Agripedia

कृषी सेतू महाराष्ट्र राज्य :- भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील लोक शेतीबरोबरच पशुपालन,शेळीपालन अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जोडव्यवसाय करत असतात.

Updated on 23 December, 2021 11:09 AM IST

दुग्ध व्यवसाय हा शेतकरी वर्गाचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. दूध विक्री करून बळीराजा आपल्या नवीन उत्पन्नाचा मार्ग तयार करत आहे. आपल्या देशात दुग्ध व्यवसाय आणि प्रोसेसिंग फूड चा मोठा बिजनेस पसरला आहे. आपल्या देशात अनेक वेगवेगळे डेअरी ब्रँड उपलब्ध आहेत परंतु आज आम्ही या लेखात भारतातील ज्या ब्रँड ची माहिती सांगणार आहोत हे वर्षाकाठी करोडो रुपये कमवत आहेत.

 

सिड्स फार्म डेअरी:-

गरीब शेतकरी कुटुंबातील किशोर इंदुकुरी यांनी सिड्स डेअरी ची स्थापना केली. या डेअरी च्या माध्यमातून किशोर इंदूकरी हे आपल्या ग्राहकांना भेसळमुक्त दूध पुरवतात. साल 2012 मध्ये किशोर यांनी 20 गाई खरेदी केल्या आणि हैद्राबाद येथे सिड्स फार्म या नावाने आपला डेअरी ब्रँड प्रस्थापित केला. वर्षाकाठी या डेअरी ची उलाढाल ही 50 ते 80 लाख रुपयांपर्यंत आहे

मिल्क मॅजिक डेरी:-

मध्यप्रदेश राज्यातील असणारे तसेच शेतकरी असणारे मोदी यांनी दूध डेअरी व्यवसायात आपले स्थान प्रस्थापित केले आहे. मिल्क मॅजिक डेअरी यांनी घरगुती बी 2 सीडेअरी उत्प ब्रांड मिल्क मॅजिक लॉन्च केला . हा ब्रँड निर्यातक्षम मूल्यवर्धित डेअरी उत्पादनाची मोठ्या प्रमाणात किरकोळ आणि होलसेल दरात विकले जातात.

 

हेरिटेज डेअरी ब्रँड:-

आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या डेअरी ची स्थापना केली. सुरवातीच्या काळात 80 लाख रुपये गुंतवणूक करून हेरिटेज डेअरी ची स्थापना आंध्रप्रदेश येथे करण्यात आली. तसेच हेरिटेज डेअरी आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा पुरवते. त्यामध्ये ताजी दूध दही , दूध पावडर , स्वादयुक्त दूध सोबतच अनेक डेरी उत्पादनांचे निर्मिती करत आणि आपल्या ग्राहकांना संतुष्ट ठेवते. तसेच हेरिटेज डेअरी ब्रँड हा पशुखाद्य सुद्धा बनवण्याचे काम करतो.

मिस्टर मिल्क डेअरी ब्रांड:-

महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील रिअल इस्टेट कंपनी मित्तल समूहाचे संस्थापक नरेश मित्तल यांनी दूध उत्पादन ब्रँड उदयाला आणला तसेच आजपर्यंत या डेअरी ब्रँड ने 1.9 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. तसेच दिवसेंदिवस या ब्रँड चे नेटवर्क पसरत चालले आहे.

अमूल डेअरी ब्रँड:-

अमूल हा भारतातील सर्वात मोठा दूध डेअरी ब्रँड आहे. तसेच भारताशिवाय परदेशीय देशांमध्ये सुद्धा अमूल च्या दूध उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 14 डिसेंबर 1946 साली हा ब्रँड गुजरात येथे उदयास आला. 

अमूल डेअरी ब्रँड मध्ये दूध पावडर, दूध, तूप, लोणी, दही पनीर, गुलाबजामुन आणि चॉकलेट यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच वर्षाकाठी या डेअरी ब्रँड ची कमाई ही 3.4 बिलियन डॉलर एवढा आहे.

English Summary: India's largest dairy brand that earns crores of rupees a year.
Published on: 23 December 2021, 11:09 IST