Agripedia

आपण फवारणीतून तुरीचे उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 05 June, 2022 12:20 PM IST

तूर हे पिक सोयाबीन, उडीद या पिकामध्ये आंतर पिक म्हणून घेतोत, सोयाबीन नंतर तुर हे पिक आपल्यासाठी महत्वाचे आहे.पण तुरीचे उत्पादन एकरी 3 ते 4 क्विंटल च्च्या वर होत नाही.त्याचे मुख्य कारण काय?१) तूर या पिकाकडे पहिले 3 महिने लक्ष्य न देणे.२) किडी व बुरशीजन्य रोगा बरोबरच ३) तूर पिकाची नुसती वाढ होणे.४) तुरीला एकाच वेळी फुले न येणे, फूल गळ होणे. हे मुख्य कारण आहे.त्यासाठी काय करायला पाहिजे.१)तूर हे पिक ६० ते ७० दिवसाचे झाल्यावर खताची मात्रा द्यावी.२) तूर हे पिक ६० ते ७० दिवसाचे झाल्यावर होशी, तारीफ,मायक्रोला या औषधांची 50मिली(किंवा मिली /पंप)या प्रमाणात फवारणी करावी.तूर पिकावर ६० ते ७० दिवसांनी च  micronutrient & amino acid ची फवारणी का करावी!कारण तूर पिकातील हा काळ वाढीचा व अन्न पोषण करून ठेवण्याचा काळ असतो. या काळात विद्युत ची फवारणी नाही केली तर पिकाची नुसती वाढ होते.

तूर या पिकाची नुसती वाढ झाली तर फळ फांद्यांची संख्या कमी भेटते,अन्न चा पुरवठा वाढीतच खर्च होते, त्यामुळे फुले कमी लागणे, फूल गळ होणे व किड रोगाला बळी पडणे या गोष्टी होतात.६० ते ७० दिवसांनी micronutrient ची एका फवारनी मुळे होणारे फायदे.१) पानाचा आकार आणि संख्या वाढून ती दीर्घकाळ हिरवी राहतात आणि लवकर गळत नाहीत. त्यामुळे अधिक प्रमाणात हरितद्रव्य तयार झाल्याने पिकामध्ये ऊर्जा व अन्न चा साठा वाढतो.२) दोन फांद्या/फुटव्या मध्ये अंतर कमी होते, फांद्याचे/फुटव्याचे प्रमाण वाढून पिकाची उंची मर्यादित राहते. त्यामुळे जास्त फांद्या/फुठव्या मुळे पिकाला व्यवस्थित आकार येतो, आणि फुलांची संख्या वाढते, आंतर मशगतीची काम आणि पिक काढणी सुलभ होते.३) मुळांचा विकास व्यवस्थित होतो जेणेकरून कार्यक्षम मुळांची संख्या वाढते.सक्षम मुळ व्यवस्थेमुळे पिक मातीत दिलेल्या खतांचा आणि आद्रतेचा पुरेपूर वापर करू शकते आणि पिक कोलमडून पडत नाही.

४) व्यवस्थित वाढीमुळे, पिक लवकर फुलावर येते आणि एक समान फुळ धारणा होते, पिकातील पुरेश्या अन्न साठ्यामुळे , फूल गळ कमी होते त्यामुळे उत्पादनात वाढ होते.५) शेंगा लवकर आणि जास्त प्रमाणात लागतात व त्यांचा विकास एक समान होतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन बाजार भाव पण जास्त मिळतो.वरील सर्व गोष्टी एका फवारणी मुळे होते. तर त्यामुळे आज् रोजी तुरीचे पीक ६० ते ७० दिवसाचे झाले आहे. ही योग्य वेळ आहे तुरीचे पाने पिवळी दूमतलेली गुडाळलेली कातरलेली पण दिसत आहेत त्यासाठी प्रथम फवारणी हमला + निम अर्क घ्यावी. तसेच तुरी साठी विद्राव्य खते फवारणी साठी वापरावे कमी पैसात स्टेज नुसार फवारणी मध्ये घ्यावी ते खालील प्रमाणे१९:१९:११ : यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. 

यातील नत्र ह्या अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिनही स्वरूपात असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेइचा उपयोग होती. पीक संरक्षणासठीं पापरल्या जाणान्या जवळपास सर्व रसायनाबरोबर वापरण्यास योग्य. अन्नधान्य, भाज्या, फळे व वेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त.१२:६१:0:यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणा-या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच फळफांद्याच्या वाढीसाठी या खताचा उपयोग होतो,याला मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. कॅल्शियमयुक्त खते वगळता सर्व विद्रव्य खतांबरोबर मिसळून वापरता येते. नवीन मुळांच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुलांच्या पूर्ण वाढीसाठी व तुर येताना उपयुक्त..तसेच आपल्या ग्रुप द्वार वेळोवेळी माहिती दिली जाईल.

English Summary: Increase the productivity of the trumpet by spraying
Published on: 05 June 2022, 12:20 IST