अनेक शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच कृषी संशोधन केंद्र वाशिम येथील मूग व उडीद पीक पाहणी नुसार मुग व उडीद पिकांच्या कळ्या व फुले यावर बहुदा ठीपक्याची शेंगा पोखरणारी अळी तथा त्यासदृष्य अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे.या किडीचा मूग व उडीद पिकांच्या कळ्या व फुले यावर बहुदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे.
नुकसानीचा प्रकार :या किडीचा मादी पतंग बारीक कळ्या वर अंडी टाकतो,The female moth of this insect lays eggs on the fine buds, अंडीतून बाहेर पडलेली तिष्न अळी कळीच्या आत जाते व कळी तील नर व मादी भाग (ऐंथर, स्टीगमा) खाते यामुळे फुलांमध्ये परागीकरण होत नाही, अ श्या कळ्या व फुलांचे रुपांतर शेंगेत होत नाही व अश्या कळ्या व फुले गळून पडतात.
उपाययोजना :नुकसान टाळण्यासाठी / कमी करण्यासाठी झाडा खाली पडलेल्या कळ्या व फुले उकलून भिंगाच्या सहायाने (अळी खूप लहान असते, डोळ्याने सहज दिसणे अवघड आहे) आत अळी आहे का पहावे, कळ्या/ फुलांमध्ये अळ्या चे प्रमाण जास्त दिसल्यास योग्य त्या शिफारशीत कीटनाशका ची फवारणी करावी.
उडीद पिकासाठी पुढील कीटकनाशके शिफारशीत आहेत.
1.Novaluron + Indoxicarb
2.Flubendamide
3.Chlorantraliniprol
4.Lufenuron
5.Thiodicarb
डॉ.भरत गीते
विस्तार कृषी विद्यावेत्ता,
डॉ पिडिकेवी, कृषी संशोधन केंद्र, वाशीम.
Published on: 24 August 2022, 08:52 IST