Agripedia

कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण,

Updated on 11 November, 2022 9:21 AM IST

कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही गोष्टींचे काटेकोर व्यवस्थापन करणेही गरजेचे राहील.मधमाश्‍यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच आज आपण पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो. एकूण

पिकांपैकी पाच टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते.Five percent of crops are self-pollinated. तर 85 टक्के पिकांत परपरागीभवन दिसून येते.

इस्राईल तंत्रावर अधारित खत व्यवस्थापन

मेक ग्रेगोर नामक प्रसिद्ध परागीभवनतज्ज्ञाच्या मते मनुष्याच्या आहारातील एक-तृतीयांश भाग सरळ किंवा अनपेक्षितपणे मधमाशी व अन्य कीटकांद्वारे परागीभवन झालेल्या पिकांद्वारे मिळतो. जगात मधमाशी व अन्य कीटकांद्वारे होणाऱ्या परागीभवनाचे आर्थिक मूल्य वार्षिक 60 ते 70 अब्ज अमेरिकी

डॉलर आहे. आपल्या देशातही सुमारे सात टक्के पिकांमध्ये कीटकांद्वारे परागीभवन होते. आपला कृषी विकासदर वाढविणे गरजेचे असल्याने परागीभवन करणाऱ्या सजीवांचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही.मधमाश्‍यांच्या संख्येत होतेय घटनुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात कमी होत चाललेल्या परागीभवन करणाऱ्या सजीवांच्या वस्तीमुळे विविध पिकांमध्ये 0.5 ते 80 टक्के (एकूण

सरासरी 26 टक्के) एवढी उत्पादनात घट दिसून आली आहे. रसायनांचा अनियंत्रित वापर, अनेक वर्षे एकाच भागात एकच पीक घेणे, जंगलांचे घटते प्रमाण अशा विविध कारणांमुळे नैसर्गिक अन्न व निवास यांचा नाश झाल्याने मधमाश्‍यांची संख्या कमी होत आहे. मध गोळा करण्यासाठी काही व्यक्तींकडून अयोग्यरीत्या धूर करण्याच्या पद्धतीमुळेही त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. 

 

डॉ. मिलिंद जोशी

English Summary: Increase crop production? So take care of the bees!
Published on: 10 November 2022, 04:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)