16 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाच्या (cabinet) बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास प्रक्षेत्र अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे हा “शेळी समूह योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांसाठी (farmers) दिलासादायक बातमी आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी
आणि शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. 7.81 कोटी इतका निधी “शेळी समूह योजनेसाठी” निधी देण्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे.
पोहरा ला मान्यता दिली त्याप्रमाणेच राहिलेल्या 5 महसूल विभागात देखील या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
शेळ्यां मोठया प्रमाणात रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. तसेच मांसासाठी सुद्धा कमी वयाच्या शेळ्यांची कत्तल देखील केली जाते.
मग अशा वेळी पाहिजे त्या जातीची शेळी उपलब्ध होत नाही. या उद्देशाने “शेळी मेंढी पालन व्यवसायाला” चालना मिळण्यासाठी व ही योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळात (cabinet) निर्णय घेण्यात आला.
शेळी पालकांना सुविधा –
पोहरा येथील शेळी पालकांना या योजनेअंतर्गत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी शेळ्यांचे प्रशिक्षण केंद्र व निवासस्थान, तसेच दूध व दुग्धजन्य प्रक्रीया केंद्र देखील स्थापन करण्यात येणार आहेत. सोबत पोहरा येथे सुविधा केंद्र सुद्धा स्थापन होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी (farmers) दिलासादायक बातमी आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. 7.81 कोटी इतका निधी “शेळी समूह योजनेसाठी” निधी देण्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे.
Published on: 07 March 2022, 03:36 IST