Agripedia

पपईची लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगल साधन बनलय. यातून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतायेत. परंतु यासाठी आपण पपईच्या पिकांचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात पपईच्या झाडांना विषाणूजन्य रोग होतात. म्हणून, या हंगामात रोगाचे व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या फळ आणि फलोत्पादन विभागाचे शास्त्रज्ञ डॉ जयप्रकाश यांनी पपईच्या शेतकऱ्यांसाठी रोग व्यवस्थापनाची माहिती दिली आहे.

Updated on 05 September, 2021 11:09 AM IST

पपईची लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगल साधन बनलय. यातून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतायेत. परंतु यासाठी आपण पपईच्या पिकांचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात पपईच्या झाडांना विषाणूजन्य रोग होतात. म्हणून, या हंगामात रोगाचे व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या फळ आणि फलोत्पादन विभागाचे शास्त्रज्ञ डॉ जयप्रकाश यांनी पपईच्या शेतकऱ्यांसाठी रोग व्यवस्थापनाची माहिती दिली आहे.

 

पेर्न्युलायटीस

पपईच्या पिकावर आढळणारा हा एक विषाणूजन्य रोग आहे. त्याला टॉर्सन रोग असेही म्हणतात. यामध्ये वनस्पतीच्या वरच्या भागाची पाने मुरडली जातात. यानंतर, जे काही नवीन पाने येतात, ती मुरलेलीच येतात. हे सहसा पांढऱ्या माशींद्वारे पसरते.

 

पेर्न्युलायटीस रोग कसे व्यवस्थापित करावे

याच्या व्यवस्थापनासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, पपईचे शेत जून ते सप्टेंबर पर्यंत स्वच्छ असावे. शेतकऱ्यांनी नियमितपणे स्वच्छता करत राहिले पाहिजे. व्यावसायिक पपई लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, बाजरी किंवा बेबी कॉर्न सारख्या सापळ्याची पिके शेताच्या बांधावर लावावी.

यासह, तीन मिली प्रति लिटर पाण्यात कडुलिंबाचे तेल मिसळा आणि जून ते सप्टेंबर दरम्यान 15 दिवसांच्या अंतराने झाडांवर फवारणी करा.  तसेच इमिडाक्लोप्रिड 1 मिली प्रति 3 लिटर मिसळून द्रावण तयार करा आणि पाण्यात 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

 

 

रिंग स्पॉट व्हायरस

पपईच्या पिकात हा एक अतिशय धोकादायक रोग आहे आणि खूप वेगाने पसरतो. ते महुमुळे पसरते. एप्रिल महिन्यात महूंची संख्या लक्षणीय वाढते, याशिवाय ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातही महूंची संख्या लक्षणीय वाढते. हे या 15 दिवसात खूप वेगाने पसरते.

 

रिंग स्पॉट व्हायरस रोग व्यवस्थापन

पपईला महूपासून वाचवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय खताचा वापर अगदी सुरुवातीपासूनच करावा. यामध्ये ट्रायकोडर्मा, शेणखत आणि वर्मी कंपोस्टचा वापर करावा. रोपवाटिकेपासून ते पपई लागवडीपर्यंत सेंद्रिय खतांचा चांगला वापर केला पाहिजे. याशिवाय, डायमेथोएट देखील वापरला जाऊ शकतो, याची एक मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.

शेतकरी जे काही रसायन वापरत आहेत, त्यांनी ते 15 ते 20 दिवसांच्या अंतराने फवारावे. यासह, रसायने बदलत राहावे. पपई हे एक असे झाड आहे ज्यावर अधिक कीटकनाशके किंवा रसायनांचा वापर केल्याने त्यात फायटोटॉक्सिसिटी येते. यामध्ये त्याची पाने जळू लागतात.

 

 

बुरशीजन्य रोग

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जास्त पाणी आणि उच्च तापमानामुळे  बुरशीजन्य रोग पसरतात.  हे टाळण्यासाठी, झाडे लावण्यापूर्वी एक आठवड्यापूर्वी 20 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा कुजलेले शेणखत वापरावे. तसेच, ज्या ठिकाणी पाणी साचते म्हणजे डाबची जमीन  अशा जमिनीची निवड पपई लागवडीसाठी करू नका.

English Summary: insect attack on papaya crop in september
Published on: 05 September 2021, 11:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)