही काळ्या रंगाची लहान किडी असते जी कीड पानाच्या खालच्या बाजूला आपली अंडी जमा करून ठेवतात. बाल अवस्थेतील निम्फस कीड आणि प्रौढ अवस्थेतील थ्रीप्स  कीड या दोन्ही किडी पानाच्या खालच्या बाजूचा रस चोखतात. थ्रीप्स कीड नवीन येणाऱ्या द्राक्षे पिकावर सुद्धा हल्ला करतात तसेच त्याच्या फुलोरावर  सुद्धा  हल्ला करतात. या  किडीचे नियंत्रण करण्यासाठी ०.०५ टक्के फॉस्फेमिडियन किंवा ०.१ टक्के मोनोक्रोटोफॉस किंवा ०.०५ टक्के मॅलॅथिऑन या कीटकनाशकाचा फवारण्या कराव्या यामुळे थ्रीप्स किडीचा नायनाट होईल. या कीटकनाशक फवारण्यामुळे पिकाची हानी कमी होते.

लीफ स्पॉट:

द्राक्षाच्या पत्तीवर गोल किंवा वेडेवाकडे आकाराचे गडद तपकिरी ठिपके पडतात त्यामुळे या रोगाला लिफ स्पॉट असे नाव पडले आहे. गडद तपकीरी पडलेल्या  ठिपक्यांच्या  मध्य  आकार राखाडी रंगाचा असतो.लिफ स्पॉट चे प्रमाण जास्त वाढायला लागले की प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होयला सुरुवात होते त्यामुळे त्यास पोषक तत्वे भेटणे बंद होते आणि झाडाची वाढ खुंटन्यास सुरू होते.


कसे करावे नियंत्रण:

लिफ स्पॉट रोग नियंत्रणात आणण्यासाठी ज्या पानांवर रोग पडला आहे ती पाने जाळून टाकावीत. लिफ स्पॉट रोगाची लक्षणे दिसतात ३.० ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा २.५ ग्राम झिनेब प्रति लिटर पाण्यात टाकून त्याचे द्रावण तयार करावे आणि १० दिवसाच्या अंतरावर त्याची फवारणी करावी. असे केल्याने रोग नियंत्रणात येतो.

English Summary: Insect infestation on grape crop, what is the remedy
Published on: 23 October 2021, 01:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)