बँक्टेरीया , फंगस , प्लँट एक्स्ट्रक्ट , इसेंशियल आँईल , मेटँबोलाईटस , अल्कोलाईडस , असे बरेच शब्द जैविक तंत्रज्ञानाबद्दल आपल्या कानावर येत असतात. सुरूवातीला आपण बँक्टेरीया व फंगस यांचे शेतीतील महत्व व वापर याबद्दल माहीती घेऊ. अँग्रीकल्चर मध्ये सुरूवातीला बँक्टेरीया व फंगस चे संशोधन झाले तेव्हा हे टाल्कम व लिक्विड फाँर्म मध्ये मार्केटला उपलब्ध झालीत.परंतु या उत्पादनांना शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे व हायटेक यंत्रणेचा अभाव यामुळे त्यांचा काउंट कमी होऊन उत्पादनांची पाँवर (स्टँबीलीटी ) कमी झाली त्यामुळे शेतकऱ्यांना रिझल्ट आले नाहीत.
बऱ्याच काही संस्थानी तंत्रज्ञानाचा व यंत्रणेचा अभाव असतांना Many institutions lack technology and systems दुय्यम व कमजोर स्ट्रेन्सच चा वापर करून साध्या पध्दतीने तयार करून कमी काउंट ची बँक्टेरीया शेतकऱ्यांच्या माथी मारून शेतकऱ्यांची फसवणुक केली
शेती उत्पादनामध्ये महत्वाच्या जमिनीची सुपीकता-पेण्डिख़त
त्यामुळे ज्या तंत्रज्ञानाला आजही मेडीकल सायन्स मध्ये मानाचे स्थान आहे त्याची अँग्रीकल्चर मधील अवस्था दयनिय झाली. ह्या सर्व बाबींचा सारासार अभ्यास करून मेडीकल सायंन्स मधील तंत्रज्ञान ज्याला आपण लायफोलाईझेशन प्रोसेस म्हणतो ते अँग्रीकल्चर मध्ये
आणुन बँक्टेरीया व फंगस आधारीत उत्पादनांवर संशोधन झाले अणि एक नविन जैविक क्रांती झाली.कोणतेही उपयुक्त बँक्टेरिया व फंगस हे 15 ते 35 डिग्री तापमानात चांगले कार्यक्षम असतात. या लायफोलाईझेशन तंत्रज्ञानातील प्रोसेस मध्ये बँक्टेरीयांना फ्रिजींग केले जाते ( मायनस 40℃ तापमानाला व नंतर हळुहळु तापमान वाढवुन पुन्हा 40 ℃ पर्यत वाढविले जाते ) या प्रोसेस मध्ये त्या बँक्टेरीया व फंगसच्या शरीरातुन पुर्ण पाणी काढले जाते व त्यांना सुप्त अवस्थेत नेऊन ठेवले जाते. त्यात
लिक्विड फाँर्म चे डायरेक्ट पावडर फाँर्म मध्ये रुपांतर म्हणजेच दोन लिटर कल्चर पसुन 1 ग्रँम लायफोलाईज्ड पावडर तयार होते. नंतर ही सुप्त अवस्थेतील बँक्टेरीया व फंगस पावडर पुन्हा डेक्सट्रोज पावडर मध्ये मिक्स करून वँक्युम पँकींग केले जाते.या तंत्रज्ञानात कमीत कमी व जास्तीत जास्त तापमानात काम करणाऱ्या अतिशय शक्तीशाली स्ट्रेनचा वापर केला जातो ( उदा. बँसिलसच्या 7 ते 8 प्रकार, सुडोमोनस 4 ते 5 प्रकार., ट्रायकोडर्मा 3 प्रकारचे अशा बऱ्याच बँक्टेरिया व फंगस चा वापर एकत्र करणे शक्य झाले.त्यमुळे भुरी , डावणी, जिवाणुजन्य करपा , खोडकीड मिलिबग यांवर प्रभावी नियंत्रण करणारे
कंसोरशिया उत्पादने ( तीन ते चार स्ट्रेन एकत्र ) संशोधन करणे शक्य झाले.अन्य फायदे -1) शेल्फ लाईफ कमीत कमी दोन वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष.2) बँक्टेरिया व फंगस काउंट बाकी उत्पादनांपेक्षा डबल .3) या प्रोसेस मध्ये बँक्टेरिया व फंगस ह्या Minus -40 ℃ ते above 40 ℃ प्रवास करतात त्यामुळे कमी जास्त तापमानात सुध्दा प्रभावी रिझल्ट देतात.4) प्राँडटची गुणवत्ता स्टँबिलीटी सर्वोत्तम .5) एका पेक्षा जास्त चार ते पाच स्ट्रेन्स एकत्रीत करणे शक्य त्यामुळे रिझल्ट अतिशय परिणामकारक 6) काउंट व स्टँबिलीटी जास्त असल्यामुळे सिंगल बँक्टेरीया व फंगस उत्पादने सुध्दा अतिशय प्रभावी 7 ) नँनो टेक्नाँलाजीमुळे डोस फक्त 250 ग्रँम 200 लिटर पाण्यासाठी ..स्टोरेज करायला सोपे.
Published on: 03 November 2022, 07:08 IST