Agripedia

हा कोठे उपलब्ध होईल? मातीत तो सुपीक मातीत कुजलेल्या त्याच वनस्पती यामुळे मातीचे स्वरूप बदलतं गेले आहे.

Updated on 09 January, 2022 6:26 PM IST

हा कोठे उपलब्ध होईल? मातीत तो सुपीक मातीत कुजलेल्या त्याच वनस्पती यामुळे मातीचे स्वरूप बदलतं गेले आहे. हे लक्षा घ्या ! आपल्या मातीमध्ये करोडो जीव असतात, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. आपली जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. 

पदार्थ आणि खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थानी माती बनते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. मातीच्या या प्रक्रियेबाबत शेतक-यांना माहिती करून देण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न झाले तर काही प्रमाणात का होईना माती वाचवता येईल. जमिनीचे व्यवस्थापन, मातीच्या सुपिकतेचे पुनर्भरण करता येईल.अन्नधान्याची उत्पादकता वाढवणे अपरिहार्य असल्याने जमिनीची सुपीकता टिकवणे महत्त्वाचे ठरते. पीकपेरणीअगोदर जमिनीतल्या अन्नद्रव्याची तपासणी व पिकास आवश्यक असलेल्या एकूण अन्नद्रव्याची आवश्यकता या दोन्ही बाबी विचारात घेऊन पिकास अन्नद्रव्ये वेळेवर व योग्य त्या पद्धतीने देणे गरजेचे आहे.उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमीन. अनादी काळापासून शेतकरी जमीनीत विविध पीके घेत आला आहे

पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकण्याचे प्रमाण जास्त होते. सहाजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआप मदत होत असे.आता चित्र वेगळे आहे मूलद्रव्यांच्या असमतोल वापरामुळे मूलद्रव्यांची जमिनीत कमतरता जाणवू लागली आहे. जमिनीला पुरविण्यात येणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी एखादेच अन्नद्रव्य पुरवून जमिनीत सुपीकता वाढत नाही. त्यामुळे रासायनिक खतांची मात्रा देऊनही अलीकडे उत्पादकता वाढीस मर्यादा येत आहेत. शेती आणि अन्न सुरक्षेसाठी मातीमध्ये जैवविविधता अंत्यत गरजेची आहे. जर मातीची अशीच नासधूस होत राहीली तर येणाऱ्या पिढ्यांची अन्नसुरक्षा धोक्यात येईल, तसेच शेती उत्पादन ही घटेल. मातीचे सूक्ष्मजीव जैविक आणि अजैविक घटकांचे पिकांसाठी लागणारे पोषण घटकात रुपांतर करतात. त्यांच्यावर पिकांची वाढ अवलंबून असते. मातीतील जिवाणू मुळे निसर्गाचाही समतोल राखला जातो.

पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये दिली जाऊन मातीची सुपीकता राखली जाते. पिकास संतुलीत प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जातात. अन्नद्रव्यांची जमिनीतील कमतरता हळूहळू कमी होते. खतांचा कार्यक्षम वापर होतो. उत्पादनात वाढ होऊन उत्पादनाची पत सुधारते. म्हणूनच माती वाचवण्यासाठी, मातीचा पोत सुधारण्यासाठी माती सर्वेक्षण, माती परीक्षण या तंत्रज्ञानाची शेतक-यांना माहिती देऊन जागृती घडविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

लेखक - मिलीद गोदे

अचलपूर

English Summary: Increase Organic carbon soil main source
Published on: 09 January 2022, 06:26 IST