डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे उदघाट्न दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी झाले. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या मेळाव्याचे आयोजन दिनांक ४ ते ५ मार्च, २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून डॉ. आर. बी. शर्मा, माजी राष्ट्रीय समन्वयक, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, भारतीय कृषी अनुसंधान परिषद , नवी दिल्ली तथा वरिष्ठ सल्लागार, कृषी तथा कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास भाले, मा. कुलगुरू डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला हे होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्री. विक्रम साळी, डी. सी. पी. अमरावती डिव्हिजन, डॉ.
आर. एम. गाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला व डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला हे या उदघाट्न कार्यक्रमप्रसंगी, रौप्य महोत्सवी .कृ. खुले व्यासपीठ,
कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमप्रसंगी डॉ. एस. एस. हरणे, नोडल ऑफिसर, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांची उपस्थिती होती. इतर मान्यवर तसेच कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. एस. आर. काळबांडे, प्रमुख अन्वेषक, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प तथा कुलसचिव, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाच्या रुपरेषेविषयी विस्तृत माहिती दिली तसेच त्यांनी राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, अकोला अंतर्गत मागील तीन वर्षात ● आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम जसे प्रशिक्षण परिषद, कार्यशाळा, मेळावे ईत्यादि असे एकूण ३० कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले व त्यामध्ये विदयार्थी व शास्त्रज्ञ यांची सहभागाची संख्या ११००० एवढी असल्याची माहिती दिली. हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात घेण्यात आल्याचे सांगितले.
डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात या महाविद्यालयाची सुरवात झाल्यापासून ते आतापर्यंत झालेल्या विविध घडामोडी जसे विद्यार्थी प्रवेश क्षमतेमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली. तसेच एम. टेक कोर्स ला १९८४ मध्ये व पी. एच. डी. कोर्सला २००८ पासून सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मदत झाल्याची माहिती दिली तसेच त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या. श्री. विक्रम साळी, डी. सी. पी. अमरावती डिव्हिजन यांनी आपल्या भाषणात आपल्या महाविद्यालयीन जिवनातील आठवणी व अनुभव सांगितले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि डॉ. आर. बी. शर्मा, माजी राष्ट्रीय समन्वयक, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली तथा वरिष्ठ सल्लागार, कृषी तथा कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या भाषणात यांनी राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, अकोलाअंतर्गत घेण्यात आलेले विविध कौशल्य विकासावर आधारित उपक्रम व प्रयोगशाळेमध्ये निर्मित करण्यातआलेल्या अद्यावत सोयीसुविधा इत्यादी कामांचे कौतुक केले. त्यांनी मा. कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या सेंद्रिय शेती, कापूस उत्पादनामध्ये बोड अळी निर्मूलन मोहीम आदी कामांची प्रशंसा केली. त्यांनी मा. कुलगुरू यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या राष्ट्रीय नामांकनात सुधार झाल्याबद्दल त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.
मा. डॉ. व्ही. एम. भाले, कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात कृषि अभियांत्रिकी मध्ये शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधन व यंत्र निर्मिती करीता खूप वाव असल्याचे सांगितले. कृषि क्षेत्रात उद्योजकतेच्या भरपूर संधी असून विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यापीठामध्ये पदवीचे शिक्षण घेत असतांना कौशल्य विकासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी करिअर बद्दल भविष्यातील वाटचाल कशी असावी याची निवड विद्यार्थ्यांनी पदवीमध्येच ठरवावी व त्यानुसार मार्गक्रमन करावे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोहिनी डांगे व सौ. स्वाती नारनवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश मुरूमकार यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्यूबेशन फॉउंडेशन, डॉ पंदेकृवि, अकोला यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. आर. एम. गाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रकल्पांमुळे विद्यापीठाचे राष्ट्रीय नामांकनात प्रगती होण्यास.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 05 March 2022, 01:29 IST