Agripedia

आपल्याकडे शेतीमध्ये पिकांची लागवड हि तीन हंगामात केली जाते, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. महाराष्ट्रात तसेच देशात खरीप हंगाम आपटला आहे आणि रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्वीची कामे चालू आहेत तर काही ठिकाणी रब्बीच्या पिकांची लागवड हि सुरु झाली आहे. खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके हि काढून झाली आहेत. खरीप हंगामातील एकमात्र पिक हे सद्धया वावरात उभे आहे आणि ते पिक म्हणजे तुरीचे पिक. यावर्षी खरीप हंगामातील बऱ्याचशा पिकांवर अतिवृष्टीमुळे रोगांचा प्रादुर्भाव हा दिसला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हि घट घडून आली आहे.

Updated on 15 November, 2021 9:24 PM IST

आपल्याकडे शेतीमध्ये पिकांची लागवड हि तीन हंगामात केली जाते, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. महाराष्ट्रात तसेच देशात खरीप हंगाम आपटला आहे आणि रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्वीची कामे चालू आहेत तर काही ठिकाणी रब्बीच्या पिकांची लागवड हि सुरु झाली आहे. खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके हि काढून झाली आहेत. खरीप हंगामातील एकमात्र पिक हे सद्धया वावरात उभे आहे आणि ते पिक म्हणजे तुरीचे पिक. यावर्षी खरीप हंगामातील बऱ्याचशा पिकांवर अतिवृष्टीमुळे रोगांचा प्रादुर्भाव हा दिसला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हि घट घडून आली आहे.

सद्धया वावरात उभे असलेले तुरीचे पिक देखील रोगाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीच्या पिकासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचा सल्ला हा दिला जात आहे. अनेक कृषी वैज्ञानिक दावा करत आहेत की, जर वेळीच तुरीवर आलेल्या किडिंवर आणि रोगावर काही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर खरीप हंगामातील महत्वाचे तूर पिकाच्या उत्पादनात जवळपास 70 टक्के घट हि घडून येईल. त्यामुळे तूर पिकावर आलेल्या ह्या संकटाचा सामना करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाणे शेतकऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि ह्या सूचनांचे पालन करून शेतकरी बांधव तूर पिकातून चांगली कमाई करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 वातावरणातील बदलामुळे कीड आणि शेंगाना हानी पोहचवणाऱ्या अळ्या तसेच त्यापासून होणाऱ्या रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तूर हे खरिपातील शेवटचे आणि महत्वाचे पीक आहे, आधीच खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा जोरदार फटका हा बसला आहे त्यामुळे खरीप हंगामातील तूर पिकातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाची अपेक्षा आहे. जेणेकरून खरीप हंगामातील इतर पिकांच्या उत्पादनाची भरपाई हि या पिकाच्या उत्पादनातून पूर्ण करता येईल. मात्र, यासाठी तूर पिकावर आलेल्या कीडीचे व्यवस्थापन करणे हाच एकमात्र पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पिकावर आलेल्या किडीवर वेळीच नियंत्रण मिळवायला पाहिजे. यासाठी कृषी विद्यापीठाणे सांगितलेल्या सूचनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ह्या संकटाला सामोरे जाण्यासाठी कृषी विभागाने एक यंत्रणा तयार केली आहे, जर शेतकरी राजांनी त्यानुसार उपाययोजना केल्या तर नक्कीच तुरीच्या उत्पादनात हि लक्षणीय वाढ होऊ शकते आणि जे उत्पादन कमी मिळणार होते ते अधिक मिळेल आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा हा मिळेल.

शेतकऱ्यांना दिल्यात ह्या सूचना

शेतकरी मित्रांनो कृषी विद्यापीठाणे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत त्या सूचना खालीलप्रमाणे:

»तुरीची ज्या पानांवर अळींचे संक्रमण आहेत अशी पाने गोळा करून अळ्यांसह नष्ट करावे.

»तूर पिकातून वेळोवेळी निंदनी करून तण काढून टाकावे म्हणजे हवा हि खेळती राहील शिवाय त्यामुळे दुसरे रोग पिकावर येणार नाहीत.

»तुरीचे पिक हे फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना प्रति एकर 2 कामगंद जाळी एक फूट उंचीवर लावावी.

 

»शेतकरी मित्रांनो शेतात एकरी 20 ते 30 ठिकाणी एक ते दोन फूट उंचीवर बर्ड स्टॉपची स्थापना करावी. यामुळे पक्ष्यांना अळ्यांची शिकार करता येईल.

»फुलोरा सुरू होताच, 25 ml 5% निंबोळी अर्क किंवा Azadirachtin 300 ppm प्रति 5 लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.

»दुसरी फवारणी हि जेव्हा शेंगा खाणाऱ्या अळ्या ह्या पहिल्या अवस्थेत असतील तेव्हा करावी. शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी हि संध्याकाळी करावी असा सल्ला दिला जातो.

English Summary: insect and disease attack on pigeon pea crop agri expert give some advice
Published on: 15 November 2021, 09:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)