शेतकरी (farmer) आळीचा बंदोबस्त करायचा असेल तर कामगंध साफळ्याची उभारणी करतात. कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे आणि कामगंध सापळ्याची काय भुमिका आहे? याबाबद आपण सविस्तर माहिती घेऊया.
सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या कामगंधा द्वारे नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन
कापसातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन –
कापूस (cotton) पिकातील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन मिळविण्यासाठी प्रती एकर आठ ते दहा कामगंध सापळे गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह लावा. कीटकाच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्यातून लिंग प्रलोभन रसायनाचा सूक्ष्म गंध वातावरणात पसरतो त्यामुळे मिलनासाठी सहचर शोधताना कीटकाची फसगत होते. हे कामगंध सापळे वापरताना
पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1 ते 1.5 फूट उंची ठेवून वापरा. बाजारात तूर व हरभरा कामगंध सापळे बाजारात उपलब्ध आहेत. कामगंध सापळ्यांचा वापर योग्यवेळी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात केल्यास किडीवर नियंत्रण येते.
सर्वसाधारणपणे पीक संरक्षण उपाय सुरू करण्यापूर्वी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले आहेत याची खात्री करा. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा (Spodoptera) या किडीचे सरासरी 8 ते 10 नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास या किडीच्या व्यवस्थापनासाठीचे उपाय करणे आवश्यक आहे.
Published on: 14 February 2022, 05:04 IST