Agripedia

चिखली-मागील वर्षी बाजारात भाव जास्तीचे असतांना महाबिजकडुन शेतकर्याना कमी भावावर समाधान मानावे लागले असे असतांना भाव फरकाची रक्कम मिळेल अशी अपेक्षा शेतकर्याना होती.यामुळे शेतकरी शासना प्रति रोष निर्माण करीत आहे.तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन या शेतकर्याना भाव फरकाची रक्कम देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली परंतु यावर तोडगा निघाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Updated on 24 September, 2021 11:22 AM IST

शेतकर्रासह मोठे आंदोलन उभारणार असल्याचे सांगत महाबिज कडुन भावफरक मिळवुन देण्यासाठी स्वाभिमानी ने जनजागृती मोहिम हाती घेतली असुन शेतकर्याना न्याय मिळवुन देणार असल्याची देखील भुमीका स्वाभिमानी संघटनेची असल्याचे मत विनायक सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.   

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील शेतकरी महाबिज कडुन बियाणे खरेदी करीत असतात शेतकरी महाबिजला पसंती सुद्धा देतात म्हणुनच महाबिज बियाणे कंपणी टिकुन आहे.

मागील वर्षी चिखली तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये बियाणे उगवले नसल्याने शेतकर्रानी इतर कंपण्यांविरोधात बंड करुण बोगस बियाणे देऊन फसवणुक केल्या प्रकरणी अनेक कंपण्यांवर गुन्हे दाखल झाले होते.दरम्याण शेतकर्याना दुबार तिबार पेरणीचा खर्च करावा लागला होता.त्यावेळी सुद्धा शेतकर्रानी महाबिजचे बियाणे उगवले नसतांना महाबिजची पाठराखण केली होती.विशेष म्हणजे शेतकर्यानी जै से थे परीस्थीतीत महाबिज कडे पेरणी खर्चाची मागणी न करता बियाणे बदलुन घेऊन दुबार पेरणी केली होती.

तर सन२०२०-२१मधे म्हणजेच मागील वर्षी बाजारामध्ये ८०००रू सोयाबीनचे दर असतांना महाबिजच्या ५२००रु वर शेतकर्याना समाधान मानावे लागले विशेष म्हणजे नापास सिड चांगल्या भावाने बाजारात गेले परंतु आमच्या शेतकर्यानी इमानदारी राखत झळ खात चांगले सिडस बियाणे महाबिजला देण्यास पसंती दर्शविली असल्याचे मत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की,यावर्षी शेतकर्रानी महाबिज कडे बुकींग केली परंतु मागणीच्या ५०%बियाणे मिळाले.असे असतांना वेळोवेळी महाबिजला साथ दिली जात असतांना शासनाकडुन महाबिजकडुन

कधीही शेतकर्याच्या हिताचा विचार होतांना दिसत नसल्याने व नियमीत शेतकर्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होतांना दिसत असल्याने शेतकर्यानी महाबिज व शासना विरोधात दंड थोपटले असुन विदर्भातील शेतकर्यासाठी मा.रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन उभरणार असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले असुन शासनाने मागील वर्षी च्या महाबिजच्या सोयाबीन उत्पादक शेतकर्याना प्रति क्वी २५००रु भाव फरक देण्यात यावा,त्याच प्रमाणे शेतकर्याना सतत उद्भवत असलेल्या मागण्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी शेतकर्यासह स्वाभिमानी ने केली असुन अन्यथा शेतकर्याना महाबिजला सोयाबीन द्यावयाची किवा कसे याचा विचार करुन याबाबत तिव्र आंदोलन छेडण्याचा पावित्रा शेतकर्यासह स्वाभिमानी ने घेतला आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: In the sanctity of Swabhimani Andolan to get the amount of price difference of Mahabij
Published on: 24 September 2021, 11:22 IST