Agripedia

शेतकरी बांधवांनो आपल्याला काही जण बळी राजा संबोधतात .

Updated on 18 May, 2022 6:15 PM IST

या मागचं कारण फक्त एका दाण्याचे हजार दाणे करणारा एकमेव कारागीर हा शेतकरी आहे.शेती मधे दिवस रात्र राब राब राबनारा आहे.पण त्या गोष्टीचं कोणाला काही लेणं देणं नाही.आपन एवढे कष्ट करून सुद्धा शेतकरी यांना एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते.या मेहनतीची कोणीतरी दखल घेतली ती म्हणजे आदरनिय प्रकाश जी साबळे एक साधसुध व सर्वांच्या परिचयाचं व्यक्तीमत्व त्यांना या गोष्टीची जान झाली की आपन‌ माती मधे राबनार्या लेकरांचा सन्मान करावा! अशी कल्पना सत्यात मधे उतरविण्याच धाडस केलं.आपन शेतकर्याचे लेकरं या उद्देशाने आपन आपल्या मानसाचा सत्कार करावा या महत्वकांक्षी पुरस्कार म्हणजे स्व राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार या सन्मानाची शेतकरी वाट बघत असतात कोनतीही

बक्षिसाची रक्कम नाही किंवा कोणताही यामधे राजकीय फायदा किंवा हेतु नाही कारण हा फक्त पुरस्कार नसुन शेतिचा केलेला सन्मान आहे.श्री प्रकाश जी साबळे एक मुत्सदी राजकारणी आहे व त्याही पेक्षा एक उत्कृष्ट समाजकारणी व्यक्तीमत्व आहे.यांची ओळख शेतकऱ्यांना २०२१मधे दिसली ती म्हणजे त्यांनी पुरस्काराचं वितरण शेतकर्यांचा बांधावर केले ही शेतीच्या इतिहासामधली मोठी घटना आहे.तुम्ही श्री प्रकाशजी साबळे यांच्याशी बोलताना तुम्हाला जाणवेल की त्यांना शेतीविषय त्यांच्यातील तळमळ दिसून येईल ते स्वता एक प्रगतिशील शेतकरी असल्यामुळे शेती पुरस्कार देण्यामागे त्यांची एक समाजसेवा आहे.
या मागे चांगला हेतू म्हणजे नव नविन तंत्रज्ञान वापरुन शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा मूळ उद्देश आहे. श्री प्रकाश जी साबळे

यांनी हा पुरस्कार प्राथमिक स्तरावरील कार्यक्रमापासून ते आज राज्यातील शेतकऱ्यांना आपला वाटणारा पुरस्कार अशी या पुरस्काराची ख्याती आहे.जय जवान जय किसान आणी जय विज्ञान अशी हाक देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानात भारताला पुढे नेणारे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी २१मे ला हा पुरस्कार देणे सुरू केला. स्वता शेतकरी यांची निवड न करता एक स्वतंत्र निवड समिती केली.जवळचे किंवा नातेवाईक यामधे सरांनी थारा दीला नाही.कारण यामधे प्रगतिशील शेतकरी यांनाच पुरस्कार दील्या गेले. कृषी शास्त्रज्ञ,महिला शेतकरी व मजुर वर्ग यांचा समावेश केला. प्रेरणादायी विचाराचं व्यक्तीमत्व असलेले श्री प्रकाश जी साबळे सर यांचं उपक्रमाचे कौतुक सर्वच स्तरातून केले जातआहे. 

अमरावती जिल्हा सोयाबीन उत्पादक संघ या ३ हजार शेतकरी सदस्य असलेल्या संस्थेची प्रकाश साबळे यांना मदत होते. ते खुद्द या संस्थेचे अध्यक्ष आहे.कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ देऊन गौरविण्यात येते. लोकवर्गणीतून कोणतीही शासकीय मदत न घेता काम करणाऱ्या साबळे सरांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या श्रमाची कहाणी पोहचवली या मागचा उद्देश एकच एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ अश्या कारणांमुळे श्री साबळे सरांचे कौतुक मला करायचे आहे की शेती मधे मातीचा सन्मान करणारा प्रकाश दिसला.
Mission agriculture soil information
मिलिंद जि गोदे
9423361185
English Summary: In the field of agriculture, farmers saw the "light" of honor.
Published on: 18 May 2022, 06:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)